शहरं
Join us  
Trending Stories
1
मोदीजी घाबरलात का? तुम्हाला कसं माहिती अदानी-अंबानी टेम्पोतून पैसे देतात? राहुल गांधींची टीका
2
वादावर पडदा? सॅम पित्रोदांनी दिला IOC अध्यक्षपदाचा राजीनामा, पक्षानेही तात्काळ स्वीकारला
3
"विचित्र बडबड करणं सॅम पित्रोदांचा स्वभाव, त्यांनी भारताचा अपमान केलाय"; रामदास आठवलेंची शाब्दिक चपराक
4
CM केजरीवालांना तुरुंगात ऑफिस सुरू करण्यासाठी याचिका; कोर्टाने ठोठावला 1 लाखाचा दंड
5
"कुमारस्वामी हे ब्लॅकमेलिंगचे बादशहा अन् रेवन्ना कहाणीचे दिग्दर्शक-निर्माते", डीके शिवकुमार यांचा आरोप
6
"ते स्वतःच माणसासारखे कमी अन् पक्ष्यासारखे जास्त दिसतात..."; सॅम पित्रोदांच्या वक्तव्यावर कंगना भडकली 
7
पवार कुटुंबीयांनी पुन्हा एकदा एकत्र यावं, अशी माझी इच्छा - छगन भुजबळ
8
अरविंद केजरीवाल यांना जामीन मिळणार की नाही? सर्वोच्च न्यायालय शुक्रवारी देणार निकाल 
9
"...तर राम मंदिराला 'बाबरी' नावाचं कुलूप लावलं जाईल", अमित शाहांचा काँग्रेसवर हल्लाबोल
10
"यातून गांधी परिवाराची मानसिकता..."; स्मृती इराणी यांनी सॅम पित्रोदांच्या वादग्रस्त विधानाचा घेतला समाचार
11
भारताचा नवा विक्रम; परदेशात राहणाऱ्या भारतीयांनी वर्षभरात मायदेशी पाठवले 111 अब्ज डॉलर्स
12
चीनचं टेन्शन वाढणार! ज्या बाजारावर होता दबदबा, आता त्यावर भारत राज्य करणार
13
“उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वात मुंबईतील मराठी माणूस निर्वासित झाला”; देवेंद्र फडणवीसांची टीका
14
Amit Shah : "...तर तुरुंगातही जाल"; अमित शाह यांचं अखिलेश यादव आणि राहुल गांधींवर टीकास्त्र
15
६०० पैकी ५७२ गुण मिळाले! पण टॉपर न आल्याने १६ वर्षीय तरूणीचं टोकाच पाऊल
16
SRH vs LSG सामना पावसामुळे रद्द झाला तर काय होईल? मुंबई इंडियन्सला म्हणावं लागतंय, जारे जारे पावसा... 
17
अजित पवारांच्या राष्ट्रवादीला महाराष्ट्रात खातेही उघडता येणार नाही- शरद पवार गटाचा खोचक टोला
18
PM मोदींचे मुस्लिम समाजाला पहिल्यांदाच थेट आवाहन अन् खास मंत्र्याने घेतली भेट; चर्चेला उधाण...
19
“सत्तेत आल्यावर अयोध्येतील राम मंदिराचे शं‍कराचार्यांच्या हातून शुद्धीकरण करु”: नाना पटोले
20
इस्रायलने कुणालाही न जुमानता राफा शहरावर हल्ला केला, अमेरिकेने बरोबर इंगा दाखवला, दिला मोठा दणका

जेवढा चिखल फेकाल तेवढं कमळ फुलेल, मोदींचा विरोधकांना टोला 

By ऑनलाइन लोकमत | Published: February 07, 2018 2:15 PM

सध्या हिट अँड रनचे राजकारण चालू आहे. चिखल फेका आणी पळून जावा अशी आताच्या राजकारणी लोकांची स्थिती आहे.

नवी दिल्ली - सध्या हिट अँड रनचे राजकारण चालू आहे. चिखल फेका आणी पळून जावा अशी आताच्या राजकारणी लोकांची स्थिती आहे. पण तुम्ही आमच्यावर जेवढा चिखल फेकाल तेवढं कमळ फुलेल असा टोला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विरोधकांना लगवला. राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला पंतप्रधान नरेंद्र मोदी  आज लोकसभेत उत्तर देत होते. त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी विरोधकांना खडे बोल सुनावले. मोदींचे तब्बल दीड तास भाषण झाले त्यावेळी विरोधकांची घोषणाबाजी सुरुच होती. दुसरीकडे पंतप्रधान मोदींनी देखील तितक्याच जोशात आपलं भाषण पूर्ण केलं. 

यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी काँग्रेसच्या कार्यकाळावर घणाघाती टिका केली. यावेळी ते म्हणाले की, 'देशाला लोकशाही काँग्रेसनं किंवा नेहरुंनी दिलेली नाही. लोकशाही ही आमच्या रक्तात आहे, आमची परंपरा आहे.  तुम्ही लोकशाहीच्या गप्पा मारता? तुमचे पंतप्रधान राजीव गांधींनी हैदराबाद विमानतळावर आपल्याच पक्षाच्या दलित मुख्यमंत्र्यांना सर्वांसमोर अपमानित केलं होतं', ही आठवण नरेंद्र मोदींनी काँग्रेसला करुन दिली. 'आम्हाला तुम्ही लोकशाही शिकवू नका. तुम्हाला ते शोभून दिसत नाही. सरदार वल्लभभाई पटेल जर देशाचे पहिले पंतप्रधान असते, त संपूर्ण काश्मीर आपलं असतं. आपल्यानंतर स्वातंत्र्य झालेल्या अनेक देशांनी प्रगती केली आहे हे मान्य करा', असं नरेंद्र मोदी लोकसभेत म्हणाले. पुढे बोलताना ते म्हणाले की, ज्यावेळी भारता डोकलाममध्ये युद्ध करत होता. त्यावेळी तुम्ही चीनच्या लोकांसोबत भेटण्यात व्यस्त होतात. 

'आवाज दाबण्याचा जो प्रयत्न होतोय, तो यशस्वी होणार नाही याची मला खात्री आहे. काँग्रेसने पसरवलेल्या विषाची किंमत सर्व देशवासीयांना चुकवावी लागतेय. आज हा देश ज्या ठिकाणी आहे, त्यात आजवरच्या सर्व सरकारांचं योगदान असल्याचं मी लाल किल्ल्यावरून म्हटलं. हे सौजन्य काँग्रेसच्या एकाही नेत्यानं दाखवलं नाही', असा टोला मोदींनी लगावला. 

मोदींच्या भाषणावेळी विरोधकांच्या घोषणा - पंतप्रधान नरेंद्र मोदी लोकसभेत बोलत आसताना विरोधकांनी गदारोळ केला. 15 लाखांच्या घोषणेचं काय झालं? अशी घोषणाबाजी करत विरोधकांनी मोदींना घेरण्याचा प्रयत्न केला. तब्बल दीड तास विरोधकांची घोषणाबाजी सुरु होती.  ‘क्या हुआ, क्या हुआ, 15 लाख का क्या हुआ?,  नही चलेगी, नही चलेगी जुमलेबाजी नही चलेगी...’  या घोषणांनी विरोधकांनी अक्षरश: सभागृह दणाणून सोडलं. आंध्रप्रदेशला अर्थसंकल्पात कमी निधी दिल्यामुळे विरोधकांसह टीडीपीच्या खासदारांनी मोदींविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.  

टॅग्स :Narendra Modiनरेंद्र मोदीLoksabhaलोकसभाcongressकाँग्रेस