स्पेशल मिशनवर जातोय सांगून गर्लफ्रेंडला भेटायचा, पत्नीने केली धुलाई; एसएसपींनी केले निलंबित...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2022 15:25 IST2022-11-22T15:25:08+5:302022-11-22T15:25:51+5:30

आग्राच्या एसएसपींनी 2 हवालदारांना विवाहबाह्य संबंध ठेवल्यामुळे निलंबित केले आहे.

SSP suspended two police constable due to extra marital affairs in agra | स्पेशल मिशनवर जातोय सांगून गर्लफ्रेंडला भेटायचा, पत्नीने केली धुलाई; एसएसपींनी केले निलंबित...

स्पेशल मिशनवर जातोय सांगून गर्लफ्रेंडला भेटायचा, पत्नीने केली धुलाई; एसएसपींनी केले निलंबित...


आग्रा: उत्तर प्रदेशातील आग्रा येथे दोन पोलीस हवालदारांना विवाहबाह्य संबंध ठेवणे चांगलेच महागात पडले. याप्ररणी कारवाई करत एसएसपींनी दोघांनाही निलंबित केले आहे. तसेच दोघांची आता विभागीय चौकशीदेखील होणार आहे. पहिले प्रकरण मोहम्मद रियाझ या क्रिमिनल इंटेलिजन्स विंगमध्ये तैनात असलेल्या कॉन्स्टेबलचे आहे.

मोहम्मद रियाजचे एतमदौला परिसरात राहणाऱ्या एका तरुणीसोबत प्रेमसंबंध होते. रियाज आपल्या पत्नीला खोट बोलायचा की, त्याला एका स्पेशल मिशनसाठी बाहेर गावाला जायचे आहे. घरातून निघून तो प्रेयसीकडे जायचा. हा प्रकार त्याच्या पत्नीच्या लक्षात आला. यामुळे तिने पतीचा पाठलाग करत त्याच्या प्रेयसीच्या घरी पोहोचली. तिथे रियाज दारूच्या नशेत आढळला.

यावेळी पत्नीने घरात घुसून दोघांना बेदम मारहाण केली. लगेच पोलिसांना पाचारण करून रियाजचे मेडिकल करण्यात आले. ज्यामध्ये तो दारू पिल्याचे निश्चित झाले. हे प्रकरण एसएसपींच्या निदर्शनास येताच एसएसपींनी कॉन्स्टेबलला निलंबित केले. ही बाब पोलिस विभागात चर्चेचा विषय ठरली आहे. दुसरे प्रकरण पोलीस लाईनमध्ये तैनात कॉन्स्टेबल वीरेंद्रचे आहे.

एसएसपीने कॉन्स्टेबल वीरेंद्रलाही प्रेमप्रकरणावरून निलंबित केले आहे. या घटनेमागची एक रंजक गोष्ट समोर आली आहे. एका महिलेने आग्रा एसएसपीसमोर हजर राहून सांगितले की, कॉन्स्टेबल वीरेंद्रने स्वत:ला बॅचलर सांगून तिच्याशी संबंध ठेवले होते. 2 वर्षांपूर्वी तिचे वडील वारले तेव्हा तिची वीरेंद्रशी भेट झाली. वीरेंद्र चौकशीच्या निमित्ताने घरी येत असे. त्याचवेळी त्याने महिलेला आपल्या प्रेमाच्या जाळ्यात अडकवले. तरुणीने एसएसपीकडे तक्रार केली आणि कॉन्स्टेबल वीरेंद्रला निलंबित करण्यात आले.

Web Title: SSP suspended two police constable due to extra marital affairs in agra