story air india express flight from dubai skidded while landing on kozhikode runway | अपघातात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे दोन तुकडे झाले, पण...

अपघातात एअर इंडिया एक्स्प्रेसच्या विमानाचे दोन तुकडे झाले, पण...

तिरुअनंतपूरमः शुक्रवारी रात्री केरळमधील कोझिकोड धावपट्टीवर मोठा अपघात झाला. कोझिकोडमधील करीपूर विमानतळावर जाताना एअर इंडिया एक्सप्रेसचे विमान रन वेवरून घसरले. उड्डाणानंतर विमान घसरल्यानंतर विमानतळाशेजारील भागात घुसले. अपघातानंतर या विमानाचे दोन भागात तुकडे झाले, पण सुदैवानं त्यात मोठी आग लागल्याचीही माहिती नाही. अपघातानंतर 10हून अधिक रुग्णवाहिका घटनास्थळी दाखल झाल्या आहेत. अपघातग्रस्त झाल्यानंतर विमानात मोठी आग लागल्याची माहिती अद्याप समोर आलेली नाही, त्यामुळे मोठी जीवितहानी टळल्याचं सांगण्यात येत आहे. त्यातील एका पायलटचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे. 
 
डीजीसीएने आपल्या निवेदनात म्हटले आहे की, “करीपूर विमानतळाच्या रनवे क्रमांक 10वर उतरत असताना दुबईहून कोझिकोड येथे येणारे विमान घसरले आणि त्याचे दोन तुकडे झाले. विमानामध्ये क्रू मेंबर्ससह एकूण 191 प्रवासी होते. लँडिंगच्या वेळी दृश्यमानता 2000 मीटरएवढी होती. "
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, दुबई-कोझिकोड एअर इंडिया फ्लाइट (IX-1344) संध्याकाळी 7.45 वाजता करीपूर विमानतळावर उतरताना अपघात झाला. 

वाचकहो, 'लोकमत'ला टेलिग्रामवर फॉलो करताय ना?... अजून जॉईन केलं नसेल तर क्लिक करा ( @LokmatNews ) आणि मिळवा महत्त्वाचे अपडेट्स अन् ताज्या बातम्या!

Web Title: story air india express flight from dubai skidded while landing on kozhikode runway

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.