शहरं
Join us  
Trending Stories
1
NEET UG 2026 re-exam Date: विद्यार्थ्यांनो, तयारीला लागा; नीट परीक्षा जूनमध्ये, एनटीएकडून नवीन तारीख जाहीर
2
Top Marathi News LIVE Updates: 'निवडणुका संपताच वसुली सुरू झालीये', दरवाढ होताच विरोधकांनी केंद्र सरकारला घेरले
3
Petrol Pump : आता प्रत्येक रविवारी पेट्रोल पंप बंद राहणार? व्हायरल मेसेजवर PIB ने दिलं मोठं स्पष्टीकरण
4
Sangli: वादळामुळे ९ महिन्यांचे बाळ पाळण्यासह हवेत उडाले, खाली पडल्यानंतरही सुखरुप होते, पण... 
5
'अमेरिका संपत चाललाय!' जिनपिंग यांच्या विधानाने खळबळ; पण ट्रम्प म्हणतात, "ते बरोबरच बोलले!"
6
Monsoon Update : आनंदाची बातमी! बळीराजाची प्रतीक्षा संपली, मान्सून उद्या अंदमानात धडकणार; हवामान विभागाची मोठी अपडेट
7
रजनीकांत यांच्या 'जेलर २'च्या सेटवर मोठी दुर्घटना, विजेचा झटका लागल्याने एका तरुणाचा मृत्यू
8
MI चा कॅप्टन झाल्यावर बुमराहनं सांगून PBKS चं प्लेऑफ्सचं गणित बिघडवलं; मग BCCI कडे केली खास डिमांड
9
धक्कादायक! पतीची मदत घेऊन प्रियकराचा काटा काढला, मृतदेह ड्रममध्ये भरून नाल्यात फेकला
10
Numerology: तुमची जन्मतारीख सांगेल तुमची 'ती' एक सवय; ज्यामुळे लोक तुमच्यावर होतात नाराज!
11
Petrol Diesel Price: देशभरात वाढले पेट्रोल-डिझेलचे दर, पण कुठे मिळतंय सर्वात स्वस्त आणि महाग; पाहा लिस्ट
12
पत्नीच्या प्रियकराला पार्टीसाठी घरी बोलावलं, दारू पाजली अन्... मुंबईतील खळबळजनक घटना!
13
"असं फक्त IPL मध्येच घडतं, PSL मध्ये नाही!" पडिक्कलचा प्रामाणिकपणा अन् शास्त्रींचा पाकिस्तानला टोला
14
Pm Modi Five Nation Tour : पीएम मोदींचा ५ देशांचा दौरा सुरू! 'UAE'मध्ये होणार भव्य स्वागत; कोणत्या क्षेत्रांवर लक्ष केंद्रित केले जाणार?
15
शेअर बाजाराचा 'जोश हाय'; Sensex-Nifty मधील तेजीनं गुंतवणूकदारांच्या अपेक्षा वाढल्या, 'या' क्षेत्रातील शेअर्स सुस्साट...
16
Petrol Diesel Price Hike: पहिले दूध, नंतर CNG आणि आता पेट्रोल-डिझेल महागलं... ज्याची भीती होती तेच झालं, ४८ तासांत ३ मोठे झटके
17
India-Russia Oil Import News: फक्त २४ तास बाकी! रशियन तेलाला 'ब्रेक'; भारतात पेट्रोल-डिझेलचा तीव्र तुटवडा निर्माण होणार?
18
Maharashtra Farmer: सहा मोठ्या धरणांतील गाळ शेतकऱ्यांना देणार; राज्य मंत्रिमंडळाचा निर्णय 
19
शनी जयंती २०२६: तुम्हाला माहीत आहे का? शनी जयंतीला पिंपळाखाली 'कणकेचाच दिवा' का लावतात?
20
Petrol Diesel Price: पेट्रोल- डिझेलच्या दरात वाढ; सर्वसामान्यांच्या खिशावर नेमका काय परिणाम होणार? जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

महामृत्युंजय' मंत्राच्या जपाने रुग्णांना मिळतंय 'जीवदान'? आरएमएलमध्ये होतेय संशोधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2019 06:45 IST

येत्या दोन महिन्यांत या संशोधनाचा अंतिम निष्कर्ष कळणार आहेत.

नवी दिल्ली : गंभीर आजारावर वैद्यकीय उपचार करण्याबरोबरच अनेकदा आस्थेने महामृत्युंजय मंत्राचा जप रुग्ण करतात. या मंत्राचा जप केल्याने खरंच रुग्णाच्या आरोग्यावर परिणाम होतो का? याचे संशोधन डॉ. राम मनोहर लोहिया रुग्णालयातील डॉक्टर करत आहेत. या मंत्राप्रति लोकांच्या श्रद्धा व विश्वासाला विज्ञानिक दृष्टीने सिद्ध करण्याचा प्रयत्न या संशोधनातून केला जाणार आहे. मेंदूचे विकार असलेल्या रुग्णांना हा मंत्र ऐकवण्याचा देशातील हा पहिलाच प्रयोग आहे.

येत्या दोन महिन्यांत या संशोधनाचा अंतिम निष्कर्ष कळणार आहेत. आरएमएलमधील न्यूरोसर्जन डॉ. अजय चौधरी यांच्या मार्गदर्शनाखाली डॉक्टरांची टीम याचा अभ्यास करत आहे. २०१६ मध्ये पीरियॉडिक फास्टिंगवर संशोधन करणाऱ्या जपानी डॉक्टरला नोबेल पारितोषिक मिळाले होते. या संशोधनात त्यांनी उपवास करणाºया लोकांच्या शरीरातील आजाराची निर्मिती करणाºया पेशी संपून जातात. खासकरून कर्करोगाच्या पेशी नष्ट होत असल्याचे सांगितले आहे.

आपल्या देशातही महामृत्युंजय मंत्र लोकांना जीवनदान देणारा म्हणून मानला जातो. मात्र याचा वैज्ञानिक दृष्टीने अभ्यास करण्यात आलेला नाही. त्यामुळे या मंत्राचे संशोधन करण्याचा निर्णय आम्ही घेतला. यासाठी इंडियन कौन्सिल आॅफ मेडिकल रिसर्चने (आयसीएमआर) निधी दिल्याची माहिती डॉ. चौधरी यांनी दिली आहे.

संस्कृत विद्यापीठाची मदत
गेल्या तीन वर्षापासून चाळीस लोकांची टीम हे काम करत आहे. मेंदूचे आजार असलेल्या रुग्णांना दोन गटात विभागून, त्या रुग्णांवर नियमित उपचार करण्यात आले; परंतु एका गटातील रुग्णांना महामृत्युंजय मंत्र ऐकवण्यात आले. यासाठी कुतुबमिनार स्थित संस्कृत विद्यापीठाची मदत घेण्यात आली आहे. महामृत्युंजय मंत्राचे पठण करण्यासाठी रुग्णांना संस्कृत विद्यापीठात पाठवण्यात आले. या मंत्राचा किती परिणाम या रुग्णांवर होतोय याचा मंत्र न म्हणणाऱ्या गटाबरोबर अभ्यास केला जाईल. त्यानंतरचा अहवाल मेडिकल जर्नलमध्ये पाठवण्यात येणार आहे.