शहरं
Join us  
Trending Stories
1
“महाराष्ट्रात सामाजिक वीण उसवतेय, समाजात कटूता निर्माण होणारे निर्णय घेतले जातायत”: शरद पवार
2
IND vs PAK : कुलदीप यादवची हॅटट्रिक हुकली; पण पाक विरुद्ध ३ विकेट्स घेत साधला साधला मोठा डाव
3
“ओबीसी असो किंवा मराठा असो, सगळ्या समाजाचे हित हेच सरकार करू शकते”: CM देवेंद्र फडणवीस
4
IND vs PAK : परंपरा मोडत भारतीयांची भावना जपली! सूर्यानं हात न मिळवता पाक कॅप्टनकडे फिरवली पाठ (VIDEO)
5
हृदय पिळवटून टाकणारी घटना; चिमुकलीला जिवंत गाडले, ग्रामस्थांना रडण्याचा आवाज आला अन्...
6
IND vs PAK : पाकच्या National Anthem ऐवजी DJ वाल्या बाबूनं वाजवलं भलतंच गाणं; व्हिडिओ व्हायरल
7
IND vs PAK : 'हार्दिक' स्वागत! पहिल्याच चेंडूवर सैम अयूबच्या पदरी भोपळा
8
“पंतप्रधान मोदी यांनी परराष्ट्र धोरणबाबत विचार करणे अपेक्षित, नेपाळ अडचणीत...”: शरद पवार
9
"गढूळ विचाराच्या लोकांवर थुंकतो; आता व्हायचे ते होऊ द्या", जरांगे पाटलांची हाकेंवर जहरी टीका
10
“अजून काय अन्याय व्हायचा राहिला? आमच्या हक्काचे दिले नाही”; मनोज जरांगेंचे अजितदादांना उत्तर
11
IND vs PAK : दुबईत पाकच्या बाजूनं लागला नाणफेकीचा कौल; सेम गेम प्लॅनसह मैदानात उतरली टीम इंंडिया
12
मारुतीच्या या 8-सीटर कारच्या किंमतीत मोठी कपात, ₹61,000 पर्यंत होईल फायदा; जाणून घ्या नवी किंमत
13
'कोणताही भारतीय खेळाडू पाकिस्तानविरुद्ध खेळू इच्छित नाही, पण...', सुरेश रैनाचे मोठे वक्तव्य
14
अमेरिकेतील टेक्सास राज्यात 'शरिया कायद्यावर' बंदी; मुस्लिम संघटनांचा आक्रोश
15
क्रिकेटच्या नावाखाली उद्धव ठाकरे राजकारण करत आहेत; चंद्रशेखर बावनकुळेंची टीका
16
"व्यक्तीचा निर्णय जनहिताचा, राष्ट्रहिताचा असेल, तर ती संस्कृती"; CM योगींच्या हस्ते २९८ कोटींच्या प्रकल्पांचे लोकार्पण 
17
“चाळीस चोर संग घेऊन येवल्याचा आलिबाबा छगन भुजबळ लय बोलतो”; मनोज जरांगेंची बोचरी टीका
18
5.8 तीव्रतेच्या भूकंपाने आसाम हादरला, उत्तर बंगाल आणि भूटानमध्येही जाणवले धक्के
19
त्यांच्याकडे अनुभव आणि ताकद; मायावतींनी देशातील दलितांचे नेतृत्व करावे- रामदास आठवले
20
“...तर पहिल्यांदा मिलिंद नार्वेकरांचा राजीनामा घ्या”; कुणी दिले संजय राऊतांना आव्हान?

‘बंगाली प्राइड’वर अन् विकास-अराजकतेमध्ये संघर्ष; दक्षिण बंगालच्या जागांवर तृणमूलची मदार

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2024 05:52 IST

मतुआ, मुस्लीमबहुल मतदार ठरणार ‘गेमचेंजर’

- याेगेश पांडेलोकमत न्यूज नेटवर्ककोलकाता : लोकसभा निवडणुकीत पश्चिम बंगालमध्ये आतापर्यंत दहा जागांवर मतदान झाले असून उर्वरित ३२ जागांवर निवडणूक शिल्लक आहे. बहुतांश जागांवर तृणमूल काँग्रेस व भाजप या दोन पक्षांमध्ये थेट लढत असली तरी काँग्रेस-डाव्यांच्या आघाडीने अनेक ठिकाणी आव्हान दिले आहे. अशा स्थितीत तृणमूलकडून स्थानिक मुद्द्यांवर जोर देत ‘बंगाली प्राईड’चा नारा देण्यात येत आहे. तर भाजपकडून विकास व अराजकतेच्या मुद्यावरच मत मागण्यात येत आहे.

रालोआने ४०० पारचा नारा दिला असल्याने बंगालमधून कमीत कमी २५ जागा मिळविण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. १९७१ नंतर बंगालमध्ये लोकसभा निवडणुकीत कुठल्याही राष्ट्रीय पक्षाने बहुमत मिळविलेले नाही. अशा स्थितीत भाजपच्या प्रत्येक रणनीतीवर तृणमूल व काँग्रेस-डाव्यांची बारीक नजर आहे. राज्यातील दक्षिण बंगाल भागात तृणमूलचे वर्चस्व असून तेथील १५ जागांवरदेखील विजय मिळविण्याचे तृणमूलचे प्रयत्न सुरू आहेत. शिवाय मुस्लिमबहुल मतदारसंघात सीएएच्या मुद्यावरून भाजपविरोधात जोरदार प्रचार सुरू आहे. 

चित्रपट कलाकार रिंगणातमतदारांना आकर्षित करण्यासाठी तृणमूलने सहा चित्रपट कलाकारांना रिंगणात उतरविले आहे. यात शत्रुघ्न सिन्हा, शताब्दी रॉय, रचना बॅनर्जी, दीपक अधिकारी, सायोनी घोष, जून मालिया यांचा समावेश आहे. तर भाजपने लॉकेट चॅटर्जी व हिरन चॅटर्जी यांना तिकीट दिले आहे. सीपीआय (एम)ने ओटीटीवरील लोकप्रिय चेहरा देवदत्त घोष यांना उमेदवारी दिली आहे

हिंसाचार प्रचाराचा मुद्दामागील काही आठवड्यात पश्चिम बंगालमधील विविध भागांमध्ये हिंसाचाराच्या घटना झाल्या. संदेशखालीच्या मुद्यावरून भाजपने तृणमूलला टार्गेट केले होतेच. आता या घटनांनादेखील प्रचाराचा मुद्दा बनविण्यात आला आहे. 

राष्ट्रीय पातळीवर झालेला विकास, बंगालमधील गरिबांचे इतर राज्यांत स्थलांतर, राज्यातील बेरोजगारी व अराजकता या मुद्यांवर भाजपकडून मतं मागण्यात येत आहेत. मतुआ समाजाची मते मिळविण्यावर भाजपचा भर आहे. तर काँग्रेस व डाव्यांच्या आघाडीकडून दोन्ही पक्षांच्या भूमिकेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित करत उर्वरित ३२ मतदारसंघ पिंजून काढण्यात येत आहेत. 

टॅग्स :West Bengal Lok Sabha Election 2024पश्चिम बंगाल लोकसभा निवडणूक निकाल २०२४