विशेष बातमी
By admin | Updated: February 14, 2015 23:52 IST
सुवर्णअलंकार उद्योगाला हस्तकलेचा दर्जा
विशेष बातमी
सुवर्णअलंकार उद्योगाला हस्तकलेचा दर्जाकेंद्र शासनाचे आदेश : जिल्ह्यातील २ हजार लोकांना फायदाऔरंगाबाद : केंद्र शासनाच्या हस्तशिल्प मंत्रालयाने सोने-चांदीचे अलंकार उद्योगाला हस्तकलेचा दर्जा दिला आहे. जे सुवर्णकार हाताने अलंकार बनवितात त्यांना शासनाच्या विविध योजनांचा लाभ मिळणार आहे. शहर व जिल्ह्यात असे २ हजार सुवर्णकार आहेत, जे हस्तशिल्प विभागाच्या विविध योजनेचे लाभार्थी ठरू शकतात. वर्षानुवर्षे पिढीजात सोने,चांदीचे दागिने तयार करणारे सुवर्णकार, तसेच नवपिढीतील सुवर्णकार यांना हस्तशिल्प मंत्रालयाकडून ओळखपत्र देण्यात येणार आहे. त्यामुळे त्यांना हस्तशिल्प कारागिरांना मिळणारे फायदे, सोयीसवलती व विविध सरकारी योजनांचा लाभ मिळेल. सोने-चांदीच्या अलंकारात सर्व गुण पाहण्यास मिळतात जे हस्तशिल्प उत्पादनात पाहण्यास मिळतात. मात्र आजपर्यंत या सोने-चांदीच्या उद्योगाला हस्तशिल्प उद्योगाच्या यादीत स्थान देण्यात आले नव्हते. यासंदर्भात काही ज्वेलर्सनी सवार्ेच्च न्यायालयात याचिका दाखल केली होती. न्यायालयाने सोने-चांदीच्या अलंकारास हस्तशिल्पकलेचा दर्जा देण्याचे आदेश केंद्र शासनाला दिले. त्यानुसार केंद्राचे विकास आयुक्त (हस्तशिल्प) समीर कुमार बिश्वास यांनी २८ जानेवारी २०१५ रोजी देशभरातील संबंधित विभागांना शासनादेश जारी केला. हस्तशिल्पच्या यादीत ३२ उत्पादनांची नोंद करण्यात आली त्या यादीत सोने-चांदीच्या दागिन्यांचा समावेश करण्यात आला आहे. संबंधित विभागाने शहर-जिल्ह्यातील जे सुवर्णकार हाताने अलंकार बनवितात, त्यांची नोंदणी करून त्यांना त्वरित ओळखपत्र देण्याचे कळविले आहे.औरंगाबाद सराफा असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र मंडलिक यांनी सांगितले की, सुवर्णालंकारास हस्तकलेचा दर्जा मिळावा यासाठी ज्वेलर्स व सुवर्ण कारागीर अनेक वर्षांपासून प्रयत्न करीत होते. अखिल सुवर्णकार कारागीर संघटनेचे माजी अध्यक्ष कैलास बुटे यांनी सांगितले की, जिल्ह्यात २ हजारांच्या आसपास सुवर्ण कारागीर आहेत. सराफा असोसिएशनचे वरिष्ठ पदाधिकारी सुनील उदावंत म्हणाले की, यासंदर्भात आम्ही सुवर्ण कारागिरांचा मेळावा घेऊ व हस्तशिल्प विभागातील अधिकार्यांना बोलवून कोणत्या सोयीसुविधा मिळणार आहेत याची माहिती सर्वांना देऊ व तिथेच ओळखपत्रासाठी नावनोंदणी करून घेऊ. (जोड)