कन्नड अभिनेत्रीच्या बलात्कारप्रकरणी रेल्वेमंत्र्याच्या पुत्राला अंतरिम जामीन

By Admin | Updated: September 9, 2014 04:01 IST2014-09-09T04:01:14+5:302014-09-09T04:01:14+5:30

एका कन्नड अभिनेत्रीचे कथित अपहरण व बलात्कारप्रकरणी येथील एका न्यायालयाने रेल्वेमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांचा मुलगा कार्तिक यास आज सोमवारी अग्रिम जामीन मंजूर केला

Son of railway minister in interim bail in rape case of Kannada actress | कन्नड अभिनेत्रीच्या बलात्कारप्रकरणी रेल्वेमंत्र्याच्या पुत्राला अंतरिम जामीन

कन्नड अभिनेत्रीच्या बलात्कारप्रकरणी रेल्वेमंत्र्याच्या पुत्राला अंतरिम जामीन

बेंगळुरू : एका कन्नड अभिनेत्रीचे कथित अपहरण व बलात्कारप्रकरणी येथील एका न्यायालयाने रेल्वेमंत्री डी. व्ही. सदानंद गौडा यांचा मुलगा कार्तिक यास आज सोमवारी अग्रिम जामीन मंजूर केला.
तीन दिवसांपूर्वी एका दंडाधिकारी न्यायालयाने याप्रकरणी कार्तिकविरुद्ध अटक वॉरंट जारी केला होता आणि पोलिसांनी त्याला फरार घोषित करीत त्याच्या शोधासाठी पथके रवाना केली होती. आज सत्र न्यायालयाने कार्तिकला जामीन मंजूर केला, तसेच या प्रकरणाची सुनावणी शनिवारपर्यंत लांबणीवर टाकली. दरम्यान, पीडित अभिनेत्रीने या आदेशाविरुद्ध उच्च न्यायालयात जाण्याचा निर्णय घेतला आहे. आमच्याकडे पुरावे आहेत. त्यामुळे आम्ही जामीन रद्द करण्यासाठी उच्च न्यायालयात जाऊ, असे पीडित अभिनेत्रीच्या वकिलाने सांगितले.

Web Title: Son of railway minister in interim bail in rape case of Kannada actress