धोरण जहाज बांधणीचे..

By Admin | Updated: July 11, 2014 02:16 IST2014-07-11T02:16:42+5:302014-07-11T02:16:42+5:30

कांडला येथे विशेष आर्थिक क्षेत्रचा विकास होईल; शिवाय जहाज बांधणी धोरणाची घोषणा येत्या वर्षात केली जाणार असल्याचेही जेटलींनी सांगितले.

Strategy to build a ship .. | धोरण जहाज बांधणीचे..

धोरण जहाज बांधणीचे..

कांडला येथे विशेष आर्थिक क्षेत्रचा विकास होईल; शिवाय जहाज बांधणी धोरणाची घोषणा येत्या वर्षात केली जाणार असल्याचेही जेटलींनी सांगितले.
 
घरे : येत्या 8 वर्षात देशातील सर्व नागरिकांना घर देण्याचे आश्वासन देत त्यासाठी चार हजार कोटींची तरतूद केल्याचे अर्थमंत्री अरुण जेटली यांनी येथे जाहीर केले. यासाठी राष्ट्रीय गृह बँकेच्या माध्यमातून कमी खर्चाच्या स्वस्त घरांची एक योजना आखण्याचा प्रस्ताव तयार केल्याचे सांगितले.
 
स्वस्त कर्ज : शहरी गरीब, आर्थिकदृष्टय़ा दुर्बल उत्पन्न असलेल्यांसाठी स्वस्त घरे उपलब्ध करून देऊन त्याकरिता त्यांना स्वस्त कजर्ही देण्याकरिता राष्ट्रीय गृह बँकेकडे चार हजार कोटींची तरतूदही केली असल्याचे सांगितले. या क्षेत्रत परदेशी गुंतवणुकीची सोय करून दिली आहे.
 
गृहयोजना: ग्रामीण गृहयोजनेमुळे मोठय़ा संख्येने ग्रामीण नागरिकांना लाभ मिळाल्याचे सांगताना अर्थमंत्र्यांनी 2क्14-15 मध्ये राष्ट्रीय गृह बँकेला दिली जाणारी रक्कम वाढवून ती आठ हजार कोटी करण्यात आल्याची माहिती दिली. 2क्22 र्पयत सर्वाना घरे देण्यासाठी योजना आहे.
 
विमानसेवा : सरकारने खासगी-सार्वजनिक सहभागातून महानगरे आणि अन्य शहरांमधील
विमानतळांच्या विकासासाठी नव्या योजनेची घोषणा केली आहे. सरकार विमानसेवेच्या विस्तारावर भर देणार असून, नागरी विमान वाहतूक क्षेत्रसाठी तरतूद 11.4 टक्के वाढवत 9,474 कोटी; करण्यात आली आहे.
 
लोहमार्ग : भौगोलिक दुर्गमतेमुळे विकासाच्या नकाशावर कायम मागे रखडलेल्या ईशान्य भारताच्या वाटय़ाला मोदी सरकारच्या पहिल्याच अर्थसंकल्पात  भरीव दान पडले आहे. ईशान्य भारतातील सात राज्यांची अंतर्गत वाहतूक व्यवस्था सुधारण्यासाठी रस्ते आणि लोहमार्ग उभारणी 
 
शेती:ईशान्य भारतात सेंद्रिय शेतीच्या प्रयोगांनाही अर्थमंत्र्यांनी निधीचे पाठवळ पुरवले आहे. मणिपूर येथे राट्रीय क्रीडा विद्यापीठाची स्थापना आणि ईशान्य भारताचा सांस्कृतिक वारसा जपणारी  ‘अरुणप्रभा’ नावाची स्वतंत्र दूरचित्रवाणी वाहिनी यासाठीही केंद्रीय अर्थसंकल्पात स्वतंत्र तरतूद करण्यात आली आहे.
 

 

Web Title: Strategy to build a ship ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.