शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राज्य-थोडक्यात-विदर्भ

By admin | Updated: February 18, 2015 00:13 IST

राज्य-थोडक्यात-विदर्भ

राज्य-थोडक्यात-विदर्भ

टपाल कार्यालयाची
मागणी धूळ खात
तुमसर : महाराष्ट्र व मध्य प्रदेशच्या अंतिम सीमेवरील आदिवासीबहुल परिक्षेत्रातील ३ हजार २४२ ग्रामीण जनतेचे भवितव्य भरकटत असून विकास प्रवाहाच्या झोतात आलेले नाही. याच आदिवासीबहुल भागात २० वर्षांपासून टपाल कार्यालयाची मागणी धूळ खात पडली आहे.

अंगणवाडी इमारतीला
दोन वर्षात तडे
आरमोरी : तालुक्यातील वडधा येथे दोन वर्षापूर्वी बांधण्यात आलेल्या अंगणवाडीच्या इमारतीला तडे गेले आहेत. त्यामुळे अंगणवाडीत शिक्षण घेणाऱ्या बालकांच्या जीवाला धोका निर्माण झाला आहे. निकृष्ट बांधकामामुळे शासनाचा लाखो रूपयांचा निधी पाण्यात गेल्याबद्दल खंत व्यक्त केली जात आहे.

दारूबंदी मंडळाच्या
महिलांना धमकी
वर्धा- दारूबंदी मंडळाच्या सदस्य महिला घरासमोरून जात असल्याचे पाहून चिडलेल्या दांपत्याने धमकी दिल्याची घटना पवनार येथे रविवारी घडली. संगीता धाकतोड या मंडळाच्या सदस्यांसह नामदेव सातघरे यांच्या घरासमोरून जात होत्या. दरम्यान नामदेव सातघरे आणि त्याची पत्नी नंदा सातघरे यांनी या महिलांना अडवून यापुढे घरासमोरून जाल तर पाहून घेऊ, अशी धमकी दिली. याप्रकरणी धाकतोड यांच्या तक्रारीवरून सेवाग्राम पोलिसांनी सातघरे दांपत्याविरुद्ध गुन्हा दाखल केला.

दोघांचा आजन्म कारावास रद्द
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने अमरावती येथील हत्याप्रकरणात दोन आरोपींची आजन्म कारावासाची शिक्षा रद्द केली आहे. अनिल बबनराव पटवर्धन (३६), रा. चांदूर रेल्वे (जि. अमरावती) व दादाराव हरिदास इंदुरकर (३७), रा. खडकी (अकोला) अशी आरोपींची नावे आहेत. मृताचे नाव प्रेमकुमार जोशी होते. ५ नोव्हेंबर २००७ रोजी कान्हा अपार्टमेंटमध्ये आरोपींनी जोशी यांना हात-पाय दोरखंडाने बांधून जाळल्याचा आरोप होता. आरोपींनी सात हजार चौरस फुटाचा प्लॉट हडपण्यासाठी हे कृत्य केल्याचे जोशी यांनी मृत्यूपूर्व बयानात सांगितले होते.

पतीची जन्मठेप कायम
नागपूर : मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने पत्नीची हत्या करणाऱ्या पतीची जन्मठेप कायम ठेवली आहे. ही घटना वर्धा जिल्ह्यातील आहे. शरद केशव नेरीकर (४०) असे आरोपीचे नाव असून तो मानोरा, ता. हिंगणघाट येथील रहिवासी आहे. मृताचे नाव सुरेखा होते. ५ फेब्रुवारी २०१० रोजी आरोपी सुरेखाला तिच्या माहेरगावातून सोबत घेऊन गेला होता. ९ फेब्रुवारी २०१० रोजी धामणगावाजवळ सुरेखाचा मृतदेह जळालेल्या अवस्थेत आढळला होता. शरदला सुरेखाच्या चारित्र्यावर संशय होता.

तरुणीचा रेल्वेच्या धडकेने मृत्यू
नागपूर : कळमन्यातील कामनानगर क्रॉसिंगवर रेल्वेची धडक बसल्यामुळे पुष्पा उमनलाल यादव (वय १८, रा. विजयनगर) हिचा मृत्यू झाला. सोमवारी सकाळी ७.२० वाजता ही घटना उघडकीस आली. तिचा भाऊ ओकेश (वय २३) याच्या तक्रारीवरून कळमना पोलिसांनी अकस्मात मृत्यूची नोंद केली.