पाण्यापायी आलेल्या बिबट्याच्या डोक्यात अडकला हंडा

By Admin | Updated: September 30, 2015 15:32 IST2015-09-30T15:32:49+5:302015-09-30T15:32:49+5:30

दुष्काळाचे चटके देशाच्या अन्य भागांमध्येही जाणवू लागले असून राजस्थानमध्ये पिण्याच्या पाण्याच्या शोधात आलेल्या बिबट्याचे डोक हंड्यात अडकल्याचा प्रकार समोर आला आहे.

Stuck in the head of a leopard | पाण्यापायी आलेल्या बिबट्याच्या डोक्यात अडकला हंडा

पाण्यापायी आलेल्या बिबट्याच्या डोक्यात अडकला हंडा

ऑनलाइन लोकमत

भातुली, दि. ३० - दुष्काळाचे चटके देशाच्या अन्य भागांमध्येही जाणवू लागले असून राजस्थानमध्ये पिण्याच्या पाण्याच्या शोधात आलेल्या बिबट्याचे डोक हंड्यात अडकल्याचा प्रकार समोर आला आहे. डोक्यात हंडा अडकलेल्या स्थितीत हा बिबट्या फिरत असून हंडा काढण्यासाठी वनविभागाचे पथकाला बोलवण्यात आले आहे. 

राजस्थानमधील राजसमंद गावात मंगळवारी एक बिबट्या पाण्याच्या शोधात आला. त्या बिबट्याला पाणी सापडल मिळालं असलं पाणी पिण्याच्या प्रयत्नात हंडा बिबट्याच्या डोक्यात अडकला. या प्रकारामुळे बिबट्याही भेदरला असून तो सैरावैरा पळत आहे. गावातील ग्रामस्थही घटनास्थळी जमले असले तरी बिबट्याच्या डोक्यात हंडा काढण्याची हिमंत कोण करणार हा प्रश्नच होता. शेवटी वनविभागाच्या पथकाला बोलवण्याचा निर्णय घेण्यात आला. 

Web Title: Stuck in the head of a leopard