शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

राज्य-थोडक्यात-विदर्भ

By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST

राज्य-थोडक्यात-विदर्भ

राज्य-थोडक्यात-विदर्भ
रेती चोरणाऱ्या ट्रॅक्टर
चालकावर गुन्हा दाखल
गोंदिया : पांजरा येथील रेतीची तस्करी करणाऱ्या ट्रॅक्टर चालकावर तिरोडा पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे. विलास बाबुराव शहारे (३२) रा.खोपडा याने एमएच३५ जी ११६४ मध्ये एक ब्रास रेती भरून वाहून नेत असताना तलाठी परसराम मरस्कोल्हे (४८) यांनी त्याला अटक केली. सदर घटनेसंदर्भात तिरोडा पोलिसांनी आरोपीविरुध्द भादंविच्या कलम ३७९ अन्वये गुन्हा दाखल केला आहे.

बँकेत नकली नोटा चलनात
हिंगणघाट : येथील स्टेट बँकेच्या शाखेत अज्ञात व्यक्तीने १०० रुपयाच्या दोन नकली नोटा चलनात आणल्या. सदर प्रकार काही दिवसानंतर अधिकाऱ्यांच्या निदर्शनास आला. त्यामुळे भारतीय रिझर्व्ह बँकेकडे या प्रकरणाची सूचना देण्यात आली. रिझर्व्ह बँकेच्या अहवालावरून हिंगणघाट पोलीस ठाण्यात गुन्ह्याची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.

प्रवासात दिले गंुगीचे औषध
वर्धा : नागपूर येथून रेल्वेने वर्ध्याला परत येत असताना प्रवासादरम्यान तुळजापूर (वघाळा)येथील अतुल खुशाल मोहदुरे (३२) याला अनोळखी व्यक्तीने चिवड्यातून गंुगीचे औषध दिले. संशय येताच अतुल दुसऱ्या डब्यात गेला आणि प्रवाशांना आपबिती सांगून बेशुद्ध झाला. प्रवाशांनी अतुलच्या पत्नीला भ्रमणध्वनीवरून घटनेची माहिती दिली. अतुलला त्याच्या नातेवाईकांनी वर्धा रेल्वेस्थानकावर उतरवून घेतले. सेवाग्राम रुग्णालयात त्याच्यावर उपचार करण्यात आले.

भांडणात मध्यस्थी करणाऱ्यास मारहाण
अमरावती : भांडणादरम्यान सुरू असलेल्या मारहाणीत मध्यस्थी करण्यास गेलेल्या इसमाला डोक्यावर काठीने मारहाण केली. ही घटना शुक्रवारी नांदगाव खंडेश्वर पोलीस ठाण्यांतर्गत घडली. संतोष तरोणे यांच्या तक्रारीवरून पोलिसांनी आरोपी अनुप दंडे याच्याविरुध्द गुन्हा नोंदविला आहे.

सासऱ्याकडून सुनेची फसवणूक
नागपूर : पतीच्या नावाने असलेली टाटा एस गाडी पतीच्या मृत्यूनंतर सासऱ्याने बनावट कागदपत्र तयार करून आपल्या नावावर करून घेतल्याची तक्रार दिल्यावरुन जरीपटका पोलिसांनी सासऱ्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. जया संजय कडू (२८) रा. ७६, हाऊसिंग कॉलनी, लता भापकर यांचे घरी किरायाने, कळमेश्वर आणि आरोपी सदाशिव नत्थुजी कडू (७०) रा. पारडी, ता. कळमेश्वर नात्याने सून व सासरे आहेत. जया कडू यांच्या पतीच्या नावे टाटा एस ही चारचाकी गाडी होती. पतीच्या मृत्यूनंतर ही गाडी ४ एप्रिल २०१२ ते १२ डिसेंबर २०१२ या काळात सासऱ्याने बनावट कागदपत्र तयार करून स्वत:च्या नावावर केल्याचे त्यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे.

प्रवाशांचा २.३६ लाखांचा
मुद्देमाल लंपास
नागपूर : रेल्वे प्रवासात गाढ झोपी गेल्याचा फटका दोन प्रवाशांना बसला. त्यांच्या झोपेचा फायदा घेऊन संघमित्रा एक्स्प्रेस आणि समरसता एक्स्प्रेसमध्ये अज्ञात आरोपीने गुरुवारी त्यांचे दागिने आणि रोख असा एकूण २.३६ लाखांचा मुद्देमाल लंपास केला. याप्रकरणी लोहमार्ग पोलिसांनी अज्ञात आरोपींविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.