शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

राज्य-थोडक्यात-विदर्भ

By admin | Updated: February 16, 2015 21:12 IST

राज्य-थोडक्यात-विदर्भ

राज्य-थोडक्यात-विदर्भ

शहरात चोरट्यांचा हैदोस
नागपूर : शहरातील विविध भागात चोरट्यांनी हैदोस घातला असून वाडी, अंबाझरी आणि कळमन्यात घरफोडी करून लाखोंचा ऐवज लंपास केला. डिफेन्स वसाहतीत राहाणारे दीपक महादेव डोंगरे (वय ४४) हे १२ फेब्रुवारीला सहपरिवार बाहेरगावी गेले होते. चोरट्यांनी त्यांच्या दाराचा कुलूप कोंडा तोडून सोन्या-चांदीचे दागिने तसेच ५०० रुपये, असा एकूण १ लाख, २२ हजारांचा ऐवज चोरून नेला. रविवारी रात्री ७.३० वाजता ही घटना उघडकीस आली. डोंगरे यांच्या तक्रारीवरून वाडी पोलिसांनी गुन्हा दाखल केला.

पर्समधून मंगळसूत्र लंपास
नागपूर : गर्दीचा लाभ उठवत एका महिलेच्या पर्समधून तिचे ५५ हजारांचे मंगळसूत्र चोरट्यांनी लंपास केले. ज्योती देवीदास हेमणे (वय ४०, रा. हिंगणघाट, वर्धा) या सीताबर्डीतील बाजारपेठेत रविवारी दुपारी ४ वाजता खरेदी करीत असताना ही घटना घडली. हेमणे यांच्या तक्रारीवरून सीताबर्डी पोलिसांनी चोरीचा गुन्हा दाखल केला.

चाकूहल्लयात तरुण गंभीर जखमी
नागपूर : क्षुल्लक कारणावरून एका तरुणाला दोघांनी चाकूने मारून गंभीर जखमी केले. अंबाझरी पोलीस ठाण्याच्या हद्दीत शनिवारी रात्री १० च्या सुमारास ही घटना घडली. वाडीतील शिवाजी नगरात राहाणारा पलाश तुकारामजी अनरसकर (वय १९) आसीफ खान नामक मित्रासोबत फुटाळा चौपाटीवर फिरायला गेला होता. तेथून परत येत असताना भरतनगरात आरोपींनी पलाशच्या पाठीवर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी केले.


कुरखेडा तालुक्यात
आठ मातामृत्यू
कुरखेडा (गडचिरोली) : आरोग्य विभागाच्या हलगर्जीपणामुळे कुरखेडा तालुक्यात चालू वर्षात आठ मातांचा मृत्यू झाला असल्याची माहिती प्राप्त झाली आहे. कोरची तालुक्यात पाच माता मृत्यूंची प्रकरणे समोर आली आहेत. त्यामुळे गरोदर मातांना स्थानिकस्तरावरच आरोग्य सेवा पुरविण्यासाठी उपाययोजना करण्याची गरज आहे.

विवाहितेचा छळ
नवऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल
चांदूरबाजार : तालुक्यातील थूगाव पिंपरी येथील देवानंद रामचंद्र बोदुडे याने त्याची पत्नी पल्लवी देवानंद बोदुडे हिला माहेरुन पैसे आणण्याचा तगादा लावला. तसेच तू दिसायला सुंदर नाही, असे म्हणून तिचा शारीरिक छळ केला. विवाहितेच्या तक्रारीवरुन पोलिसांंनी आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.

पूर्णानगर मार्गावर
कारची दुचाकीला धडक
अमरावती: आसेगावपूर्णा पोलीस ठाण्याच्या हद्दीतील नीलेश रामराव रुपनारायण हे त्यांच्या दुचाकीने पूर्णानगरकडून अमरावतीकडे जात असताना विरुद्ध दिशेने येणाऱ्या एम.एच.२७-ए.सी.००३७ क्रमांकाच्या कारने त्यांच्या दुचाकीला जबर धडक दिल्याने ते जखमी झाले.याप्रकरणी पोलिस तपास सुरू आहे.

जास्त प्रमाणात औषध
घेतल्याने युवतीचा मृत्यू
वर्धा : औषधाच्या गोळ्या अधिक प्रमाणात सेवन केल्याने उपचारादरम्यान युवतीचा मृत्यू झाला. ऋचा भोंगाडे रा. तुकडोजी वॉर्ड असे मृत युवतीचे नाव आहे. याप्रकरणी अकस्मात मृत्यूची नोंद केली असून पुढील तपास पोलीस करीत आहे.