बापरे बाप! एकदा, दोनदा नव्हे तर तब्बल आठव्यांदा महिलेला चावला साप

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 3, 2024 17:58 IST2024-12-03T17:57:14+5:302024-12-03T17:58:03+5:30

३५ वर्षीय महिलेला रविवारी एकदा, दोनदा नव्हे तर आठव्यांदा साप चावला.

stubborn snake bite 8th time snake bite eight times in maharajganj uttar pradesh | बापरे बाप! एकदा, दोनदा नव्हे तर तब्बल आठव्यांदा महिलेला चावला साप

फोटो - zeenews

उत्तर प्रदेशच्या महाराजगंजमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. सुमित्रा यादव या ३५ वर्षीय महिलेला रविवारी एकदा, दोनदा नव्हे तर आठव्यांदा साप चावला. दरवेळी प्रमाणे यावेळीही कुटुंबीयांनी महिलेला सामुदायिक आरोग्य केंद्र निचलौल येथे दाखल केले, तेथे तिच्यावर उपचार सुरू आहेत. या विचित्र घटनेने आरोग्य कर्मचारी आणि ग्रामस्थांना मोठा धक्का बसला आहे. एकाच महिलेला वारंवार साप चावल्याची घटना गावात चर्चेचा विषय बनली आहे.

सुमित्रा यादव सांगतात की, त्यांचे पती गोविंद यादव हे काम करण्यासाठी परदेशात राहतात आणि त्या आपल्या घरातील कामात व्यस्त असतात. रविवारीही त्या घरातील कामात मग्न असताना अचानक एक साप उजव्या हाताला चावला. या घटनेनंतर तिला तातडीने सामुदायिक आरोग्य केंद्र, निचलौल येथे आणण्यात आले, तेथे उपचार सुरू आहेत. पहिल्यांदा घडलेले नाही. याआधीही सात वेळा साप चावला होता.

महिलेने असंही सांगितलं की २०२१ पासून सतत ही घटना तिच्यासोबत घडत आहे. यावेळी सर्पदंशाच्या घटनेनंतर इमर्जन्सी ड्यूटीवर तैनात असलेले आरोग्य कर्मचारीही आश्चर्यचकित झाले, कारण एकाच महिलेला पुन्हा पुन्हा साप चावण्याची ही परिस्थिती अत्यंत दुर्मिळ आणि असामान्य आहे. महिलेच्या प्रकृतीत सुधारणा झाली असून, आता ती पूर्णपणे बरी होत आहे.

एकाच महिलेला साप पुन्हा पुन्हा कसा चावतो, याचं गावकऱ्यांना आश्चर्य वाटतं. काही लोक याला दुर्मिळ घटना मानत आहेत. एकाच व्यक्तीला वारंवार चावा घेणं खरोखरच असामान्य आहे. ही घटना महाराजगंज जिल्ह्यात आश्चर्याची तर ठरली आहेच, पण या घटनांमागे काही विशिष्ट कारण आहे का, असा प्रश्न निर्माण झाला आहे. झी न्यूजने याबाबतचे वृत्त दिले आहे. 
 

Web Title: stubborn snake bite 8th time snake bite eight times in maharajganj uttar pradesh

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.