Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2025 17:48 IST2025-06-17T17:46:38+5:302025-06-17T17:48:40+5:30
Sonam Raghuvanshi : मेघालय पोलिसांच्या एसआयटीने आज आरोपी सोनमला इतर आरोपींसह घटनास्थळी नेले.

Sonam Raghuvanshi : 'सोनमचा एन्काउंटर करा'; राजा रघुवंशीच्या भावाची पोलिसांकडे मोठी मागणी
Sonam Raghuvanshi : राजा रघुवंशी याची हत्या त्याची पत्नी सोनम रघुवंशी हिनेच केल्याचे समोर आले. या प्रकरणाचा तपास सुरू आहे. आज हत्येचा तपास मेघालय पोलिस करत आहेत. आज पोलिसांनी आरोपींना घटनास्थळी आणले होते. हत्येच्या कटात पत्नी सोनम सहभागी असल्याचे निष्पन्न झाले. आज पुन्हा २३ मे चा सीन पुन्हा तयार करण्यात आला आणि त्या दिवशी फक्त १८ मिनिटांत राजा रघुवंशीची हत्या कशी झाली हे उघड झाले. राजा रघुवंशीचे दोन्ही भाऊ मेघालय पोलिसांच्या तपासावर समाधानी दिसत आहेत.
Crime News : सोनमपेक्षाही खतरनाक निघाली ही महिला, पतीला चिकन आवडत होते; पत्नीने त्याला दिले अन्....
राजा रघुवंशी याचा मोठा भाऊ विपिन आणि सचिन म्हणाले एएनआय या वृत्तसंस्थेला बोलताना म्हणाले की, जर ते सोनम रघुवंशीला भेटले तर ते तिला विचारतील की तू राजाला का मारलेस? सचिन रघुवंशीने सोनमला जन्मठेपेची मागणी केली आहे. विपिनने सोनम रघुवंशीचे एन्काउंटर करण्याचीही मागणी केली आहे.
पोलिस आरोपींना घटनास्थळी घेऊन गेले
आज मेघालय पोलिसांच्या एसआयटीने आरोपी सोनमला घटनास्थळी नेले, तिच्यासोबत इतर आरोपी होते. यावर राजा रघुवंशीचा भाऊ विपिन म्हणाला की, मेघालय पोलिस राजाला न्याय मिळवून देण्यासाठी चांगले काम करत आहेत. जर मी सोनमसमोर आलो तर मी तिला विचारेन की तिने राजाला का मारले. मेघालय पोलिस गुन्ह्याचा बारकाईने तपास करत आहेत, त्यामुळे तपास चांगला चालला आहे. आम्ही या तपासावर खूश आहोत. यावेळी सोनमच्या एन्काउंटरची त्याने मागणी केली. 'हे लोक आता तुरुंगात जातील, नंतर त्यांना पॅरोलवर सोडले जाईल, एन्काउंटर करणे चांगले, त्यांना लगेच संपवा', अशी मागणी त्याने केली.
यावेळी सचिन रघुवंशी म्हणाले की, मी मनापासून म्हणतो की मेघालय पोलिस राजा हत्याकांडाचा तपास खूप चांगल्या प्रकारे करत आहेत. आज सोनममुळे मेघालयची बदनामी झाली आहे, यावर कठोर कारवाई झाली पाहिजे, तिला जन्मठेपेची शिक्षा झाली पाहिजे. सोनमला मरेपर्यंत तुरुंगात ठेवले पाहिजे.