गेल्या आठवड्यात विमान अपघातात तत्कालीन उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे निधन झाले. त्यांच्या निधनाने संपूर्ण महाराष्ट्र हळहळला. अजित दादांच्या मृत्यूनतंर, काही तासांतच चर्चा सुरू झाली, ती पुढच्या नेतृत्वाची आणि दोन्ही राष्ट्रवादींच्या विलिनीकरणाची, मात्र सुनेत्रा पवार यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली आणि दोन्ही चर्चा निकाली काढल्या.
सुनेत्रा पवार यांनी पती अजित पवार यांना श्रद्धांजली अर्पण केल्यानंतर अतिशय भावूक वातावरणात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतली. मात्र, सोशल मीडियावर काही मंडळींनी त्यांना ट्रोल करायला सुरुवात केली. या शोक काळात त्या कशीकाय शपथ घेऊ शकतात? तुर्तास तो टाळता आला असता, असे काही लोकांचे म्हणणे होते. काँग्रेस नेते उदित राज यांनीही यावर प्रश्न उपस्थित करत, "शोक काळात शपथविधी सोहळा टाळता आला असता," असे मत व्यक्त केले. यावर, भाजपने काँग्रेसवर थेट हल्ला चढवत, काँग्रेस 'गिधाड राजकारण' करते, असे म्हटले आहे. शिवाय, हा मुद्दा आता सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात चर्चेत आहे.
महत्वाचे म्हणजे, सुनेत्रा पवार यांच्या शपथविधीचा मुद्दा सोशल मीडियावर जबरदस्त चर्चिला जात आहे. अनेक युजर्सनी सुनेत्रा पवार यांच्यावर होत असलेल्या टीका चुकीची असल्याचे महटले आहे. तसेच, त्यांच्या शपथविधीची तुलना थेट माजी पंतप्रधान राजीव गांधी यांच्या पंतप्रधानपदाच्या शपथविधीशी केली आहे.
""इंदिरां गांधींच्या मृत्यूनंतर त्याच दिवशी राजीव गांधी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली" - एका युजरने म्हटले आहे, "३१ ऑक्टोबर १९८४ रोजी सकाळी ९:२० वाजता इंदिरा गांधींवर गोळ्या झाडल्या गेल्या. दुपारी २ वाजता त्यांना मृत घोषित करण्यात आले आणि त्याच दिवशी सायंकाळी ६ वाजण्याच्या सुमारास राजीव गांधी यांनी पंतप्रधान पदाची शपथ घेतली." याच बरोबर, भाजप प्रवक्ते शहजाद पूनावाला यांनीही काँग्रेसवर हाच युक्तिवाद करत हल्ला चढवला.
"राजीव गांधींनी त्यांच्या (इंदिरा गांधी) मृत्यूच्या दिवशीच शपथ घेतली, तेव्हा आज हिंदू परंपरेच्या गप्पा मारणारे कुठे होते? तेव्हा हिंदू परंपरेचा अवमान झाला नव्हता का?" असा प्रश्न पुनावाला यांनी केला आहे.
Web Summary : Sunetra Pawar's swift oath after her husband's death sparked controversy, drawing comparisons to Rajiv Gandhi's immediate succession after Indira Gandhi's assassination. BJP criticized Congress's reaction as hypocritical 'ghoul politics'.
Web Summary : सुनेत्रा पवार के पति की मृत्यु के बाद शपथ लेने पर विवाद, इंदिरा गांधी की हत्या के बाद राजीव गांधी के तत्काल उत्तराधिकार से तुलना। भाजपा ने कांग्रेस की प्रतिक्रिया को पाखंडी 'गिद्ध राजनीति' बताया।