मार्डीच्या सरपंचपदी सुजाता इनामदार

By Admin | Updated: August 26, 2015 23:32 IST2015-08-26T23:32:33+5:302015-08-26T23:32:33+5:30

सोलापूर : मार्डी (ता़उ़सोलापूर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुजाता संजय इनामदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली़

Sujata Inamdar for Mardi's Sarpanch | मार्डीच्या सरपंचपदी सुजाता इनामदार

मार्डीच्या सरपंचपदी सुजाता इनामदार

लापूर : मार्डी (ता़उ़सोलापूर) ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी सुजाता संजय इनामदार यांची बिनविरोध निवड करण्यात आली़
दरम्यान, मार्डी ग्रामपंचायतीची निवडणूक बिनविरोध करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता; मात्र ऐनवेळी निवडणूक लागली़ त्यावेळी निवडून आलेल्या सदस्यांनी अडीच वर्षासाठी सुजाता र्शीकांत मार्तंडे यांना तर अडीच वर्षे सुजाता संजय इनामदार यांना सरपंचपद देण्याचे ठरले होत़े त्यानुसार अडीच वर्ष पूर्ण झाल्यानंतर सुजाता मार्तंडे यांनी सरपंचपदाचा राजीनामा दिला़ या रिक्त झालेल्या जागेसाठी निवडणूक निर्णय अधिकारी अजय गेंगाणे यांनी सर्व सदस्यांची बैठक घेतली़ सरपंचपदासाठी ठरल्याप्रमाणे इनामदार यांचाच एकमेव अर्ज आल्याने त्यांची निवडीची घोषणा गेंगाणे यांनी केली़
या निवडीनंतर नूतन सरपंच इनामदार यांचा सुजाता मार्तंडे यांनी सत्कार केला़ यावेळी तंटामुक्त समितीचे अध्यक्ष मनोहर जगताप, बाजार समितीचे संचालक अविनाश मार्तंडे, पंचायत समितीचे सदस्य इंद्रजित पवार, सोसायटीचे अध्यक्ष बाबासाहेब पाटील, बाळासाहेब पाटील, संजय इनामदार, रामचंद्र माळी आदी ग्रामपंचायत सदस्य व ग्रामस्थ मोठय़ा संख्येने उपस्थित होत़े

Web Title: Sujata Inamdar for Mardi's Sarpanch