शहरं
Join us  
Trending Stories
1
'फोनवर संभाषण झाले म्हणून वरिष्ठ मंत्र्यांवर आरोप करणे योग्य नाही';अंजली दमानियांच्या आरोपांवर दीपक केसरकरांचे प्रत्युत्तर
2
धुळे-सोलापूर महामार्गावर प्रचंड वाहतूक कोंडी; ७ तासांपासून वाहने खोळंबली, नागरिकांचे हाल
3
ज्याची भीती तेच घडलं, युद्ध आणखी पेटलं; इराणच्या सर्वात मोठ्या ब्रिजवर हल्ला, ८ मृत्यू ९५ जखमी
4
US Israel Iran War : इराणचा यू-टर्न! आधी म्हणालं 'वैमानिक ताब्यात', आता शोधण्यासाठी बक्षीस; अमेरिकेच्या पायलटबाबत सस्पेन्स
5
IPL 2026: रोहित शर्माचा फिटनेस तर बघा, चक्क एका हातानं पकडला झेल, व्हिडीओ व्हायरल
6
India Oil Supply News: भारतासाठी 'संजीवनी' ठरला हा छोटा देश; युद्ध असो की संकट, अविरत करतोय तेल अन् गॅस पुरवठा
7
"आणखी थोडा वेळ मिळाला, तर अमेरिका सहज होर्मुझ सामुद्रधुनी...", डोनाल्ड ट्रम्प यांचे इराणची चिंता वाढवणार विधान
8
म्हाडाचं घर घ्यायचा विचार? फॉर्म किती रुपयांना, अनामत रक्कम किती भरावी लागणार?
9
US Israel Iran War : डोनाल्ड ट्रम्प यांना विरोध केल्याचे फळ! इराणने उघडला फ्रान्ससाठी होर्मुझचा रस्ता; मॅक्रॉन यांना खास 'बक्षीस'
10
IPL 2026: चेन्नईच्या संघात एक मोठा बदल; कोण इन, कोण आउट? पाहा दोन्ही संघाची प्लेईंन इलेव्हन
11
MS Dhoni: सीएसकेच्या चाहत्यांसाठी गूड न्यूज? ट्रेनिंग सेशनसाठी धोनी मैदानात, पण खेळण्याबाबत सस्पेन्स कायम
12
फक्त एका दिवसासाठी अमेरिकेतून युवक भारतात आला; ताजमहाल पाहून निघून गेला, Video व्हायरल
13
Latest Marathi News LIVE Updates: अमेरिकेला पुन्हा झटका! इराणने दुसरे एफ-३५ लढाऊ विमान पाडले
14
जीवाशी खेळ! एक्स्पायरी डेट बदलून विकत होते कोल्ड ड्रिंक्स, बिस्किट; मोठ्या रॅकेटचा पर्दाफाश
15
Bhagwant Mann : "समोसा-पिझ्झाचा मुद्दा..."; राघव चड्ढांवर पंजाबचे मुख्यमंत्री भगवंत मान कडाडले, आतिशींचा गंभीर आरोप
16
'सिंधू' करार स्थगितीनंतर पाकिस्तानला आणखी एक धक्का! पुन्हा सुरू होतोय 'मोहरा प्रकल्प', जाणून घ्या
17
IPL 2026: चेन्नईला होतोय पश्चाताप! ज्याला संघातून काढलं, तोच खेळाडू दिल्लीसाठी ठरतोय मोठा जॅकपॉट
18
पाकव्याप्त काश्मीर लवकरच भारतात समाविष्ट होणार; AIIO चे मुख्य इमाम उमर इलियासी यांची भविष्यवाणी
19
युद्धभागात १०,००० हून अधिक कर्मचारी! टाटा समूहाच्या ३० कंपन्यांच्या सीईओंना तयार राहण्याचे आदेश
20
इराणमध्ये दिसली अमेरिकेची लढाऊ विमाने आणि हेलिकॉप्टर, कमी उंचीवर घिरट्या; व्हिडीओ आले समोर
Daily Top 2Weekly Top 5

नीटच्या ‘त्या’ प्रश्नपत्रिकांसाठी मोजले ३५ ते ६० लाख; CBI तपासात धक्कादायक गोष्टी उघड

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 26, 2024 05:25 IST

काही राज्यांतील विद्यार्थ्यांनी या प्रश्नपत्रिकेसाठी ५५ ते ६० लाख रुपये मोजले होते.

