शहरं
Join us  
Trending Stories
1
'आप'ला भगदाड, खासदारांचा मोठा गट फुटला! अरविंद केजरीवाल म्हणाले, "भाजपाने पुन्हा..."
2
तरुणीला 'हाय' केले अन् वाद पेटला; लग्नातील वऱ्हाडी थेट २० फूट खड्ड्यात, एकाचा मृत्यू ८ जण जखमी, विकासकाविरुद्ध गुन्हा 
3
मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांना हटवण्याची मागणी; ७३ खासदारांचे सभापतींना पत्र
4
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
5
९०% मार्क्स, आयआरएससोबत वडिलांची ओळख अन् लक्झरी लाईफचं वेड; हुशार राहुल मीणा गुन्हेगार कसा झाला?
6
Raghav Chadha: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
7
Raghav Chadha : राघव चड्ढांनी २१ दिवसांपूर्वीच दिले होते 'आप'मधील फुटीचे संकेत; भाकीत ठरलं खरं
8
“रिक्षा-टॅक्सी, ओला-उबेर, रॅपिडो चालकांनी मराठीत संवाद साधलाच पाहिजे”: मंत्री प्रताप सरनाईक
9
एकदम फिट दिसणाऱ्यांना का येतोय हार्ट अटॅक? डॉक्टरांनी सांगितलं 'ते' खरं कारण
10
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
11
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
12
दमदार इंजिनसह BMW ने भारतात लॉन्च केली सर्वात स्वस्त बाईक, जाणून घ्या किंमत अन् फीचर्स...
13
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
14
"मी त्याच्याशीच लग्न करणार...", बिग बॉस विजेती तन्वी कोलतेने केला खुलासा; प्रेमाबद्दल म्हणाली...
15
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
16
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
17
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
18
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
19
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ मोठे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
20
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
Daily Top 2Weekly Top 5

चिमणीच्या उजेडात अभ्यास करून मनीषा चमकली

By admin | Updated: June 12, 2015 17:37 IST

धर्माबाद : पत्राच्या दहा बाय दहाच्या झोपडीत राहून, सुटीच्या दिवशी आईसोबत मोलमजुरी करून आर्थिक परिस्थितीवर मात करीत चिमणीच्या उजेडात जिद्दीने अभ्यास करून मनीषा कदम या मुलीने दहावी परीक्षेत ९१ टक्के गुण घेवून घवघवीत यश मिळविले़

धर्माबाद : पत्राच्या दहा बाय दहाच्या झोपडीत राहून, सुटीच्या दिवशी आईसोबत मोलमजुरी करून आर्थिक परिस्थितीवर मात करीत चिमणीच्या उजेडात जिद्दीने अभ्यास करून मनीषा कदम या मुलीने दहावी परीक्षेत ९१ टक्के गुण घेवून घवघवीत यश मिळविले़
चिकना ता़धर्माबाद येथील रामराव कदम यांची मनीषा ही मुलगी़ घरची आर्थिक परिस्थिती बेताची़ खायचीही भ्रांत नाही़ मुलांचे शिक्षण कसे करायचे, असा प्रश्न तिच्या आईला पडायचा़ मनीषा हुशार असूनही गरीबी आडवी येत होती़ ते धर्माबादला रसिकनगर येथे पत्राच्या झोपडीत राहू लागले़ वडील असूनही नसल्यासारखे होते़ ते लक्ष देत नसल्याने आई घर सांभाळायची़ आईनेच मोठ्या बहिणीचे बाळांतपण दहा बाय दहा आकाराच्या खोलीत केले़ चटणी भाकर खावून बहिण-भावंड राहत होते़ परिस्थितीची जाणीव असल्याने कोणत्याही गोष्टीचा ह˜ मनीषाने केला नाही़ आहे त्या परिस्थितीला ती सामोरे गेली़
शाळेच्या सुटीच्या दिवशी मनीषा आईसोबत कामाला जायची़ लहान भाऊ देखील सोबत असायचा़ कामावरून घरी आल्यानंतर ती अभ्यास करायची़ घरात विद्युत मीटर नाही़ त्यामुळे तिला रॉकेलच्या चिमणीच्या उजेडात अभ्यास करावा लागत होता़ कधी रॉकेल नसेल तेव्हा विद्युत पोलच्या दिव्याखाली ती अभ्यास करायची़ जिद्द, चिकाटी, आत्मविश्वास हे गुण अंगी असले तर कोणतीही गोष्ट अशक्य नाही हे मनीषाने ९१ टक्के गुण दहावीत मिळवून दाखवून दिले़ या यशाबद्दल परिसरातील नागरिकांनी मनीषा व तिच्या आईचा सत्कार केला़ यावेळी ज्येष्ठ पत्रकार जी़पी़मिसाळे, सुभाष कांबळे, धोंडिबा गायकवाड, हुल्लाजी धडेकर, संदीप बनसोडे, रवि देयके, सहानाम बनसोडे, विमलबाई बनसोडे, सुषमा गायकवाड, शीला वाघमारे, सदानंद देवके, विनोद मिसाळे उपस्थित होते़