शहरं
Join us  
Trending Stories
1
सहा वर्षांनी...! भारत-चीन हवाई कनेक्टिव्हिटी पुन्हा बहाल! इंडिगोचे विमान ग्वांगझूमध्ये उतरले; एअर चायनाचीही दिल्ली-बीजिंग सेवा सुरू
2
रविंद्र जडेजाची बहीण काँग्रेसच्या तिकीटावर लढली, हरली! गुजरातमध्ये १० महानगरपालिकांवर भाजपचा ताबा
3
१५ ऑगस्टपर्यंत रिक्षा, टॅक्सी चालकांना मराठी शिकण्याची संधी; सरनाईक यांनी दिली १०० दिवसांची सवलत
4
चेअर कार, स्लीपर, मेट्रो झाली, आता वंदे भारत कार्गो येणार, मालवाहतूक क्षमता अन् वेग किती?
5
भारतात उष्णतेची लाट, तिकडे चीनमध्ये महापूर, रस्ते, घरे, वाहने पाण्याखाली
6
Top Marathi News LIVE Updates: वरूड-मोर्शी महामार्गावर भीषण अपघात, एकाच कुटुंबातील ३ जण ठार, एक जखमी
7
Post Officeची जबरदस्त योजना : एकदाच करा गुंतवणूक आणि दरमहा मिळवा ₹९,२५०; ५ वर्षांनी संपूर्ण पैसेही परत
8
"आक्षेप घेणाऱ्यांनी हे पुस्तक वाचलंय का?"; विनाकारण वाद करु नका म्हणत मुख्यमंत्री फडणवीसांचे खडे बोल
9
सुटलात...! पूर्वीच्या काळी सायकल चालवायला देखील लायसन लागायचे, देशपांडेंना आजोबांच्या ट्रंकात सापडले...
10
Gold Silver Price Today: ₹५००० पेक्षा अधिकनं घसरला चांदीचा भाव; सोन्याच्या दरातही मोठी घसरण; आज इतक्या रुपयांना मिळतंय १० ग्रॅम Gold
11
६.८३-इंच AMOLED डिस्प्ले, १०,२०० mAh बॅटरी; Vivo Y600 लॉन्च, जाणून घ्या किंमत!
12
"उद्धव ठाकरे एवढे मोठे नाहीत की त्यांच्यासाठी...."; संजय निरूपम यांचा सणसणीत टोला
13
पाण्यावरून दोन कुटुंबात वाद, मग अख्खा गाव भिडला, शेवटी सैन्याला करावं लागलं पाचारण, ४२ जणांचा मृत्यू   
14
मुंबईतून सुटणारी वंदे भारत ट्रेन आता कायस्वरुपी २० कोचसह धावणार; प्रवासी क्षमता किती वाढणार? 
15
Bank of Baroda मध्ये जमा कर ₹१,००,००० आणि मिळवा ₹५१,६४४ चं फिक्स व्याज, सरकारी गॅरेंटीसह बंपर रिटर्न
16
खासगी शाळांमध्ये आता मराठी शिकवणे बंधनकारक; नियम मोडणाऱ्या शाळेला बसणार दणका
17
तुमची गुप्त ऊर्जा जागृत आहे का? राशीनुसार करा ‘हे’ साधे-सोपे उपाय; नशिबाची साथ-भरघोस लाभ!
18
पाकिस्तानकडे ५-६ दिवस पुरेल एवढेच कच्चे तेल! भारताकडे मागणार? अर्थमंत्री हतबल, जनतेत घबराट
19
'खरातच्या सल्ल्यानुसार बारामतीमधील एका नेत्याने केली होती अजितदादांच्या घराबाहेर पूजा, रोहित परावांचा मोठा गौप्यस्फोट
Daily Top 2Weekly Top 5

