विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर सुरू झाली 'पॉर्न क्लिप'; ऑनलाइन क्लासने दिला पालकांना धक्का
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 15, 2020 13:28 IST2020-09-15T12:49:17+5:302020-09-15T13:28:39+5:30
मध्य प्रदेशातील श्योपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याठिकाणी मुलांना ऑनलाइन शिक्षण देताना विद्यार्थ्याच्या मोबाईलवर पॉर्न क्लीप सुरु झाली

विद्यार्थ्यांच्या मोबाईलवर सुरू झाली 'पॉर्न क्लिप'; ऑनलाइन क्लासने दिला पालकांना धक्का
नवी दिल्ली – देशभरात कोरोनाचा हाहाकार माजल्याने अद्यापही काही प्रमाणात लॉकडाऊन सुरु आहे. गेल्या ४-५ महिन्यापासून शाळा कॉलेज बंद असल्याने विद्यार्थ्यांचे ऑनलाइन क्लासेस घेतले जात आहेत. अशातच मुलांना घरात बसूनच लॅपटॉप किंवा स्मार्टफोनवर ऑनलाइनशिक्षणाचे धडे दिले जात आहेत. ऑनलाइन शिक्षणाबाबत देशातील विविध कानाकोपऱ्यातून अनेक बातम्या येतात.
मध्य प्रदेशातील श्योपूरमध्ये एक धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. याठिकाणी मुलांना ऑनलाइन शिक्षण देताना विद्यार्थ्याच्या मोबाईलवर पॉर्न क्लीप सुरु झाली. अचानक घडलेल्या या प्रकाराने सगळेच गडबडले. माहितीनुसार मध्य प्रदेशातील श्योपूरमध्ये ८ वीच्या वर्गाचे क्लास मुलांच्या व्हॉट्सअपग्रुपमध्ये ऑनलाइन सुरु होते. त्याचवेळी अचानक मुलांच्या मोबाईलवर अश्लिल व्हिडीओ सुरु झाला. या प्रकाराने पालकांमध्येही खळबळ माजली. सर्व विद्यार्थी शिक्षण घेत असताना हा प्रकार घडला.
घडलेल्या प्रकारावर संतप्त झालेल्या पालकांनी शिक्षकांना धारेवर धरले. एक महिला शिक्षिका विद्यार्थ्यांचा इंग्रजीचा क्लास घेत होती. त्याच वेळी पालकांच्या नजरा मुलांच्या मोबाईलवर पडल्या तेव्हा त्यांना धक्का बसला. नाव न सांगण्याच्या अटीवर एका सरकारी अधिकाऱ्याने सांगितले की, या घटनेनंतर आम्ही त्वरित सुरु असलेला ऑनलाइन क्लास थांबवला आणि मोबाईल बंद केला. श्योपूर हा मध्य प्रदेशातील सीमावर्ती जिल्ह्यांपैकी एक आहे, जो राजस्थानच्या सवाई माधोपूर जिल्ह्याच्या जवळ आहे.
शाळेच्या मुख्याध्यापकांनी सांगितले की, हे कृत्य कोणत्याही शिक्षकाकडून झाले नाही. कोणत्या हॅकरने अशाप्रकारे कृत्य केल्याचा संशय त्यांनी व्यक्त केला. सर्वकाही दुरुस्त केले जात आहे, सुरक्षा व्यवस्था आणखी कडक करण्यात येईल. जेणेकरून या नंतर मुलांचे ऑनलाइन क्लास सुरू केले जातील.