शहरं
Join us  
Trending Stories
1
बिहारचे माजी उपमुख्यमंत्री सुशील कुमार मोदी यांचे निधन, ७२ व्या वर्षी घेतला अखेरचा श्वास
2
...तर राष्ट्रवादी आणि शिवसेना पक्ष फुटलेच नसते, अमित शाहांचा दावा 
3
"भाजपा 400 चा आकडा पार करू शकणार नाही...", निवडणूक निकालांबाबत ममता बॅनर्जीं केली मोठी भविष्यवाणी
4
"पंतप्रधान मोदी यांच्याशी चर्चा करण्यासाठी समोरची व्यक्ती त्या बरोबरीची असायला हवी"
5
Ghatkopar Hoarding Collapse Update: ८ जणांचा मृत्यू, ६६ जखमी; मृतांच्या नातेवाईकांना ५ लाखांची मदत जाहीर, मुख्यमंत्री Eknath Shinde यांची घोषणा
6
WhatsApp चा मोठा प्लॅन, स्क्रीनशॉट फीचर ब्लॉक होणार!
7
भारताचा इराणसोबत मोठा करार; चीन आणि पाकिस्तानला बसणार मोठा झटका
8
मिलॉर्ड... या दोन मुद्द्यांवर चूक झाली...; EVM-VVPAT प्रकरण पुन्हा सर्वोच्च न्यायालयात
9
KKR vs GT सामन्याचा फैसला झाला! प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद होणारा तिसरा संघ मिळाला
10
सुप्रिया सुळे पक्षाला फार पुढे नेऊ शकत नसल्याची जाणीव झाल्यानेच शरद पवारांनी...; अमित शाह स्पष्टच बोलले
11
बारामतीत EVM मशिन्स ठेवलेल्या स्ट्राँगरुमशी छेडछाड? आरोपानंतर अधिकाऱ्यांकडून आले स्पष्टीकरण
12
मुंबईतील भीषण दुर्घटनेनंतर सीएम-डीसीएम 'ॲक्शन मोड'वर; उच्चस्तरीय चौकशीचे आदेश!
13
बापरे! मुंबईत पेट्रोल पंपावर कोसळलेल्या महाकाय होर्डिंगखाली अडकली ८० वाहने; ३५ जण जखमी
14
नेहरूंच्या चुकांसाठी काँग्रेस मोदींना जबाबदार धरतेय, चीनच्या मुद्द्यावरून जयशंकर यांचा टोला
15
'आप'कडून स्टार प्रचारकांची यादी जाहीर, तुरुंगात असलेल्या मनीष सिसोदियासह ४० जणांची नावे
16
मुंबईतील 'तो' महाकाय लोखंडी सांगाडा बेकायदेशीर; २ दिवसांपूर्वीच दिली होती होर्डिंग हटवण्याची नोटीस
17
CSK चा सामना करण्यापूर्वी RCB ची ताकद कमी झाली! दोन तगड्या खेळाडूंनी माघार घेतली 
18
तेजप्रताप यादवांचा संयम सुटला, आरजेडी कार्यकर्त्याला मंचावरून ढकलले
19
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मुंबईतील प्रचार सभेबद्दल सुनील तटकरे म्हणाले- "आता ती जबाबदारी..."
20
25 वर्षांचा रेकॉर्ड मोडला; कलम 370 हटवल्यानंतर पहिल्यांदाच श्रीनगरमध्ये सर्वाधिक मतदान...

सचिन पायलट यांचे विमान जमिनीवर आणण्यासाठी सोनिया-गहलोत यांचा ‘डबल गेम’, अशी आखली रणनीती

By ऑनलाइन लोकमत | Published: July 20, 2020 10:00 AM

असंतुष्ट आमदारांच्या गटाला घेऊन भाजपाच्या दिशेने उड्डाण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सचिन पायलट यांच्या राजकीय विमानाला दिशाहीन केल्यानंतर त्यांचे हे राजकीय विमान जमिनीवर उतरवण्यासाठी अशोक गहलोत आणि सोनिया गांधी खास रणनीती आखली आहे.

ठळक मुद्देराजस्थानमध्ये मध्य प्रदेशची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी काँग्रेस नेतृत्व वेळीच सक्रीय सचिन पायलट यांना राजस्थानच्या उपमुख्यमंत्रिपदावरून आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून हटवतानाच संपूर्ण पक्ष संघटनेतच केले मोठे फेरबदल आता हायकोर्टाचा निर्णय पायलट गटाच्या बाजूने गेल्यास सभागृहात बहुमत परीक्षण करण्यासाठी काँग्रेसकडून पु्न्हा व्हिप जारी करण्यात येण्याची शक्यता

