दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले...

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 15, 2025 10:48 IST2025-07-15T10:48:42+5:302025-07-15T10:48:58+5:30

दिल्लीच्या इंदिरा गांधी आंतरराष्ट्रीय विमानतळावरून मुंबईला जाणाऱ्या स्पाइसजेटच्या विमानात दोन महिलांमध्ये वाद सुरू झाला. हा वाद इतका वाढला की त्यांनी कॉकपिटवर आपटाआपटी केली.

spicejet flight returns to delhi after women passengers fight disrupt mumbai bound flight | दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले...

दोन महिलांपुढे पायलटनेही हात टेकले; विमानात जोरजोरात भांडत बसल्या अन् पुढे असे घडले...

दिल्ली विमानतळावर स्पाईसजेटच्या विमानाने मुंबईसाठी उड्डाण केले. पण, काही वेळाने त्याच विमानाने पुन्हा लँडिंग केले. काहीवेळ विमान तळावर कोणालाच काही कळले नाही. काहींना वाटले विमानामध्ये काही यांत्रिक बिघाड असेल म्हणून पुन्हा लँडिंग केले असेल. पण, लँडिंगचे कारण ऐकून अनेकांना धक्का बसला. विमानामध्ये अचानक दोन महिलांचा वाद सुरू झाला होता. हा वाद एवढा वाढला की दोन कॉकपिटवर आदळ आपट करण्यापर्यंत गेला. वाद मिटवण्यासाठी पायटनेही प्रयत्न केला. पण, त्यांना यश आले नाही. शेवटी पायलटने विमानाचे पुन्हा लँडिंग करण्याचा निर्णय घेतला. 

अल्पसंख्याक अन् एससी-एसटींविरुद्ध भेदभाव केल्यास होणार तुरुंगवास; काँग्रेसच्या 'रोहित वेमुला' विधेयकात काय?

धावपट्टीवरून उड्डाण करण्यापूर्वी विमानात बसलेल्या दोन महिलांमध्ये अचानक भांडणे सुरू झाली होती.
ही घटना स्पाइसजेटच्या एसजी 9282 या विमानाची आहे. दिल्लीहून मुंबईला जाणारे हे विमान सोमवारी आयजीआयएहून उड्डाणासाठी तयार होते आणि काही वेळाने पुन्हा दिल्ली विमानतळावर परतावे लागले.

विमानात गोंधळ झाला

उड्डाण होण्यापूर्वीच विमानात बसलेल्या दोन महिला प्रवाशांमध्ये भांडण झाले. भांडण इतके वाढले की कॉकपिटवर आदळू लागल्या. या घटनेमुळे संपूर्ण विमानात गोंधळ निर्माण झाला. क्रू मेंबर्ससह अनेक प्रवाशांनी महिलांना शांत करण्याचा प्रयत्न केला. पायलटनेही घोषणा केली आणि महिलांना त्यांच्या जागी बसण्याची विनंती केली, परंतु त्या दोन्ही महिलांनी कोणाचेही ऐकले नाही.

महिलांनी कॉकपिट उघडण्याचा प्रयत्न केल्यानंतर अखेर वैमानिकाने विमान वळवण्याचा निर्णय घेतला. विमान पुन्हा आयजीएआयकडे वळवण्यात आले आणि दिल्ली विमानतळावर महिलांना विमानातून उतरवून सीआयएसएफच्या स्वाधीन करण्यात आले. त्यानंतर काही वेळातच विमान मुंबईकडे रवाना झाले.

स्पाइसजेटने काय सांगितले?

या घटनेची माहिती देताना स्पाइसजेटच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, "१४ जुलै रोजी दिल्लीहून मुंबईला जाणाऱ्या एसजी 9282 या विमानात दोन प्रवाशांनी गोंधळ घातला. दोघींनीही कॉकपिट उघडण्याचा प्रयत्न केला. केबिन क्रू, सहप्रवासी आणि कॅप्टन यांनी त्यांना सीटवर बसण्याची विनंती केली, पण त्यांनी कोणाचेही ऐकले नाही. सर्व प्रवाशांच्या सुरक्षिततेचा विचार करून, कॅप्टनने विमान परत घेऊन जाण्याचा निर्णय घेतला. दिल्ली विमानतळावर महिलांना सीआयएसएफच्या ताब्यात देण्यात आले.

Web Title: spicejet flight returns to delhi after women passengers fight disrupt mumbai bound flight

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.