शहरं
Join us  
Trending Stories
1
युतीबाबत एक पाऊल पुढे! शिवतीर्थावर उद्धव-राज यांच्यात अडीच तास चर्चा, बंधुऐक्याची ‘फ्रेम’ ठरली 
2
Maratha Reservation: हैदराबाद गॅझेटियर अधिसूचनेला मुंबई उच्च न्यायालयात आव्हान; काय आहे याचिकेत?
3
सोने-चांदीने गुंतवणूकदार मालामाल, गेल्या एका वर्षात मिळाले सोन्यातून ४४ तर चांदीतून ४५ टक्के रिटर्न
4
अग्रलेख: राधाकृष्णन आता देशाचे! नव्या उपराष्ट्रपतींनी हे लक्षात ठेवायला हवेच
5
विम्याचा हप्ता दहा वर्षांत दुप्पट! कंपन्यांकडून ग्राहकांची लूट; भीती दाखवून प्रीमियमवाढ
6
Maratha Reservation: राज्यात आजपर्यंत दिलेल्या कुणबी प्रमाणपत्रांची श्वेतपत्रिका काढावी; ओबीसी मंत्रिमंडळ उपसमितीची भूमिका
7
विशेष लेख: एका परिवर्तनशील, सहृदय नेतृत्वाचा अमृतमहोत्सव
8
नेपाळमध्ये देशभरात संचारबंदी लागू; महाराष्ट्रातील १०० पर्यटकांसह शेकडो प्रवासी अडकले 
9
भारत-अमेरिका यांच्यात चर्चेची दारे खुली होणार; पंतप्रधान मोदी म्हणाले, "ट्रम्प यांच्याशी..."
10
नेपाळनंतर फ्रान्समध्येही जनतेचा उद्रेक; २५० निदर्शकांना अटक 
11
Asia Cup 2025 : बुमराहच्या परफेक्ट यॉर्करशिवाय ही गोष्ट ठरली लक्षवेधी; कारण ६ वर्षांनी असं घडलं
12
सुशीला कार्की होणार नेपाळच्या पंतप्रधान; बालेंद्र शाहांचा पाठिंबा, आंदोलकांना केले आवाहन...
13
नागपुरातील कडबी चौकाजवळ भर रस्त्यावर व्यापाऱ्यावर गोळीबार, ५० लाखांची लूट
14
IND vs UAE : अभिषेकनं षटकारासह उघडलं खातं! गिलनं खणखणीत चौकार मारत पॉवरप्लेमध्ये संपवली मॅच
15
रुमाल पडला; तो क्रीजमध्ये यायला विसरला! सूंजचा डायरेक्ट थ्रो; पण Out बॅटरला सूर्यानं दिलं Not Out
16
'तुमचा वापर केला जातोय...', नेपाळमधील सत्तापालटानंतर केपी शर्मा ओलींची पहिली प्रतिक्रिया
17
महाराष्ट्राचे नवे राज्यपाल कोण? सीपी राधाकृष्णन राजीनामा देणार; १२ सप्टेंबरला उपराष्ट्रपतीपदाची शपथ घेण्याची शक्यता
18
शोरुममधून बाहेर पडताच नवीन कारचा अपघात झाला तर विमा मिळतो का? जाणून घ्या...
19
दात घासताना ८० वर्षीय वृद्धाच्या अन्ननलिकेत झाडाची काडी अडकली; ७ दिवस उपाशी राहिले अन्...
20
नेपाळमधील सत्तापालटावर चीनची पहिली प्रतिक्रिया; माजी पंतप्रधान ओलींचं नाव घेणं टाळलं!

सोनू सूदचे 'ते' ट्विटर खाते बनावट; म्हणाला "लवकरच अटक होणार"

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 22, 2020 11:07 IST

Actor Sonu sood's Fake twitter handle: लॉकडाऊन दरम्यान गरजू लोकांसाठी सुपरहिरो ठरलेला सोनू सूद अजूनही लोकांची भरभरून मदत करत आहे. मजुरांच्या मदतीपासून सुरू झालेल्या त्याच्या या प्रवासाने आता व्यापक रूप घेतलं आहे. सोनूने केवळ देशातीलच नाही तर परदेशात अडकलेल्या लोकांनाही मदतीचा हात दिलाय.

बॉलिवूडचा अभिनेता आणि प्रसिद्ध 'व्हिलन' सोनू सूद (Actor Sonu sood) कोरोना लॉकडाऊनपासून कमालीचा गाजत आहे. सोनू सूदने कोरोना काळात लोकांना मोठ्या प्रमाणावर मदत केली आहे. लोकांनी त्याला अनेकदा ट्विटर अकाऊंटवर मदतीची साद घातली आहे. काही खोडकर ट्विटना त्याच खोडकर भाषेत उत्तर देणे, गरजुंना खरोखरची मदत पोहोचविणे यामुळे सोनू सध्या आघाडीवर आहे. मात्र, त्याच्या याच प्रसिद्धाचा काही समाजकंटकांनी गैरवापर केला आहे. 

