शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतीय जहाजांवर हल्ला केल्यानंतर इराणची मोठी घोषणा; आता युद्ध संपेपर्यंत होर्मुझ ताब्यात ठेवणार...
2
"काल आमचे संख्याबळ कमी पडले, पण..."; महिला आरक्षणावरून PM मोदींचा निर्धार
3
संजू सॅमसनमध्ये दिसली MS धोनीची झलक; यशस्वी रिव्ह्यूसह CSK ला मिळवून दिली अभिषेकची विकेट
4
"स्त्री सर्व काही विसरू शकते, पण...!" महिला आरक्षण विधेयक पाडल्यावरून पंतप्रधान मोदी संतापले, भ्रूण हत्या संबोधले
5
"तुम्हीच परवानगी दिली आणि आता गोळीबार करताय?" भारतीय कॅप्टनचा इराणच्या नेव्हीकडून विश्वासघात,रेडिओवरील थरार समोर
6
Abhishek Sharma Fastest Fifty : अभिषेकची वादळी खेळी! रैना, ईशानला मागे टाकत वैभव सूर्यवंशीची बरोबरी
7
"विरोधकांनी राजकारण करून विधेयक मंजूर होऊ दिले नाही...", महिला आरक्षणावरून पंतप्रधान मोदींची टीका
8
'जग अर्णव' थोडक्यात बचावले; भारत संतापला, इराणच्या राजदूताला बजावले समन्स
9
IPL 2026 : मिलरचा किलर फिनिशिंग टच! RCB विरुद्धच्या रंगतदार सामन्यात DC नं अखेरच्या षटकात मारली बाजी
10
Akshaya Tritiya 2026 Wishes: अक्षय्य तृतीयेच्या हार्दिक शुभेच्छा, मराठी Messages, Images, Whatsapp Status शेअर करत साजरा करा अक्षय्य तृतीयेचा सण
11
"मम्मी, मी पास झाले..."; दहावी पास होताच लेकीने आईला केला फोन; Video पाहून व्हाल भावुक
12
इराणकडून भारतीय जहाजांवरच गोळीबार? टँकर VLCC माघारी परतला, होर्मुझमध्ये काय घडले...
13
कर्नाटकात 'बर्ड फ्लू'चा शिरकाव! बेंगळुरूमधील पोल्ट्री फार्ममध्ये H5N1 विषाणूचा प्रादुर्भाव; हजारो कोंबड्यांना पुरले
14
राज्यात 20 ते 22 एप्रिल दरम्यान वादळी पावसाची शक्यता, 'या' जिल्ह्यांना इशारा, शेतकऱ्यांना आवाहन 
15
"अभी तो मैं जवान हूँ..." फिटनेस किंग कोहलीची कमाल! २१ मीटर धावत येऊन KL राहुलच्या खेळीला लावला ब्रेक
16
क्रूरतेचा कळस! सख्ख्या भावावर कुऱ्हाडीने वार; मृतदेहाचे केले ९ तुकडे, थरकाप उडवणारी घटना
17
मोठी कारवाई! नोएडा हिंसाचार प्रकरणातील मास्टरमाइंड आदित्य आनंदला तामिळनाडूतून अटक
18
WWE नाही मनमाडच्या स्थानकावरील Video! अंगावर शहारे येतील, रेल्वेच्या ओव्हरहेड इलेक्ट्रिक खांबावर चढला माथेफिरू 
19
नाशिक TCS प्रकरण: निदा खान मुंब्र्यातील हॉस्पिटलमध्ये दोनदा आलेली; डॉक्टरांचा मोठा खुलासा, अटकपूर्व जामिनासाठी धडपड
20
जितेश शर्माला आपल्या क्रिजमध्ये पाहून क्रुणाल पांड्या गोंधळला; Run Out झाल्यावर रागही काढला (VIDEO)
Daily Top 2Weekly Top 5

सुरक्षा परिषदेच्या स्थायी सदस्यत्वासाठी पाठिंबा

By admin | Updated: January 24, 2015 02:17 IST

भारत आणि अमेरिका हे किती नैसर्गिक व सहकारी आहेत, हे जगाला दाखवून देण्यासाठी आपला दौरा ही एक मोठी संधी असल्याचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे.

