पडद्यामागून खेळ बंद करा, समोरासमोर लढा; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला ललकारले

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 25, 2026 09:04 IST2026-03-25T09:04:11+5:302026-03-25T09:04:11+5:30

निवडणुका निष्पक्ष पार पाडण्याबाबत आयोग कधीही तटस्थपणे वागलेला नाही, याचे पुरावेही सदर पत्राच्या रुपाने मिळाले आहेत.

stop playing games behind the scenes fight face to face said cm mamata banerjee challenges bjp | पडद्यामागून खेळ बंद करा, समोरासमोर लढा; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला ललकारले

पडद्यामागून खेळ बंद करा, समोरासमोर लढा; मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी भाजपला ललकारले

कोलकाता :  निवडणूक आयोगाच्या मार्च २०१९मधील एका पत्रावर भाजपच्या केरळ शाखेचा शिक्का आढळून आला आहे. या प्रकरणामुळे निवडणूक आयोगावर कोणता पक्ष पडद्यामागून नियंत्रण ठेवत आहे हे उजेडात आले आहे, अशी टीका पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी मंगळवारी केली.

ममता बॅनर्जी यांनी बागडोगरा येथे प्रचार दौऱ्यावर जाण्याआधी कोलकाता विमानतळावर पत्रकारांना सांगितले की,  निवडणुका निष्पक्ष पार पाडण्याबाबत आयोग कधीही तटस्थपणे वागलेला नाही, याचे पुरावेही सदर पत्राच्या रुपाने मिळाले आहेत. विशिष्ट लोकांनी पडद्यामागून कारवाया करण्याची गरज नाही. 

आमच्याशी थेट लढत द्या, असेही आव्हान ममता बॅनर्जी यांनी दिले. भाजप नेते शुभेंदू अधिकारी यांचे निकटवर्तीय असलेल्या बीडीओ अधिकाऱ्याची बदली नंदिग्राम येथून भवानीपूर मतदारसंघात करण्यात आली, असा दावा त्यांनी केला. निवडणूक आयोगाच्या पत्रावर भाजपचा शिक्का, ही लिपिकाची चूक नव्हे, तर जाणीवपूर्वक राजकीय हेतूने केलेले कृत्य आहे, असाही दावा त्यांनी केला.

आसाम काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गोगोईंची संपत्ती ७.५ कोटी

गुवाहाटी :  आसाम प्रदेश काँग्रेसचे अध्यक्ष व खासदार गौरव गोगोई आणि त्यांच्या पत्नी एलिझाबेथ क्लेअर गोगोई यांच्या मालमत्तेत वाढ होऊन ती २०२६मध्ये ७.५७ कोटींवर पोहोचली आहे. २०२४ मध्ये ही मालमत्ता ४.६६ कोटींची होती. यातील मोठा वाटा पत्नीचा असल्याचे गौरव गोगोई यांनी आपल्या उमेदवारी अर्जासोबत सादर केलेल्या प्रतिज्ञापत्रात म्हटले आहे.
 
आसाममधील सर्वात श्रीमंत उमेदवारांपैकी असलेल्या एआययूडीएफ प्रमुख बद्रुद्दीन अजमल यांची मालमत्ता २२२.३३ कोटींपेक्षा जास्त आहे. मंगळवारी काँग्रेसच्या तीन उमेदवारांचे अर्ज छाननीदरम्यान फेटाळण्यात आले, ज्यात मुख्यमंत्री हिमंत बिस्वा सरमा निवडणूक लढवत असलेल्या जलुकबारी मतदारसंघातील एका उमेदवाराचा समावेश आहे, असे निवडणूक आयोगाने सांगितले.

 

Web Title : सामने से मुकाबला करो, पीछे से खेलना बंद करो: ममता की भाजपा को चुनौती।

Web Summary : ममता बनर्जी ने भाजपा पर चुनाव आयोग को नियंत्रित करने का आरोप लगाया क्योंकि भाजपा की मुहर वाला एक पत्र सामने आया। उन्होंने भाजपा को सीधी लड़ाई के लिए चुनौती दी। अलग से, असम कांग्रेस नेता गोगोई की संपत्ति बढ़कर ₹7.5 करोड़ हो गई। मुख्यमंत्री सरमा के खिलाफ एक सहित तीन कांग्रेस नामांकन खारिज कर दिए गए।

Web Title : Face us directly, stop playing from behind: Mamata challenges BJP.

Web Summary : Mamata Banerjee accuses BJP of controlling Election Commission after a letter surfaced with a BJP stamp. She challenged BJP for a direct fight. Separately, Assam Congress leader Gogoi's assets rose to ₹7.5 crore. Three Congress nominations were rejected, including one against CM Sarma.