Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2025 16:20 IST2025-12-27T16:19:58+5:302025-12-27T16:20:48+5:30
Sukesh Chandrashekhar : २०० कोटी रुपयांच्या हाय-प्रोफाइल खंडणी प्रकरणात जेलमध्ये असलेला महाठग सुकेश चंद्रशेखरने आता असं काही म्हटलं आहे, ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत.

Sukesh Chandrashekhar : "२१७ कोटी देण्यास तयार, पण...", महाठग सुकेश चंद्रशेखरचा मास्टरस्ट्रोक; खंडणी प्रकरणात मोठी ऑफर
२०० कोटी रुपयांच्या हाय-प्रोफाइल खंडणी प्रकरणात जेलमध्ये असलेला महाठग सुकेश चंद्रशेखरने आता असं काही म्हटलं आहे, ज्यामुळे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत. सुकेशने दिल्लीच्या पटियाला हाऊस कोर्टात विशेष न्यायाधीश (एएसजे) प्रशांत शर्मा यांच्यासमोर अर्ज दाखल केला आहे.
अर्जात सुकेशने म्हटलं आहे की, तो २०० कोटी रुपयांच्या खंडणी प्रकरणात तक्रारदार अदिती सिंहला २१७ कोटी रुपये देण्यास तयार आहे. मात्र त्याने स्पष्ट केलं की तो त्याच्या कायदेशीर अधिकारांना नुकसान न पोहोचवता ही रक्कम देत आहे. यामुळे गुन्हा स्वीकारला असं समजू नये.
सुकेशने म्हटलं की, त्याने पैशाची ऑफर दिली म्हणजे तो स्वत:ला दोषी मानतो असं होत नाही, तर तो इतर कारणांसाठी हे पाऊल उचलत आहे. कोणत्याही पूर्वग्रहाशिवाय आणि त्याच्या कायदेशीर अधिकारांना धक्का न देता ही रक्कम देण्यास तयार असल्याचं सुकेश चंद्रशेखरने अर्जात सांगितलं.
"माय लव्ह, हे तेच घर आहे जे..."; जेलमध्ये असलेल्या सुकेशने जॅकलिनला गिफ्ट केला आलिशान बंगला
२०० कोटी रुपयांच्या या खंडणी प्रकरणात सुकेश चंद्रशेखरवर तक्रारदाराकडून मोठी रक्कम उकळण्यासाठी जबरदस्ती आणि फसवणूक केल्याचा आरोप आहे. या प्रकरणात अनेक तपास संस्था आधीच सहभागी आहेत आणि सुकेश सध्या जेलमध्ये आहे. न्यायालयात दाखल केलेल्या अर्जामुळे हे हाय-प्रोफाइल प्रकरण पुन्हा एकदा चर्चेत आलं आहे.
सर्व पक्षांचे युक्तिवाद ऐकल्यानंतरच न्यायालय आता या अर्जावर निर्णय देईल. तक्रारदार हा प्रस्ताव स्वीकारण्यास तयार आहे की नाही हे देखील निश्चित केलं जाईल. सध्या हा खटला पटियाला हाऊस कोर्टात प्रलंबित आहे आणि येत्या काही दिवसांत सुनावणीदरम्यान अनेक महत्त्वाच्या कायदेशीर बाबींवर चर्चा होण्याची देखील शक्यता आहे.