ओबामांची ग्वाही : द्विपक्षीय संबंधातील नवा अध्याय; दोनदा भारतवारी ही अभिमानाची बाबनवी दिल्ली : भारत आणि अमेरिका हे किती नैसर्गिक व सहकारी आहेत, हे जगाला दाखवून देण्यासाठी आपला दौरा ही एक मोठी संधी असल्याचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा यांनी म्हटले आहे. दौऱ्यावर येण्यापूर्वी ‘इंडिया टुडे’ला दिलेल्या मुलाखतीत ओबामांनी भारताला संयुक्त राष्ट्रांच्या सुरक्षा परिषदेचे स्थायी सदस्यत्व देण्याच्या मागणीलाही पाठिंबा दिला.ओबामा म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची निवडणूक आणि त्यांची बांधीलकी हा द्विपक्षीय संबंधांतील एक नवा अध्याय आहे. यास आगामी काळात चालना देणे आवश्यक आहे. भारत-अमेरिका हे जागतिक सहकारी असल्याचे मी मागच्या दौऱ्यात भारतीय संसदेला संबोधित करताना नमूद केले होते. आता हा दृष्टीकोन वास्तवात येण्याचे गरज आहे. त्यामुळे प्रजासत्ताक दिनाला प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित राहणारे पहिले अमेरिकी राष्ट्राध्यक्ष हा मान मिळविण्यासाठीच हे निमंत्रण मी स्वीकारले आहे.’ नोव्हेंबर २०१० मध्ये ओबामा यांनी संसदेच्या संयुक्त अधिवेशानाला संबोधित केले होते. भारतीय संविधानाच्या पासष्टीनिमित्त राष्ट्रपती प्रणव मुखर्जी व पंतप्रधान मोदी आणि भारतीय नागरिकांंना भेटण्यास आपण आतुर असल्याचेही त्यांनी यावेळी सांगितले. भारतीय दौऱ्याचे विश्लेषण करताना ओबामा यांनी ‘ठोस प्रगतीसाठी मोदी यांच्यासोबत काम करण्याची ही एक संधी आहे. उभय देशांतील द्विपक्षीय संबंधांच्या इतिहासातील हा एक नवा अध्याय असेल.’ माजी पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांच्यासोबत आपले घनिष्ट संबंध असल्याचेही त्यांनी सांगितले. राष्ट्राध्यक्ष म्हणून दोनवेळा भारत दौऱ्यावर येण्याचा मान मिळणार आहे, याचा आपल्याला अभिमान वाटत असल्याचेही ओबामा म्हणाले. वॉंिशंग्टन : बराक ओबामा यांच्या भारत दौऱ्यात प्रादेशिक व्यापाराच्या मुद्याला खूप महत्त्व राहणार आहे. कारण, या पातळीवर व्यापार संबंधांच्या विस्तारासाठी दोन्ही देश प्रयत्नशील आहेत. अमेरिकी परराष्ट्र विभागाच्या सहायक सचिव (दक्षिण-मध्य अशिया) निशा देसाई बिस्वाल यांनी यास दुजोरा दिला.बिस्वाल म्हणाल्या, भारत व अफगाणिस्तान नव्याने आलेल्या सरकारकडून प्रादेशिक सह-अस्तित्व व वृद्धी यांनी पुनर्परिभाषित केले जात आहे. मोदीही दीर्घकाळापासून प्रलंबित आर्थिक व गुंतवणूक सुधारणा राबविण्याची ग्वाही दिली आहे. मोदी सरकारने अर्थव्यवस्था व मध्य आशियासह आपल्या शेजारी बाजारपेठांच्या वृद्धीसही प्राधान्य दिले.

 

राजघाट, विजयपथ आणि ताजही...अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष बराक ओबामा हे प्रजासत्ताक दिनाला येणारे पहिले अमेरिकन अध्यक्ष असून, २५ जानेवारी रोजी सकाळी ओबामा दाम्पत्याचे एअरफोर्स वन बोर्इंग ७४७-२०० हे विमान बी पालम विमानतळावर उतरताच भारत व अमेरिकेचे सुरक्षा कमांडो त्यांच्याभोवती सुरक्षेचे अभेद्य कवच उभारतील. विमानतळ लष्कराच्या अखत्यारीत असून पंतप्रधान व राष्ट्रपतींसारख्या महत्वाच्या व्यक्तींच्या उड्डाणांसाठी याच विमानतळाचा वापर केला जातो. पालम विमान तळावरुन ते थेट मौर्य शेरेटन हॉटेलमध्ये जातील. या हॉटेलच्या १४ व्या मजल्यावर ओबामा यांच्यासाठी खास स्वीट तयार करण्यात आले असून ४३८ खोल्या असणाऱ्या या पंचतारांकित हॉटेलमधील ४०० खोल्या अमेरिकी सरकारने बुक केल्या आहेत. मदतीस तयारभारत व अमेरिकेतील संबंध मजबूत करण्यासाठी काय करणे आवश्यक आहे, याबद्दलही ओबामांनी या मुलाखतीत आपली भूमिका विशद केली. अमेरिकी कंपन्या भारतात पायाभूत क्षेत्रात गुंतवणुकीस तयार आहेत. यामुळे भारताच्या अर्थगतीस चालना मिळेल. आम्ही स्वच्छ हवा, पिण्याचे पाणी आणि वाढती वीज गरज भागविण्यासाठी पंतप्रधान मोदी यांच्या प्रयत्नास मदत करण्यास तयार असल्याचे ओबामा यांनी सांगितले.