शहरं
Join us  
Trending Stories
1
US Israel Iran War : ४८ तासांत इराणचा विनाश होईल; होर्मुझच्या सामुद्रधुनीवरून ट्रम्प यांचा इराणला इशारा
2
राघव चड्ढा 'भाजपा'मध्ये जाणार? पीएम मोदींच्या विरोधातील पोस्ट केल्या डिलीट; सौरभ भारद्वाज यांचा मोठा दावा
3
बिश्नोईची जादू; मराठमोळ्या Tushar Deshpande चा अचूक मारा! गुजरातला रोखत राजस्थानचा रोमहर्षक विजय
4
हिमाचलमध्ये भीषण अपघात! कुल्लूमध्ये १५ प्रवाशांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कोसळली; बचावकार्य युद्धपातळीवर
5
राधानगरीत आता 'रायबा' आणि 'सरदार'चा दरारा! दोन नर वाघांच्या अस्तित्वावर वनविभागाचे शिक्कामोर्तब
6
"सर्वच पक्षांनी बारामती विधानसभेची पोटनिवडणूक बिनविरोध करावी"; देवेंद्र फडणवीस यांचे विरोधकांना आवाहन
7
IPL 2026 : मामाची कृपा अन् IPL गाजवतोय भाचा! Sameer Rizvi इम्पॅक्टफुल क्रिकेटर कसा घडला?
8
गॅस सिलिंडर कुठे आहे? आता घरबसल्या फोनवर पाहा 'लाईव्ह लोकेशन'; ग्राहकांना मोठा दिलासा
9
‘तो ट्रम्पपेक्षा आमच्या कैदैत सुरक्षित’, बेपत्ता पायलटच्या आईच्या भावूक पोस्टनंतर इराणचा टोला
10
माजी राष्ट्रपतींसह दोन बड्या नेत्यांवर अमेरिकेसाठी हेरगिरीचा आरोप, गद्दार म्हणून होतेय संभावना
11
Travel : मनालीत खूप गर्दी आहे? मग एप्रिलमध्ये फिरायला जा 'या' शांत ठिकाणी; स्वित्झर्लंडही विसराल!
12
दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येणार का? पत्रकार परिषद का घेतली नाही? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं
13
डबल हेडरमध्ये कमालीचं ट्विस्ट! MI पाठोपाठ GT चा कॅप्टन शुभमन गिलही प्लेइंग इलेव्हनमधून 'गायब'
14
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
15
IPL 2026 : समीर रिझवीचा MI विरुद्धही 'धुरंधर' अवतार; DC ला एकतर्फी जिंकून दिली मॅच
16
दात दुखायला लागला अन् नंतर थेट हात-पाय कापण्याची आली वेळ; तरुणासोबत घडलं भयंकर
17
US Israel Iran War : अमेरिकेच्या नाकावर टिच्चून इराणचा मोठा निर्णय! आता या जहाजांना 'होर्मुझच्या सामुद्रधुनीतून' जाण्याची दिली परवानगी
18
एका पाठोपाठ एक पाडली जाताहेत अमेरिकेची विमाने, इराणच्या हाती लागलंय कोणतं घातक अस्त्र?
19
Rohit Sharma Record : हिटमॅन रोहित शर्माचा मोठा पराक्रम! MS धोनीचा विक्रम मोडत साधला 'नंबर वन'चा डाव
20
अमेरिकेचे F15 विमान पाडल्यावर इराणची मोठी घोषणा, अमेरिकन पायलटला पकडण्यासाठी ५५ लाखांचे बक्षीस
Daily Top 2Weekly Top 5

नात्यात ‘चिंगारी’, अ‍ॅपवर फॉलोअर्स वाढवण्यासाठी पत्नी करवून घेते असे काही, पतीची तक्रार

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 31, 2020 09:45 IST

व्हिडीओमध्ये स्लीम दिसावं म्हणून, पत्नी मला अनेकदा उपाशी ठेवायची. तसेच याबाबच विचारणा केल्यास भांडण करायची, असा आरोप संबंधित पतीने केला आहे.

