Bihar Stampede: भयंकर! नालंदामधील शीतला मंदिरात चेंगराचेंगरी; ८ भाविकांचा मृत्यू; १२ जण जखमी (Video)
By ऑनलाइन लोकमत | Updated: March 31, 2026 11:27 IST2026-03-31T11:27:30+5:302026-03-31T11:27:52+5:30
Bihar Nalanda Temple Stampede Video: बिहारमधील नालंदा येथे मंगळवारी सकाळी शीतला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ८ भाविकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Bihar Stampede: भयंकर! नालंदामधील शीतला मंदिरात चेंगराचेंगरी; ८ भाविकांचा मृत्यू; १२ जण जखमी (Video)
Bihar Sheetla Mata Temple Stampede: बिहारमधील नालंदा येथे मंगळवारी सकाळी शीतला मंदिरात झालेल्या चेंगराचेंगरीत ८ भाविकांचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. या घटनेत अनेक जण जखमी झाले असून मृतांचा आकडा वाढण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे. दीपनगर पोलीस ठाण्याच्या हद्दीतील शीतला मंदिर येथे ही घटना घडली.
मिळालेल्या माहितीनुसार, मंदिरात झालेली प्रचंड गर्दी आणि नियोजनाचा अभाव यामुळे ही मोठी दुर्घटना घडली. घटनेनंतर तातडीने मदत आणि बचाव कार्य सुरू करण्यात आले आहे. आतापर्यंत आठ भाविकांचा मृत्यू झाल्याचं समोर आलं आहे.
#BREAKING
— Ravi Pandey🇮🇳 (@ravipandey2643) March 31, 2026
बिहार के नालंदा स्थित शीतला मंदिर में अत्यधिक भीड़ होने के कारण भगदड़ हो गई जिससे कई लोग दब गए है।
हादसे में अबतक 8 लोगों की मौत हो गई है और दर्जन से अधिक लोग जख्मी हुए है। #Bihar#Nalanda#Stampede#NalandaStampedepic.twitter.com/zROA4m5Qy8
मघडा येथील शीतला मंदिरात दर मंगळवारी दर्शनासाठी हजारो भाविक येत असतात. या मंगळवारी सुरक्षा व्यवस्था पूर्णपणे कोलमडलेली पाहायला मिळाली. दर्शनासाठी भाविकांनी मोठी गर्दी केली होती आणि त्याच दरम्यान काही कारणास्तव चेंगराचेंगरी झाली. ही घटना नेमकी कशामुळे घडली, याचे कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. घटनेची माहिती मिळताच रुग्णवाहिका आणि एसडीएम (SDM) घटनास्थळी दाखल झाले.
या दुर्घटनेत १० ते १२ भाविक जखमी झाले असून, त्यांना उपचारासाठी जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. सध्या मंदिर परिसर पूर्णपणे रिकामा करण्यात आला आहे. घटनास्थळी मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे.
बिहार के नालंदा जिले (बिहार शरीफ के पास मघड़ा/दीपनगर क्षेत्र) में शीतला माता मंदिर के चैत्र मेले में भारी भीड़ के कारण भगदड़ मच गई। हादसे में 8 श्रद्धालुओं की मौत हो गई और दर्जन से अधिक लोग घायल हुए हैं। घायलों को बिहार शरीफ के मॉडल अस्पताल में भर्ती कराया गया है। पुलिस और… pic.twitter.com/V2r5rhbMx2
— Mayank Verma 🇮🇳 (@imayankindian) March 31, 2026