एस. पी. सिन्हा, लोकमत न्यूज नेटवर्क, पाटणा : नीट-यूजी परीक्षेत बिहारमधील काही विद्यार्थ्यांनी फुटलेली प्रश्नपत्रिका ३५ ते ६० लाख रुपये देऊन विकत घेतली होती, अशी महत्त्वपूर्ण माहिती सीबीआयने केलेल्या तपासातून उघड झाली आहे, तर दुसऱ्या राज्यांतील विद्यार्थ्यांनी या प्रश्नपत्रिकेसाठी ५५ ते ६० लाख रुपये मोजले होते. सुमारे १५० विद्यार्थ्यांना फुटलेली प्रश्नपत्रिका मिळाली याचे पुरावे सीबीआयला मिळाले आहेत. त्यातील काही जणांचे  झारखंडमधील हजारीबाग व लातूर येथे परीक्षा केंद्र होते. 

प्रश्नपत्रिका मिळालेल्यांपैकी काही जणांचे परीक्षा केंद्र गुजरातमधील गोध्रा, बिहारची राजधानी पाटणा येथे होते. या शहरांमध्ये विशिष्ट शाळांतच परीक्षा केंद्रे असावीत यासाठी काही विशेष प्रयत्न झाले होते का, याचाही सीबीआय तपास करत आहे. ज्या १५० जणांना प्रश्नपत्रिका मिळाली, त्यातील ८० ते ९० जणांना चांगले गुण मिळालेले नाहीत. 

मुख्य सूत्रधार अद्याप फरार

या कारस्थानाचा मुख्य सूत्रधार संजीव मुखिया अद्याप फरार आहे. त्याच्या काही साथीदारांना याआधीच अटक केली असून त्यामध्ये रॉकी, चिंटू यांचा समावेश आहे. रॉकी याने ओॲसिस शाळेत नेण्यात येणाऱ्या परीक्षेच्या प्रश्नपत्रिकांच्या प्रती चोरल्या होत्या. त्यानंतर चिंटूच्या माध्यमातून त्या बिहारमध्ये पाठविण्यात आल्या. चिंटू हा मुखियाच्या भाचीचा पती आहे. 

बहुतांश आरोपी नवादा जिल्ह्याचे रहिवासी

प्रश्नपत्रिका फुटल्याच्या प्रकरणातील बहुतांश आरोपी बिहारमधील नवादा जिल्ह्याचे रहिवासी आहे. बिहारमधील जलसंपदा विभागाचे तत्कालीन इंजिनिअर सिकंदर यादवेन्दू यांचा मेव्हणा असलेल्या संजीवचा मुलगा अनुराग याला ३५० गुण मिळाले आहेत. त्याच्यासोबत आयुष राज, शिवनंदनकुमार, अभिषेककुमार यांनीही नीट-यूजी परीक्षा दिली होती. त्यातील केवळ आयुष राजला ६०० गुण मिळाले आहेत. नीट-यूजी गैरप्रकारांच्या तपासाबाबत सीबीआयने सर्वोच्च न्यायालयात सादर केलेल्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

 

टॅग्स :neet exam paper leakनीट परीक्षा पेपर लीकCBIगुन्हा अन्वेषण विभागCBIसीबीआयCentral Bureau of Investigationकेंद्रीय गुन्हे अन्वेषण