मणिपूरमध्ये घुसखोरांकडे सापडले मस्कच्या कंपनीने इंटरनेट डिव्हाईस; स्टारलिंक इथे कसे पोहोचले?

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 18, 2024 11:31 IST2024-12-18T11:30:41+5:302024-12-18T11:31:04+5:30

मणिपूरच्या हिंसाचारग्रस्त भागामध्ये एलॉन मस्क यांच्या कंपनीचे इंटरनेट डिव्हाईस सापडल्यानंतर खळबळ उडाली आहे.

Starlink like device found in Manipur Elon Musk refuted the claims | मणिपूरमध्ये घुसखोरांकडे सापडले मस्कच्या कंपनीने इंटरनेट डिव्हाईस; स्टारलिंक इथे कसे पोहोचले?

मणिपूरमध्ये घुसखोरांकडे सापडले मस्कच्या कंपनीने इंटरनेट डिव्हाईस; स्टारलिंक इथे कसे पोहोचले?

Manipur Violence : मणिपूरमध्ये गेल्या दोन वर्षांपासून हिंसाचार सुरू आहे. हिंसाचाराच्या सुरुवातीच्या अतिरेक्यांकडून पोलीस कर्मचाऱ्यांची शस्त्रे लुटण्यात आली होती. सुरक्षा दलाकडून अद्यापही ती परत मिळवण्याची कारवाई सुरु आहे. त्यामुळे लष्कर, आसाम रायफल्स आणि मणिपूर पोलिसांनी शोध मोहीम सुरू केली. मणिपूरच्या चुराचंदपूर, चंदेल, इम्फाळ पूर्व आणि कांगपोकपी जिल्ह्यांतील डोंगर आणि दरी भागातून एकूण २९ शस्त्रे जप्त करण्यात आली आहेत. मात्र शस्त्रांसोबत सापडलेल्या स्टारलिंक सॅटेलाईट ब्रॉडबँड कम्युनिकेशन डिव्हाईसमुळे सुरक्षा दलाला मोठा धक्का बसला आहे. दुसरीकडे, स्टारलिंकचे मालक असणाऱ्या एलॉन मस्क यांनी याबाबत खुलासा केला आहे.

मणिपूरच्या संघर्षग्रस्त भागातून भारतीय लष्कर आणि आसाम रायफल्सला घुसखोरांच्या तळावरून एलॉन मस्क यांची कंपनी स्पेसएक्सच्या स्टारलिंकचे इंटरनेट डिव्हाईस सापडले आहेत. त्यामुळे सुरक्षा यंत्रणा, लष्कर आणि पोलीस अलर्ट मोडवर आले आहेत. अनेक जिल्ह्यांत ही उपकरणे सापडली आहेत. एके ठिकाणी सुरक्षा दलाने झडतीदरम्यान एक रिसीव्हर, २० मीटर लांबीची केबल आणि एक राउटर जप्त करण्यात आला आहे. त्या डिव्हाईसच्या राउटरवर RFP/PLA लिहिले होते. जेव्हा असा छापा टाकला जातो तेव्हा फक्त शस्त्रे आणि दारूगोळा जप्त केला जातो. पण यावेळी एलॉन मस्क यांच्या कंपनीने बनवलेले इंटरनेट डिव्हाईसही सापडल्याने आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.

मणिपूर पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शोध मोहिमेदरम्यान इंफाळ पूर्व जिल्ह्यातील केराव खुनौ येथून जप्त केलेल्या वस्तूंमध्ये एक एमए ४ असॉल्ट रायफल, एक १२ बोअरची बंदूक, एक ९ एमएम पिस्तूल, एक पॉईंट ३२ पिस्तूल, पाच हातबॉम्ब, पाच आर्मिंग रिंग, दोन डिटोनेटर, ५.५६ एमएम दारुगोळ्याच्या ३० राउंड, इंटरनेट सॅटेलाइट अँटेना आणि इंटरनेट सॅटेलाइट राउटर यांचा समावेश आहे.

स्टारलिंक कोणत्याही दुर्गम भागात वायर किंवा टॉवरशिवाय इंटरनेट सुविधा पुरवते. यामुळे इंटरनेट थेट सॅटेलाईवरून उपलब्ध आहे. ते  एनक्रिप्टेड असून हॅक करणे कठीण आहे. मणिपूरमध्ये सापडलेल्या डिव्हाईसवर रिव्होल्युशनरी पीपल्स फ्रंट लिहीलेले आहे. हा चीनच्या पीपल्स लिबरेशन आर्मीचा सशस्त्र गट  सध्या मणिपूरमधील सर्वात सक्रिय दहशतवादी गट आहे. मणिपूरमधील घुसखोरांकडे हे डिव्हाईस कुठून आले असा प्रश्न आता उपस्थित होत आहे. कारण स्टारलिंकला अद्याप भारतात ब्रॉडबँड परवाना मिळालेला नाही.

दरम्यान, मणिपूरमध्ये स्टारलिंकसारखे डिव्हाईस सापडल्यानंतर एलॉन मस्क यांचे मोठे विधान समोर आले आहे. भारतावरील स्टारलिंक सॅटेलाइट बीम बंद करण्यात आले आहेत, असं मस्क यांनी म्हटलं. आपले डिव्हाईस अशांत मणिपूरमध्ये वापरले जात असल्याचे सर्व दावे मस्क यांनी फेटाळून लावले.

Web Title: Starlink like device found in Manipur Elon Musk refuted the claims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.