जयपूर - सचिन पायटल यांच्या बंडखोरीमुळे राजस्थानमध्ये सुरू झालेली राजकीय लढाई सध्या कायद्याच्या चौकटीत पोहोचली आहे. युवा पायलट आणि अनुभवी गहलोत यांच्यात वर्चस्व आणि सत्तासंघर्षावरून सुरू झालेल्या चढाओढीतील पहिल्या टप्प्यात अशोक गहलोत सचिन पायलट यांना वरचढ ठरले आहेत. आता पायटल गट न्यायालयात पोहोचला असला तरी राजस्थानमधील सत्ता राखण्याबाबत आता काँग्रेस निश्चिंत झाल्याचे चित्र आहे. दरम्यान, असंतुष्ट आमदारांच्या गटाला घेऊन भाजपाच्या दिशेने उड्डाण करण्याच्या प्रयत्नात असलेल्या सचिन पायलट यांच्या राजकीय विमानाला दिशाहीन केल्यानंतर त्यांचे हे राजकीय विमान जमिनीवर उतरवण्यासाठी अशोक गहलोत आणि सोनिया गांधी खास रणनीती आखली आहे.

सचिन पायलट यांच्या नेतृत्वाखालील बंडखोर आमदारांनी विधानसभा अध्यक्षांकडून मिळालेल्या अपात्रतेच्या नोटिशीला न्यायालयात आव्हान दिले आहे. मात्र या न्यायालयीन लढाईतही गहलोत गट निश्चिंत आहे. तसेच न्यायालयीन लढाईत पायलट गटाने बाजी मारली तरी त्यांची कोंडी करण्याची योजना गहलोत आणि काँग्रेसने तयार केली आहे. त्यामुळे सचिन पायलट आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी न्यायालयात बाजी मारली तरी त्यांनी काँग्रेससोबत यावे लागेल, किंवा विधानसभा सदस्यत्वावर पाणी सोडावे लागेल.  

काँग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी आणि राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गहलोत यांनी सचिन पायलट यांच्या गटाविरोधात असे चक्रव्युह रचले आहे ज्यातून बाहेर पडणे पायलट आणि त्यांच्या सहकाऱ्यांसाठी कठीण जाणार आहे. राजस्थानमध्ये मध्य प्रदेशची पुनरावृत्ती होऊ नये यासाठी काँग्रेस नेतृत्व वेळीच सक्रीय झाले होते. त्यांनी सचिन पायलट यांना राजस्थानच्या उपमुख्यमंत्रिपदावरून आणि काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदावरून हटवतानाच संपूर्ण पक्ष संघटनेतच मोठे फेरबदल केले. सचिन पायटल यांनी सात वर्षांच्या काळात पक्षसंघटनेमध्ये जेवढ्या लोकांना स्थान दिले होते तेवढ्यांना एका फटक्यात दूर करण्यात आले. पायलट यांच्याविरोधात सोनिया गांधींची ही पहिली चाल होती.

आता सचिन पायटल आणि त्यांच्या गटाला दुसरा धक्का देण्याची रणनीतीसुद्धा तयार झाली आहे. त्यानुसार आता हायकोर्टाचा निर्णय पायलट गटाच्या बाजूने गेल्यास सभागृहात बहुमत परीक्षण करण्यासाठी काँग्रेसकडून पु्न्हा व्हिप जारी करण्यात येण्याची शक्यता आहे. हा व्हिप बजावण्यात आल्यानंतर पायलट आणि त्यांच्या समर्थक आमदारांनी व्हिपचे पालन करावेच लागेल, अन्यथा त्यांना अपात्र ठरवण्याची प्रक्रिया अजून सोपी होईल.

इतर महत्त्वाच्या बातम्या 

coronavirus: धक्कादायक! कोरोनाच्या रिपोर्टमध्ये केले गोलमाल, डॉक्टर झाला मालामाल

भारतानंतर आता या देशाने चीनला दाखवली सैनिकी तादक, घुसखोरीला चोख प्रत्युत्तर देण्याचा दिला इशारा

 महिंद्रांनी सुरक्षा दलांसाठी आणले दणकट चिलखती अस्र; आता माओवादी, दहशतवाद्यांची खैर नाही

…म्हणून भारतातील दहा पैकी तीन कोरोना रुग्ण करू शकत नाहीत प्लाझ्मा दान

coronavirus: कोरोनाबाधित रुग्णाचे तब्बल दीड कोटींचे बिल केले माफ, तिकीट देऊन केली मायदेशी पाठवणी

गेल्या सहा महिन्यांत कोरोनाबाबत तज्ज्ञांना मिळाली ही महत्त्वाची माहिती, लस आणि हर्ड इम्युनिटीबाबत मिळाले असे संकेत…

टॅग्स :congressकाँग्रेसRajasthanराजस्थानAshok Gahlotअशोक गहलोतSachin Pilotसचिन पायलटSonia Gandhiसोनिया गांधीPoliticsराजकारण