उपचारांविना मुलाचा मृत्यू, ई-रिक्षामधून मृतदेह नेण्याची आईवर आली वेळ 

By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2021 01:28 PM2021-04-20T13:28:13+5:302021-04-20T13:36:11+5:30

corona virus : उत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्ये अशीच हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे किडणीच्या समस्येचा सामना करत असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला.

The Son died without treatment, it was time for the mother to take the body from the e-rickshaw | उपचारांविना मुलाचा मृत्यू, ई-रिक्षामधून मृतदेह नेण्याची आईवर आली वेळ 

उपचारांविना मुलाचा मृत्यू, ई-रिक्षामधून मृतदेह नेण्याची आईवर आली वेळ 

Next

वाराणसी - कोरोना विषाणूच्या संकटामुळे अन्य आजारांशी झुंजत असलेल्या लोकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागणार आहे. (coronavirus) उत्तर प्रदेशमधील वाराणसीमध्ये अशीच हृदयद्रावक घटना घडली आहे. येथे किडणीच्या समस्येचा सामना करत असलेल्या एका तरुणाचा मृत्यू झाला. मात्र त्याचा मृतदेह नेण्यासाठी अॅम्ब्युलन्स मिळाली नाही. त्यामुळे मृताच्या आईला तिच्या पोटच्या गोळ्याचा मृतदेह ई रिक्षामधून न्यावा लागला. (The Son died without treatment, it was time for the mother to take the body from the e-rickshaw)

वाराणसीमध्ये घडलेली ही घटना धक्कादायक आणि व्यवस्थेचं वास्तव समोर आणणारी आहे. वाराणसीमधील बीएचयूच्या सुंदरलाल रुग्णालयात एक वृद्ध आई तिच्या मुलाला किडणीच्या आजारावर उपचार करण्यासाठी घेऊन आली होती. मात्र वेळीच उपचार न मिळाल्याने तिच्या मुलाचा मृत्यू झाला. मृत्यूनंतर त्याचा मृतदेह नेण्यासाठी अॅम्ब्युलन्स मिळाली नाही. त्यामुळे तिचा मृतदेह पायांजवळ ठेवून ई-रिक्षामधून न्यावा लागला. 

मिळालेल्या माहितीनुसार ज्या तरुणाचा मृत्यू झाला तो जौनपूर येथील रहिवासी आहे. तो मुंबईत काम करत होता. एका विवाह सोहळ्यासाठी तो आला होता. तिथेच त्याची प्रकृती बिघडली. त्याला उपचारांसाठी नेण्यात आले आहे. मात्र त्याला इथे दाखल करण्यात आले नाही. त्यादरम्यान, या तरुणाचा उपचाराविना मृत्यू झाला. 

कोरोनाचे संकट वाढत असताना राज्यातील प्रत्येक रुग्णालयाची बिकट अवस्था आहे. वाराणसीमध्ये अशीच परिस्थिती आहे. येथील रुग्णालयामध्ये बेड्स उपलब्ध नाहीत. तसेच ऑक्सिजनचीही मोठ्या प्रमाणात टंचाई निर्माण झाली आहे. या पार्श्वभूमीवर अलाहाबाद हायकोर्टाने वाराणसीसह पाच शहरांमध्ये लॉकडाऊन लावण्याचे आदेश दिले आहे. मात्र उत्तर प्रदेश सरकारने लॉकडाऊन लावण्यास नकार दिला आहे. 

Web Title: The Son died without treatment, it was time for the mother to take the body from the e-rickshaw

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.