शहरं
Join us  
Trending Stories
1
कोलकाता नाईट रायडर्सचा सहज विजय; दिल्ली कॅपिटल्सचे Play Off चे स्वप्न अधांतरी
2
"सुप्रिया बाहेरची असण्याचं कारण नाही, मी बारामतीत ज्या घरात राहतो ते तिचंच"; शरद पवारांनी स्पष्टच सांगितलं
3
जय शाह T20 WC साठीचा भारतीय संघ फायनल करणार, अजित आगरकर लिस्ट घेऊन अहमदाबादला 
4
अस्वस्थ झालेल्या सत्ताधाऱ्यांकडून वैयक्तिक आरोप; सामान्य मतदारांना EVM वर शंका- शरद पवार
5
स्वप्न पूर्ण न झालेले आत्मे देशाला अस्थिर करत आहेत; PM मोदींचा नाव न घेता पवारांवर निशाणा
6
पुण्यात महायुतीच्या उमेदवारांसाठी मोदींची सभा; मंचावर दिसले मनसे नेते अमित ठाकरे
7
रिषभ पंतच्या निर्णयाने दिल्लीच्या पायावर धोंडा! पण, कुलदीप यादवने चोपल्या सर्वाधिक धावा
8
"भाजप भयभीत, UCC मुळे हिंदूंना…"; ममता बॅनर्जी यांचा केंद्र सरकारवर निशाणा
9
वातावरण विरोधात जातंय हे पाहून देवेंद्र फडणवीसांनी...; जयंत पाटलांचा गंभीर आरोप
10
187 रुपयांच्या आईस्क्रीमसाठी Swiggy ला मोजावे लागले 5 हजार रुपये; जाणून घ्या काय आहे प्रकरण?
11
ओला कॅब्सचे सीईओ हेमंत बक्षी यांचा राजीनामा; 10 टक्के कर्मचाऱ्यांना काढून टाकण्याची तयारी
12
गुजरातमध्ये सर्वात श्रीमंत उमेदवार कोण? एकाकडे तर केवळ २ हजार रूपयांची संपत्ती
13
सुरेश रैनाने T20 World Cup 2024 साठी निवडला परफेक्ट संघ; गोलंदाजीत अनपेक्षित निवड
14
"मी जिवंत असेपर्यंत काँग्रेसला..."; पंतप्रधान मोदींनी साताऱ्याच्या सभेत विरोधकांना भरला सज्जड दम
15
'रामायण' साठी ही डिझायनर जोडी फायनल, संजय लीला भन्साळींशी आहे कनेक्शन
16
उद्धव ठाकरेंना शरद पवारांनी राजीनामा द्यायला लावला, राऊतांचा पाठिंबा होता; शिंदे गटाचा दावा
17
T20 World Cup 2024 साठी टीम इंडियाचा उपकर्णधार कोण? मोठी अपडेट समोर
18
VIDEO : 'लेव्हल सबके निकलेंगे' मधील व्हायरल मुलगी खरंच कोट्यधीश झाली का?
19
गुरुचरण सिंग यांचे वडील बोलण्याच्या मनस्थितीत नाहीत; नातेवाईक म्हणाले, 'त्याच्या लग्नाबद्दल...'
20
निवडणूक आली की मोदींना महाराष्ट्र आठवला का, गुजरातला उद्योग नेताना...; काँग्रेसची टीका

Sonali Bendre : अभिनेत्री सोनाली बेंद्रेला झालेला 'हाय ग्रेड कॅन्सर' म्हणजे नक्की काय?

By ऑनलाइन लोकमत | Published: July 04, 2018 1:29 PM

मायक्रोस्कोपखाली कॅन्सरच्या पेशींची तपासणी करुनच त्याची ग्रेड ठरवली जाते.

मुंबई- अभिनेत्री सोनाली बेंद्रे हिने आपल्याला हाय ग्रेड कॅन्सर झाल्याचे ट्वीट करुन आपल्या आजाराबद्दल सर्वांना माहिती दिली आहे. कॅन्सरचे अनेक प्रकार त्याच्या स्वरुपावरुन, तो पसरण्याच्या वेगावरुन ठरत असतात. त्यातीलच 'हाय ग्रेड' हा एक प्रकार आहे. मायक्रोस्कोपखाली कॅन्सरच्या पेशींची तपासणी करुनच त्याची 'ग्रेड' ठरवली जाते.

'हाय ग्रेड' या कर्करोगामध्ये कर्करोगाच्या पेशी 'लो ग्रेड' कर्करोगापेक्षा वेगाने वाढतात आणि वेगाने पसरतात. कर्करोगाचे असे ग्रेडस केल्यामुळे त्या रोगाचे पुढील चढउतार व संभाव्या उपचार यांचा विचार डॉक्टरांना करणे सोपे जाते. 'हाय ग्रेड' या कर्करोगामध्ये उपचार पद्धती आणि उपचार 'लो ग्रेड'पेक्षा अधिक तीव्रतेचे व वेगाने करावे लागतात.

ग्रेडसनुसार कर्करोग कोणत्या वेगाने वाढत आहे हे समजून येते.

  • ग्रेड 1- यामध्ये कर्करोगाच्या पेशी सामान्य पेशींप्रमाणे दिसतात व वेगाने वाढत नसतात.
  • ग्रेड 2- यामध्ये कर्करोगाच्या पेशी सामान्य पेशींप्रमाणे दिसत नसतात व सामान्य पेशींपेक्षा वेगाने वाढत असतात.
  • ग्रेड 3- यामध्ये कर्करोगाच्या पेशी असामान्य दिसतात आणि अत्यंत वेगाने आक्रमक पद्धतीने वाढत असतात.

सोनाली बेंद्रेने आपली कॅन्सरशी झुंज सुरू असल्याची माहिती तिनं स्वतः ट्विटरच्या माध्यमातून दिली आहे. सोनालीनं बुधवारी ट्विटरवर एक भावनिक पोस्ट करत याबाबतची माहिती दिली आहे. सध्या अमेरिकेतील न्यू-यॉर्क शहरात सोनालीवर उपचार सुरू आहेत.

सोनालीने आपल्या ट्विटर तसंच इन्स्टा अकाऊंटवर भावनिक पोस्टमध्ये लिहिले आहे की, ''कधी कधी आयुष्यात अशी वळणं येतात, ज्याबाबत आपण कधीच विचार केलेला नसतो. मला हायग्रेड कॅन्सर असल्याचे निदान झाले आहे.  माझे कुटुंबीय आणि मित्र-परिवार मला आजाराशी लढण्याचे बळ देताहेत. या गंभीर आजारावर उपचार घेण्यासाठी मी न्यूयॉर्कला आले आहे. विचित्र स्वरुपात शारीरिक वेदना झाल्यानंतर काही वैद्यकीय तपासणीअंती कॅन्सरचे निदान झाले''. सोनालीची ही पोस्ट वाचून तिच्या चाहत्यांना धक्काच बसला आहे. ''सोनाली Get Well Soon', असं म्हणत चाहते  तिच्या आरोग्यासाठी प्रार्थनासाठी करत आहेत.

टॅग्स :Sonali Bendreसोनाली बेंद्रेcancerकर्करोगbollywoodबॉलिवूडentertainmentकरमणूक