सारांश जोड
By admin | Updated: December 25, 2014 22:41 IST
ग्राहक समिती बरखास्तीचा निर्णय दुर्दैवी-चवरे
सारांश जोड
ग्राहक समिती बरखास्तीचा निर्णय दुर्दैवी-चवरेनागपूर : ग्राहक चळवळीला प्रोत्साहन देऊन ही चळवळ ग्रामीण भागात पोहोचविण्यासाठी स्थापन करण्यात आलेल्या ग्राहक सल्लागार समितीला राष्ट्रीय ग्राहक संरक्षण दिनी बरखास्त करण्याचा निर्णय घेण्यात आला. हा निर्णय दुर्दैवी असल्याची प्रतिक्रिया कास्ट्राईब जिल्हा परिषद कर्मचारी संघटनेचे जिल्हाध्यक्ष सोहन चवरे यांनी दिली आहे. या समितीची पुनर्रचना करून समितीला पुनर्जीवित करण्याची मागणी त्यांनी केली आहे.सुतार बांधवांनी केले श्रमदाननागपूर : सुतार बांधवांच्या अडचणी सोडविण्यासाठी फेविकॉल क्लब स्थापन करण्यात आला. या माध्यमातून श्रमदान दिवसाचे आयोजन करण्यात आले. यावेळी सुतार बांधव आणि विविध संस्थांनी एकत्र येऊन श्रमदान केले. संस्थेतर्फे प्राथमिक स्तरावर सुतार बांधवांसाठी प्रशिक्षण कार्यशाळा, स्वयंविकास कार्यक्रम, वैद्यकीय शिबिरे, रक्तदान, पल्स पोलिओ, नेत्र तपासणी, आरोग्य तपासणीचे उपक्रम राबविले जातात. संत गाडगे महाराज पुण्यतिथी कार्यक्रमनागपूर : संत गाडगे महाराज यांच्या ५८ व्या पुण्यतिथीनिमित्त निवासी मूकबधिर विद्यालय हुडकेश्वर येथे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. प्रमुख पाहुणे म्हणून शाळेचे संचालक राहुल सोनटक्के, मुख्याध्यापक राजेश खांडेकर, उपमुख्याध्यापक आशिष निंबुरकर उपस्थित होते. संचालन प्रीती करंडे यांनी केले. आभार विशेष शिक्षक मुकेश बांते यांनी मानले.मनु शोध अभियानाचा शुभारंभनागपूर : मनुस्मृती दिनानिमित्त आंबेडकरी विचार मोर्चातर्फे संविधान चौकात मनु शोध अभियानाचा शुभारंभ करण्यात आला. यावेळी मोर्चाचे संस्थापक नारायण बागडे, देवेंद्र बागडे, प्रा. रमेश दुपारे, ॲड मिलिंद खोब्रागडे, अनुप थुल, प्रा. एन. कुमार इंगाले, अशोक बोरकर, बाबुजी सोनटक्के, धनंजय कांबळे, शालिक बांगर, रोशन बारमासे, दिलीप वानखेडे, सुनिता सोमकुवर, भागन मेश्राम, बेबी मेश्राम, सलीम खान उपस्थित होते.पंडित मदनमोहन मालवीय यांना अभिवादननागपूर : हिंदू महासभेचे संस्थापक मदनमोहन मालवीय यांच्या जयंतीनिमित्त हिंदू महासभेच्या टिळक पुतळा महाल येथील कार्यालयात स्वातंत्र्यवीर सावरकर राष्ट्रीय स्मारकाचे अध्यक्ष अरुण जोशी यांनी विनम्र अभिवादन केले. हिंदू महासभेच्या माध्यमातून मालवीय यांनी असंघटित हिंदूंना संघटित करून राष्ट्रकार्यास प्रेरित केल्याचे जोशी यांनी सांगितले. वंदेमातरमने कार्यक्रमाचा समारोप झाला.