भोपाळ - गेल्या काही वर्षांत सोशल मीडियाच्या वापरामध्ये प्रचंड वाढ झाली आहे. सोशल मीडियाच्या वाढत्या वापराचा परिणाम नातेसंबंधांवर होत असल्याचे समोर आले आहे.  मध्य प्रदेशची राजधानी भोपाळमध्ये एक अजब प्रकार समोर आला आहे.  आपली पत्नी अ‍ॅपवर फॉलोअर्सची संख्या वाढवण्यासाठी आपल्याकडून चित्रविचित्र करामती करवून घेते, असा आरोप एका त्रस्त पतीने केला आहे.

या व्यक्तीने सांगितले की, विवाह झाल्यापासूनच त्याच्या पत्नीला टिकटॉकवर व्हिडीओ बनवण्याचा छंद होता. नव्याची नवलाई असताना मलालाही असे व्हिडीओ तयार करण्यात कुठलीही अडचण वाटत नव्हती, तसेच कुठलीही तक्रार नव्हती. मात्र नंतरच्या काळात पत्नी माझ्याकडून डाएटिंग करवून घ्यायला लागली. तसेच चित्रविचित्र करामती करायला सांगू लागली.

व्हिडीओमध्ये स्लीम दिसावं म्हणून, पत्नी मला अनेकदा उपाशी ठेवायची. तसेच याबाबच विचारणा केल्यास भांडण करायची, असा आरोप संबंधित पतीने केला आहे. दरम्यान, या प्रकारामुळे या जोडप्याचे याआधी एकदा समुपदेशन झाले होते. मात्र आता पुन्हा एकदा या पत्नीने नव्या अ‍ॅपवर फॉलोअर वाढवण्यासाठी पतीकडून चित्रविचित्र कारनामे करवून घेण्यास सुरुवात केली.

माझी पत्नी कधी कधी मला चित्रविचित्र मेकअप करायला लावते, तर कधीकधी कुठल्यातरी गाण्याच्या तालावर नाचायला लावते. मात्र असे व्हिडिओ सोशल मीडियावर पाहिल्यानंतर ऑफीसपासून नातेवाईकांपर्यंत सर्वजण माझी मस्करी करतात. मात्र माती पत्नी हे ऐकून घ्यायला तयार नाही, असा आरोप पतीने केला आहे.

याबाबत मानसोपचार तज्ज्ञ शैला अवस्थी यांनी सांगितले की, सध्या नवीन आलेल्या चिंगारी नावाच्या अ‍ॅपवर आपले फॉलोअर्स वाढवण्यासाठी ही महिला आपल्या पतीवर दबाव आणून त्याच्याकडून चित्रविचित्र व्हिडीओ चित्रीत करून घेते. एवढेच नाही तर स्वत:ला स्लिम ठेवले नाही तर नवीन मित्रमंडळी बनवून त्यांच्यासोबत व्हिडीओ बनवेन अशी धमकी ती पतीला देते. दरम्यान, असा तगादा लावणे बंद करण्याचा सल्ला मी तिला दिला आहे. दरम्यान, दोघांचेही समुपदेशन सुरू आहे, असेही त्यांनी सांगितले.   

इतर महत्त्वाच्या बातम्या

टाइम कॅप्सुल म्हणजे नेमकं काय? जमिनीत पुरून ठेवण्यामागे असतो हा उद्देश

पंधरा गोळ्या झेलूनही हा वीर जवान लढला, अन् टायगर हिलवर तिरंगा फडकला 

अमेरिकेला मिळाली कोरोनावरील लस, खरेदी केले १० कोटी डोस

घरी राहिल्यानेही कमी होत नाही कोरोनाच्या संसर्गाचा धोका, संशोधकांचा धक्कादायक खुलासा

कोरोनाविरोधात लस विकसित करण्याच्या ऑक्सफर्डच्या मोहिमेचं या महिलेनं केलं नेतृत्व, अवघ्या काही महिन्यांत असं मिळवलं यश

कोरोनावरील लस विकसित करण्याच्या शर्यतीत आहेत 'या' सात भारतीय कंपन्या, काहींनी घेतलीय संशोधनात आघाडी

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल 

टॅग्स :Jara hatkeजरा हटकेFamilyपरिवारSocial Mediaसोशल मीडिया