'लाज वाटू दे...', भारत-पाक सामन्याबाबत केलेल्या वक्तव्याने सौरव गांगुली प्रचंड ट्रोल

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 28, 2025 14:28 IST2025-07-28T14:26:43+5:302025-07-28T14:28:18+5:30

Sourav Ganguly on Ind-Pak : आशिया कप २०२५ चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. भारत आणि पाकिस्तानचा सामना १४ सप्टेंबर रोजी होणार आहे.

Sourav Ganguly on Ind-Pak : 'Shame on you...', Sourav Ganguly's trolled over statement on India-Pak match | 'लाज वाटू दे...', भारत-पाक सामन्याबाबत केलेल्या वक्तव्याने सौरव गांगुली प्रचंड ट्रोल

'लाज वाटू दे...', भारत-पाक सामन्याबाबत केलेल्या वक्तव्याने सौरव गांगुली प्रचंड ट्रोल

Sourav Ganguly on Ind-Pak : भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार सौरव गांगुली आपल्या एका विधानामुळे अडचणीत आला आहे. पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर भारत आणि पाकिस्तानमधील संबंध बिघडले आहेत. अशातच, गांगुलीने आशिया कप २०२५ मधील भारत-पाक सामन्यावर आपले मत व्यक्त केले. मात्र, यामुळेच सोशल मीडियावर गांगुलीला प्रचंड ट्रोल करण्यात आले. 

सौरव गांगुली अडचणीत
एएनआयशी बोलताना सौरव गांगुली म्हणाला, 'मला यात काही अडचण नाही. खेळ सुरूच राहिला पाहिजे. पहलगाममध्ये जे घडले, ते घडू नये, पण खेळ सुरूच राहिला पाहिजे. दहशतवाद घडू नये, तो थांबवावा. भारताने दहशतवादाविरुद्ध कठोर पाऊल उचलले आहे.' या विधानामुळे गांगुलीचा व्हिडिओ सोशल मीडियावर खूप वेगाने व्हायरल होत आहे. त्याला नेटकऱ्यांनी चांगलेच फैलावर घेतले आहे.

पहलगाममध्ये काय घडले?
२२ एप्रिल २०२५ रोजी पहलगाम येथे दहशतवादी हल्ला झाला होता. या हल्ल्यात अनेक निष्पाप पर्यटक मारले गेले. त्यानंतर ७ मे रोजी भारतीय हवाई दलाने ऑपरेशन सिंदूर अंतर्गत पाकिस्तानमधील दहशतवादी तळांवर जोरदार हल्ले केले आणि शंभरहून अधिक दहशतवादी मारले. तेव्हापासून दोन्ही देशांमधील संबंध बिघडले आहेत. भारताने सिंधू पाणी करार स्थगित करणे आणि पाकिस्तानींचा व्हिसा रद्द करण्यासारखे मोठे निर्णय घेतले आहेत.

पाकविरोधात WCL मध्ये खेळण्यासही नकार 
वर्ल्ड चॅम्पियनशिप ऑफ लीजेंड्स २०२५ स्पर्धेत भारतीय खेळाडूंनी पाकिस्तानविरोधात खेळण्यास नकार दिला, त्यानंतर हा सामना रद्द करावा लागला. भारतीय खेळाडूंनी सांगितले की त्यांना पाकिस्तान चॅम्पियन्सविरुद्ध सामना खेळायचा नाही.

आशिया कप वेळापत्रक जाहीर
आशिया कप २०२५ चे वेळापत्रक जाहीर झाले आहे. ही स्पर्धा ९ सप्टेंबरपासून सुरू होत असून, अंतिम सामना २८ सप्टेंबर रोजी खेळला जाईल. या स्पर्धेत १४ सप्टेंबर रोजी भारत आणि पाकिस्तानचा सामना होणार आहे.

Web Title: Sourav Ganguly on Ind-Pak : 'Shame on you...', Sourav Ganguly's trolled over statement on India-Pak match

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.