सोनू सूदच्या नावे ट्विटरवर फेक अकाऊंट सुरु करण्यात आले आहे. या अकाऊंटद्वारे लोकांचे मोबाईल नंबरही विचारले जात आहेत. याबाबत जेव्हा सोनी सूदला समजले तेव्हा त्याने या लोकांना इशारा देत हे धंदे बंद करण्याची विनंती केली आहे. सोनूने त्याच्या खऱ्या ट्विटर अकाऊंटवर लिहिले आहे की, भोळ्या लोकांना फसविण्याच्या गुन्ह्याखाली तुम्ही लवकरच गजाआड होणार आहात. तत्पूर्वी खूप उशिर होण्याआधी सुधरा, असा इशारा दिला आहे. सोनू सूदच्या नावे याधीही काही फेक आकाऊंट तयार करण्यात आली होती. मात्र, तेव्हा सोनू सूदने कोणतीही अॅक्शन घेतली नव्हती. आता लोकांची होणारी फसवणूक पाहून सोनूने कारवाईचे पाऊल उचलले आहे. 

अद्याप सोनू सूदने या प्रकरणी कोणतीही तक्रार पोलिसांत नोंदविलेली नसून केवळ या समाजकंटकांना इशारा दिला आहे. जर सोनूच्या नावावर सुरु असलेली फसवणूक बंद झाली नाही तर कदाचित सोनू कायदेशीर कारवाई करू शकतो. 

दिवसाला सोनूकडे मागितली जाणारी मदतलॉकडाऊन दरम्यान गरजू लोकांसाठी सुपरहिरो ठरलेला सोनू सूद अजूनही लोकांची भरभरून मदत करत आहे. मजुरांच्या मदतीपासून सुरू झालेल्या त्याच्या या प्रवासाने आता व्यापक रूप घेतलं आहे. सोनूने केवळ देशातीलच नाही तर परदेशात अडकलेल्या लोकांनाही मदतीचा हात दिलाय. इतकेच नाही तर तो बेरोजगरांना रोजगारही देत आहे. शक्य तितक्या लोकांना शक्य ती मदत तो करतो आहे.  

सोनूला रोज मदतीसाठी कितीतरी लोक वेगवेगळ्या माध्यमातून संपर्क करतात. पण रोज नेमके किती लोक त्याच्याकडे  मदत मागतात याचा खुलासा आतापर्यंत करण्यात आला नव्हता. आता याची नेमकी आकडेवारी सोनूने ट्विटरवर शेअर केली आहे. एक दिवशी मदत मागणाऱ्यांची आकडेवारी पाहून लोक अवाक् झाले आहेत.

सोनूने लिहिले की, '११३७ मेल, १९००० फेसबुक मेसेज, ४८१२ इन्स्टा मेसेज आणि ६७४१ ट्विटर मेसेज. हे आजचे मदतीचे मेसेज. सरासरी आकडेवारी पाहिली तर साधारण रोज इतके मदतीचे मेसेज येतात. एक माणूस म्हणून या सर्वांपर्यंत पोहोचणं शक्य होत नाही. पण तरी मी माझ्याकडून पूर्ण प्रयत्न करतो'.

सोनूने त्याच्या पोस्टमध्ये शेवटी लिहिले की, 'जर माझ्याकडून तुमचा मेसेज मिस झाला असेल तर मला माफ करा'. दरम्यान सोनूने लॉकडाऊनपासून हजारो प्रवासी मजुरांना त्यांच्या घरी पोहोचवलं आहे. त्यानंतर त्याच्याकडे वेगवेगळी मदत लोकंनी मागितली. अनेकांना त्याने पुस्तके दिली, अनेकांची फि भरली. आता तो अनेकांना रोजगार देतो आहे. त्यासाठी त्याने एक अॅपही सुरू केलं आहे. 

अन्य महत्वाच्या बातम्या...

65 वर्षांची महिला, 14 महिन्यांत 8 मुलींना जन्म दिला; घोटाळेबाज बिहारमध्ये झाले शक्य

वंदे भारत! चीनला रेल्वेचा आणखी एक झटका; 1500 कोटी रुपयांची निविदा रद्द

Railway Recruitment : रेल्वे भरती! जागा वाढल्या, संधी साधावी; विना परिक्षा होणार निवड

युवा नेत्याची मोठी तयारी! सीबीआयसमोर स्वत: जाणार; भाजपाचा आरोप

किम जोंग उन संकटात; बहिणीला बनविले उत्तराधिकारी? दिली मोठी जबाबदारी

भारतीयांची घोर फसवणूक! Made in PRC लिहून चिनी उत्पादने विकताहेत 'स्वदेशी' कंपन्या

'पती खूप प्रेम करतो, श्वास कोंडतोय!', नवविवाहितेला हवाय तलाक; कारणे वाचून व्हाल अवाक्

कुटील पाकिस्तान! चीनी युद्धनौकांच्या सर्वात मोठ्या तळावर पाठविला दूत; भारताविरोधात तीन प्रस्ताव

CoronaVirus Lockdown: खूशखबर! नोकरी गमावलेल्यांना तीन महिन्यांचे निम्मे वेतन मिळणार; लॉकडाऊनमुळे प्रस्ताव

टॅग्स :Sonu Soodसोनू सूदTwitterट्विटरcorona virusकोरोना वायरस बातम्या