शहरं
Join us  
Trending Stories
1
देवेंद्र फडणवीस पवारांना काटशह देणार?; अभिजीत पाटलांच्या भाजप प्रवेशाची चर्चा
2
धमक्या कशाला देता? ४ जूनला जनताच तुम्हाला बघून घेईल - संजय राऊत
3
Sunita Kejriwal : "प्रत्येकजण हुकूमशाही हटवण्यासाठी आणि लोकशाही..."; सुनीता केजरीवाल यांचा रोड शो
4
दादा-भाईंचं मनोमीलन, बदलणार का सिंधुदुर्गातलं समीकरण?, असं आहे गणित... 
5
याला म्हणतात नशीब! बॉयफ्रेंडच्या 'त्या' एका सल्ल्याने 'ती' झाली लखपती; मिळाले 41 लाख
6
काँग्रेसला मोठा धक्का; अरविंदर सिंग लवली यांचा राजीनामा
7
"रावणानं सीतेचं हरण केलं आणि नरेंद्र मोदी यांनी…” काँग्रेसच्या महिला नेत्याची बोचरी टीका
8
शेव्हिंग कंपनीने टॉपर प्राचीच्या समर्थनार्थ दिली पानभर जाहिरात; शेवटचा सल्ला वाचून नेटकऱ्यांचा संताप अनावर
9
वर्षा गायकवाडांविरोधात कसं लढणार? उज्ज्वल निकम म्हणाले, ‘कोर्टात समोरच्याला…’
10
Sahil Khan : अभिनेता साहिल खानच्या अडचणीत वाढ; महादेव बेटिंग App प्रकरणी मुंबई पोलिसांची मोठी कारवाई
11
J P Nadda : "ही ममता बॅनर्जींची सर्वात मोठी चूक, तुम्ही बंगालचं काय केलं?"; जेपी नड्डा यांचा हल्लाबोल
12
नरेंद्र मोदी आज कर्नाटकात करणार वादळी प्रचार, दिवसभरात 4 सभांचे आयोजन
13
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
14
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
15
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
16
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
17
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
18
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
19
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
20
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी

'सनी देओल असो वा सनी लिओनी, सर्व उडून जातील'

By ऑनलाइन लोकमत | Published: May 03, 2019 1:09 PM

'सनी देओल यांना घेऊन येऊ दे अथवा पॉर्नस्टार सनी लिओनीला, तरी ते जिंकू शकणार नाहीत'

पंजाब : भाजपाचे उमेदवार आणि अभिनेता सनी देओल यांच्याबाबत काँग्रेसचे नेते राजकुमार चब्बेवाल यांनी वादग्रस्त विधान केले आहे. निवडणुकीच्या रिंगणात भाजपासनी देओल यांना घेऊन येऊ दे अथवा पॉर्नस्टार सनी लिओनीला, तरी ते जिंकू शकणार नाहीत, असे वक्तव्य राजकुमार चब्बेवाल यांनी एका आयोजित प्रचारसभेत केले आहे.  

पंतप्रधान नरेंद्र मोदी सरकार अपयशी ठरले आहे. त्यांना पंजाबमध्ये तीन जागांवर उमेदवार मिळाला नाही. भाजपाने गुरुदासपूरमधून सनी देओल यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरविले आहे. मात्र, भाजपाने सनी देओल यांना घेऊन यावे अथवा सनी लिओनी हिला आणावे. काँग्रेसच्या वादळात सर्वजण उडून जातील, असे वक्तव्य राजकुमार चब्बेवाल यांनी यावेळी केले आहे.   

अभिनेता विनोद खन्ना यांच्या निधनानंतर भाजपाने अभिनेता सनी देओल यांना लोकसभा निवडणुकीच्या मैदानात उतरविले आहे. त्यांना पंजाबमधील गुरुदासपूर लोकसभा मतदार संघातून भाजपाने उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता राजकीय आखाड्यात सनी देओल आपले नशीब आजमावणार आहेत. सनी देओल यांच्यासमोर काँग्रेसचे उमेदवार सुनील जाखड यांचे आव्हान आहे. सुनील जाखड विद्यमान खासदार आहेत. 

सनी देओल यांचे वडील व ज्येष्ठ अभिनेते धर्मेंद्र हे भाजपाशी जोडले गेलेले आहेत. 2004 मध्ये भाजपाच्या तिकिटावर त्यांनी राजस्थानच्या बिकानेरमधून निवडणूक लढवली होती. त्यांनी खासदार म्हणून निवडून गेल्यानंतर स्वत: ला राजकारणापासून वेगळे केले होते; परंतु ते मागील काही दिवसांपासून मथुरेत पत्नी हेमामालिनी यांच्यासाठी जो निवडणूक प्रचार करीत होते, ते पाहता राजकारणाबाबत त्यांचे मन बदलत आहे की काय, अशी चर्चा सुरू झाली आहे. 

सनी देओल यांचा 'गड्डी लेकर' प्रचारसनी देओल यांनी आपला रोड शो डेरा बाबा नानकपासून श्री गुरुद्वारा साहिबचे दर्शन घेऊन केला. गेल्या बुधवारी गुरुदासपूरमधील अनेक भागातून सनी यांचा रोड शो झाला. यावेळी सनी देओल ट्रकच्या छतावर बसून जनतेला मतदान करण्याचे आवाहन करत होते. जागोजागी सनी देओलचे स्वागत होत होते. परंतु, युवकांमध्ये सनी देओल यांच्याविषयी फारसा उत्साह दिसून आला नसल्याचे समजते.

हिन्दुस्तान जिंदाबाद था, है, और रहेगा!, मोदींच्या हातात 'ढाई किलोचा हात'अभिनेता सनी देओलने पंतप्रधान नरेंद्र मोदींची भेट घेतली होती. त्यावेळी मोदींनी सनी देओल सोबतचा आपला फोटो ट्विटरवर शेअर करत, आम्ही दोघेही 'हिंदुस्थान जिंदाबाद था, है, और रहेगा'साठी एकत्र असल्याचे म्हटले होते. 

सनी देओल फिल्मी, पण मी खरा फौजी; कॅप्टन अमरिंदर सिंह यांचा टोलाअभिनेता सनी देओल यांच्यावर पंजाबचे मुख्यमंत्री आणि काँग्रेसचे नेते कॅप्टन अमरिंदर सिंह यांनी निशाना साधला होता. यावेळी अमरिंदर सिंह यांनी सनी देओल केवळ फिल्मी असल्याचे सांगत, आपण असली फौजी असल्याचे म्हटले होते. यावर सनी देओलकडून  काहीही प्रतिक्रिया देण्यात आली नव्हती.  

टॅग्स :Sunny Deolसनी देओलSunny Leoneसनी लिओनीBJPभाजपाPunjab Lok Sabha Election 2019पंजाब लोकसभा निवडणूक निकाल 2019Lok Sabha Election 2019लोकसभा निवडणूक २०१९