वर्षानुवर्षे निवेदने झाली मात्र खंडपीठ जनतेच्या हाती

By admin | Updated: July 2, 2015 23:47 IST

पुणे : गेल्या कित्येक वर्षापासून मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्याला मिळावे यासाठी यापूर्वीच्या पुणे बार असोसिएशनच्या माजी अध्यक्षांनाही निवेदने, पत्रव्यवहार, लाक्षणिक उपोषण धरणे आंदोलने झाली. हे सर्व सनदशीर मार्गाने घडत आले तरी त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. त्याचाच परिपाक म्हणून कदाचित यंदा आंदोलनाची भूमिका जनतेलाही पटली आणि सर्वसामान्य जनतेचाही पाठिंबा ही मिळत आहे हे आंदोलन आता केवळ वकिलांपुरते मर्यादित राहिले नसून जनतेच्याच हातात गेले आहे त्यामुळे आता माघार नाहीच असे पुणे बार असोसिएशनच्या माजी अध्यक्षांनी मत व्यक्त केले आहे.

पुणे : गेल्या कित्येक वर्षापासून मुंबई उच्च न्यायालयाचे खंडपीठ पुण्याला मिळावे यासाठी यापूर्वीच्या पुणे बार असोसिएशनच्या माजी अध्यक्षांनाही निवेदने, पत्रव्यवहार, लाक्षणिक उपोषण धरणे आंदोलने झाली. हे सर्व सनदशीर मार्गाने घडत आले तरी त्याला प्रतिसाद मिळत नव्हता. त्याचाच परिपाक म्हणून कदाचित यंदा आंदोलनाची भूमिका जनतेलाही पटली आणि सर्वसामान्य जनतेचाही पाठिंबा ही मिळत आहे हे आंदोलन आता केवळ वकिलांपुरते मर्यादित राहिले नसून जनतेच्याच हातात गेले आहे त्यामुळे आता माघार नाहीच असे पुणे बार असोसिएशनच्या माजी अध्यक्षांनी मत व्यक्त केले आहे.
ॲड म. वि. अकोलकर (माजी अध्यक्ष-१९७८-७९ ) : विधीमंडळात १९७८ मध्ये पुणे व औरंगाबादला खंडपीठ मिळावे असा ठराव झाला त्याच वर्षी पुणे बार असोसिएशनच्या अध्यक्षस्थानी होतो. त्यामुळे आमचा उत्साह वाढला होता. मात्र कालांतराने हा निर्णय केवळ कागदावरच उरला. त्यामुळे सध्याचे सुरू असलेल्या आंदोलनाला वेगळीच धार मिळाली आहे. सातत्याने मागणी करूनही जनतेच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष करणे, अटींच्या शर्ती करून शासन किंवा उच्च न्यायालयाने भेटी नाकारणे हे चूकीचेच आहे.
ॲड औदुंबर खूने-पाटील (माजी अध्यक्ष -२००५-०६) : अध्यक्ष असताना, शासनाकडे लेखी निवेदने दिली होती. आंदोलन केले होते. गोडाऊनच्या जागेसाठीचा ठराव केला होता. इतक्या वर्षानंतरही खंडपीठ न देणे ही बाबच खटकणारी आहे. उच्च न्यायालयातील प्रलंबित खटल्यांपैकी ४० टक्के खटले हे एकट्या पुणे व जिल्‘ातील आहेत. त्यामुळे खटल्यांचा/याचिकांचा निपटारा जलदगतीने होण्यासाठी व तातडीने न्याय मिळण्यासाठी पुण्यात खंडपीठाची गरज आहे. मुळात सध्याचे आंदोलन हे केवळ वकिलांचे उरलेले नाही तर आता ते जनतेचे झाले असून जनतेच्याच कोर्टात गेले आहे.
ॲड घाडगेपाटील (माजीअध्यक्ष २००३-०४) : त्या वर्षी आम्ही धरणे आंदोलन केले. लेखी पत्रव्यवहार केला होता. २०१३ मध्ये तर उच्च न्यायालयाने त्रिसदस्यीय समिती नेमली मात्र अद्याप त्याचा निकाल गुलदस्त्यात आहे. हा निकाल देण्यासही इतका का उशीर होतोय हे ही स्पष्ट सांगायला हवे. न्यायाचे विकेंद्रीकरण व्हायला हवे. यासाठी प्रत्येक जिल्‘ात खंडपीठ दिले तरी हरकतच नसावी.