शहरं
Join us  
Trending Stories
1
राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू 1 मे रोजी अयोध्या दौऱ्यावर, रामललांचं दंर्शन, हनुमानगढी मंदिरात आरती अन्...; असा असेल संपूर्ण कार्यक्रम!
2
भाजपच्या पीयूष गोयल यांच्याविरोधात भूषण पाटील; काँग्रेसकडून राज बब्बर यांनाही उमेदवारी...
3
राशिद खानच्या नेतृत्वाखाली अफगाणिस्तान ट्वेंटी-२० वर्ल्ड कप खेळणार, युवा खेळाडूंना संधी 
4
गडचिरोली सीमेवर चकमक; १० नक्षलवाद्यांचा खात्मा 
5
Video: पाळीव कुत्र्याचा सहा वर्षीय चिमुकलीवर हल्ला; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल...
6
'नरेंद्र मोदी मोठ्या मनाचा नेता, एक मेसेज पाठवला अन् काम झालं', काँग्रेसच्या माजी नेत्यानं सांगितला किस्सा
7
“भटकती आत्मा तर नरेंद्र मोदीच, प्रधानमंत्री कमी अन् प्रचारमंत्रीच जास्त”; नाना पटोलेंची टीका
8
आनंदाची बातमी...! ₹75000 पार जाणाऱ्या Gold Price मध्ये पुन्हा मोठी घसरण, पटा-पट चेक करा सोन्या-चांदीचा लेटेस्ट रेट 
9
देशात फक्त मोदी पॅटर्न चालतो, बाकी सगळे भंगारात; एकनाथ शिंदेंचा विरोधकांवर प्रहार
10
BANW vs INDW: भारताचा झंझावात कायम; पावसाची 'बॅटिंग' अन् बांगलादेशचा सलग दुसरा पराभव
11
दुर्दैवी! प्रसूती दरम्यान 'बत्ती गूल'; टॉर्चच्या प्रकाशात सिझर पण बाळासह आईचा मृत्यू
12
भारतीय संघ दोन तुकड्यांमध्ये अमेरिकेला रवाना होणार, पहिली बॅच २१ मे रोजी तर... 
13
अरविंद केजरीवालांना ठीक निवडणुकीपूर्वी का अटक केले? सुप्रीम कोर्टाचा ED ला थेट सवाल...
14
अरविंद सावंतांविरोधात तिकीट मिळालेल्या यामिनी जाधव यांची अशी आहे राजकीय कारकीर्द
15
कल्याणमध्ये तिरंगी लढत होणार; लोकसभेसाठी वंचितकडून आणखी ३ उमेदवारांची घोषणा
16
Team India for T20WC 2024 : वर्ल्ड कप स्पर्धेसाठी भारताचा संघ जाहीर, हार्दिक पांड्या उप कर्णधार, KL Rahul चा पत्ता कट
17
मोठी अपडेट्स : Rinku Singh ची होणार १५ मध्ये एन्ट्री? भारतीय संघात केला जाऊ शकतो बदल
18
सोढी बेपत्ता, अय्यर टेन्शनमध्ये; 'तारक मेहता...' अभिनेते तनुज महाशब्देंनी दिली प्रतिक्रिया
19
Rajnath Singh : "डायनासोरप्रमाणे काँग्रेस पृथ्वीवरुन नाहीशी होईल, हे बुडणारं जहाज"; राजनाथ सिंह यांचं टीकास्त्र
20
सांगलीत मोठा ट्विस्ट; विशाल पाटील यांची ताकद वाढली! वंचित बहुजन आघाडीने दिला पाठिंबा

...जेंव्हा सुषमा स्वराज यांची योजनाच 'हायजॅक' होते

By ऑनलाइन लोकमत | Published: July 06, 2019 10:49 AM

स्वराज यांनी लॉन्च केलेल्या 'स्टडी इन इंडिया' पोर्टलचे केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कौतुक केले होते. या योजनेचे अनेक फायदे असून उच्च शिक्षणासाठी भारत प्रमुख केंद्र म्हणून समोर येईल, असंही जावडेकर यांनी म्हटले होते.

नवी दिल्ली - भारतात परदेशी विद्यार्थ्यांना शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करण्याच्या उद्देशाने अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी एक योजना आणली आहे. या नव्या योजनेचे नाव 'स्टडी इन इंडिया' असं ठेवण्यात आले आहे. परंतु, ही योजना एक वर्षापूर्वीच सुरू झाल्याचे समोर आले असून भाजपच्या मंत्र्यांनीच आधीच्या मंत्र्यांची योजना हायजॅक केली का, असा प्रश्न उपस्थित होत आहे.

सीतारामन म्हणाल्या की, भारतात उच्च शिक्षणासाठी मोठे हब तयार होण्याची शक्यता आहे. त्यासाठी 'स्टडी इन इंडिया'चा प्रस्ताव लोकसभेत ठेवते. या कार्यक्रमामुळे परदेशातील विद्यार्थ्यांना भारतात उच्च शिक्षण घेण्यासाठी प्रोत्साहित करता येईल. यावरून स्पष्ट होते की, अर्थमंत्री सीतारामन 'स्टडी इन इंडिया' अशी काही योजना आणू इच्छित आहेत. परंतु, यामुळे एक प्रश्न उपस्थित होतोय, तो म्हणजे १८ एप्रिल २०१८ मध्ये सुषमा स्वराज यांनी अशीच काहीशी योजना आणली होती. त्यासाठी स्वराज यांनी 'स्टडी इन इंडिया पोर्टल' देखील सुरू केले होते. पीआयबीच्या वेबसाईटवर या संदर्भातील प्रेस रिलीज उपलब्ध आहे. ही योजना मनुष्यबळ विकास मंत्रालयाची असून सुषमा स्वराज आणि तत्कालीन मनुष्यबळ विकास राज्यमंत्री सत्यपाल सिंह यांनी ही योजना लॉन्च केली होती.

दरम्यान 'स्टडी इन इंडिया' आणि 'स्टडी इन इंडिया पोर्टल' या दोन्ही एकच योजना असतील तर निर्मला सीतारामन यांनी ही योजना नव्याने सुरू करत असल्याचे का म्हटले असा प्रश्न उपस्थित होत आहे. मागील एक वर्षापासून ही योजना सुरू आहे. स्वराज यांनी लॉन्च केलेल्या योजनेनुसार पहिल्या टप्प्यात १६० संस्थांमध्ये परदेशी विद्यार्थ्यांसाठी १५ हजार जागा रिक्त सोडण्यात येणार होत्या.

स्वराज यांनी लॉन्च केलेल्या 'स्टडी इन इंडिया' पोर्टलचे केंद्रीयमंत्री प्रकाश जावडेकर यांनी कौतुक केले होते. या योजनेचे अनेक फायदे असून उच्च शिक्षणासाठी भारत प्रमुख केंद्र म्हणून समोर येईल, असंही जावडेकर यांनी म्हटले होते.