शहरं
Join us  
Trending Stories
1
BREAKING: राघव चड्ढा, हरभजनसिंग भाजपात! आम आदमी पार्टीत उभी फूट, राज्यसभेच्या १० पैकी ७ खासदारांचा पक्षाला 'राम-राम'
2
Latest Marathi News LIVE Updates: आम आदमी पक्षाला मोठा धक्का; राज्यसभेचे ७ खासदार फुटले, भाजपात प्रवेश करणार
3
'नरक' म्हणणाऱ्या डोनाल्ड ट्रम्प यांना चीनचे भारताचा झेंडा पोस्ट करत उत्तर; 'शब्द विरून जातात, पण...'
4
LPG Subsidy : तुमच्या सिलिंडरचं अनुदान खात्यात जमा होतंय का? घरबसल्या स्टेटस तपासण्याची सोपी पद्धत
5
इन्स्टाग्राम युजर्सना मोठा धक्का! रंगीत फोटो झाले काळे-पांढरे; मिनिटांत करा दुरुस्त, फॉलो करा या सोप्या स्टेप्स
6
राजकारणात येण्यापूर्वी काय करायचे राघव चड्ढा; आपने ग्लॅमरस मोहरा गमावला... 
7
सावधान! फळ आणि भाज्या खाल्ल्याने वाढतोय कॅन्सरचा धोका? नव्या रिसर्चने सर्वच हादरले
8
राघव चड्ढांना हटवून ज्यांना राज्यसभेत नेता बनविले ते ही चालले...; भाजपमध्ये जाणाऱ्यांमध्ये स्वाती मालिवालांचेही नाव
9
चीनला घेरणाऱ्या मलक्का सामुद्रधुनीवर आता टॅक्सची टांगती तलवार; भारतावर काय होणार परिणाम?
10
आधी अमेरिकेचे १०, आता चीनचे ८ बडे शास्त्रज्ञ रहस्यमयरीत्या ठार; जगाची झोप उडाली!
11
उद्धव ठाकरे विधान परिषदेत जाऊ नये यासाठी उद्धवसेनेच्याच बड्या नेत्याचे प्रयत्न; कुणी केला दावा?
12
सर्वोच्च न्यायालयाचा ऐतिहासिक निकाल, ‘कोणतंही न्यायालय अल्पवयीन मुलीवर तिच्या इच्छेविरुद्ध मातृत्व लादू शकत नाही!’
13
बंगालमध्ये ९२.८९% मतदानाचे रहस्य! ९० लाख मतदारांची नावे कापल्याचा परिणाम; 'व्होटर बेस' घटल्याने टक्केवारी वाढली?
14
महाराष्ट्रात SIR सुरू झाले! प्रसिद्ध मतदार यादीत तुमचे नाव तपासा; स्टेप-बाय-स्टेप, लगेच मिळेल ऑनलाईन...
15
“आमदार संजय गायकवाडांवर कारवाई करण्यास सरकार का घाबरते?”; हर्षवर्धन सपकाळांचा सवाल
16
तुरुंगात वाल्मिकसाठी नवा डिश टीव्ही कुणी बसवला? व्हायरल ऑडिओ क्लिपमध्ये व्हीआयपी सुविधेचा पोलखोल
17
भारतातून ५ हजार लोकांना एअरलिफ्ट करून इस्रायलला का नेलं जातंय?; सुरू आहे 'स्पेशल ऑपरेशन'
18
Meditation Tips: मेडिटेशन करायचंय, पण मन शांत नाही? नवशिक्यांसाठी ध्यानधारणेच्या सोप्या टिप्स आणि ट्रिक्स
19
पगारवाढ मागायला गेला आणि नोकरीच गेली; अप्रेजलच्या मीटिंगमध्ये थेट राजीनामा द्यायलाच सांगितलं
20
सरकारी कर्मचाऱ्यांची किमान पगार ₹७२,००० होणार? कोणी केली मागणी? सरकारच्या निर्णयाकडे लक्ष...
Daily Top 2Weekly Top 5

बोडो गनिमांविरुद्धची मोहीम गतिमान

By admin | Updated: December 26, 2014 23:48 IST

नॅशनल डेमॉक्रेटिक फ्रंट आॅफ बोडोलँड (एस) (एनडीएफबी)च्या दहशतवाद्यांविरुद्ध लष्कराने आसामातील सीमेसह अरुणाचल प्रदेशात आपली तपास मोहीम अधिक गतिमान

गुवाहाटी : नॅशनल डेमॉक्रेटिक फ्रंट आॅफ बोडोलँड (एस) (एनडीएफबी)च्या दहशतवाद्यांविरुद्ध लष्कराने आसामातील सीमेसह अरुणाचल प्रदेशात आपली तपास मोहीम अधिक गतिमान केली आहे. लष्करप्रमुख जनरल दलबीरसिंग सुहाग यांनी गृहमंत्री राजनाथसिंग यांची भेट घेतल्यानंतर पत्रकारांशी बोलताना, आसाममध्ये लष्कराची मोहीम निश्चितपणे गतिमान करण्याचा निर्णय घेतल्याचे सांगितले. बोडो दहशतवाद्यांनी केलेल्या हिंसक हल्ल्यानंतर तेथील परिस्थिती पाहण्यासाठी केलेल्या दोन दिवसांच्या दौऱ्यानंतर सिंग यांनी सुहाग यांची भेट घेतली होती. या दहशतवाद्यांनी गेल्या काही दिवसांत आदिवासींवर केलेल्या हल्ल्यात ठार झालेल्यांची संख्या आता ८१ झाली आहे. सुहाग यांनी, लष्कराची ६६ पथके आसामात तैनात केल्याचे सांगितले. यातल्या प्रत्येक पथकात ७० जवान आहेत. सर्वाधिक हिंसाग्रस्त असलेल्या सोनितपूरमध्ये अधिक जवान तैनात केले गेले आहेत, असे यावेळी सांगितले. गृहमंत्र्यांनी भूतान व म्यानमारच्या लष्करासोबत एनडीएफबीबाबत चर्चा केल्याचे सुहाग पुढे म्हणाले. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, एनडीएफबी (एस) च्या दहशतवाद्यांनी मंगळवारी रात्री केलेल्या हल्ल्यात जखमी झालेल्या दोन व्यक्तींचे शनिवारी निधन झाले. दहशतवाद्यांसोबत कोणतीही चर्चा केली जाणार नाही, असे गृहमंत्री राजनाथसिंग यांनी स्पष्ट केले असून दहशती कृत्य अजिबात सहन केले जाणार नाही असे धोरण राबविले जाईल, असेही त्यांनी म्हटले आहे. त्यांच्या या वक्तव्यानंतर सोनितपूर जिल्ह्यात व आसाम-अरुणाचल प्रदेशाच्या सीमेवर सुरक्षा जवानांनी आपल्या मोहिमांचा वेग वाढविला आहे. लष्कराच्या हेलिकॉप्टर्सद्वारेही या सर्व क्षेत्राची पाहणी केली जात आहे. (वृत्तसंस्था)