'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 5, 2025 19:22 IST2025-10-05T19:21:22+5:302025-10-05T19:22:58+5:30
परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी KEC 2025 परिषदेत भारत-अमेरिका संबंध आणि रशियाकडून इंधन खरेदीवर सविस्तर भाष्य केले.

'अमेरिकेसोबत काही मुद्दे सोडवायला हवेत', ट्रेड डील आणि टॅरिफबाबत जयशंकर यांचे मोठे विधान
S Jaishankar on India-America Relation:भारताचे परराष्ट्र मंत्री डॉ. एस. जयशंकर यांनी KEC 2025 परिषदेत भारत-अमेरिका व्यापार संबंध, रशियाकडून इंधन आयात आणि QUAD गटाच्या कार्यप्रणालीवर सविस्तर भाष्य केले. त्यांनी मान्य केले की, सध्या भारत आणि अमेरिकेमध्ये व्यापारिक मुद्द्यांवर मतभेद आहेत आणि या संदर्भात अद्याप अंतिम करार (Trade Agreement) झालेला नाही.
VIDEO | Delhi: On Indo-US relations, External Affairs Minister Dr S Jaishankar at KEC 2025 says, "We have issues with the United States today - mainly that we haven’t yet reached a landing ground in our trade discussions. This has led to certain tariffs being levied on us, which… pic.twitter.com/px1jUEzV5x
— Press Trust of India (@PTI_News) October 5, 2025
भारत-अमेरिका व्यापारातील असहमती
डॉ. जयशंकर यांनी स्पष्टपणे सांगितले की, 'अमेरिकेने भारतावर काही कर लादले आहेत, ज्यांना भारताने जाहिरपणे अन्यायकारक म्हटले आहे. या टॅरिफमागील कारण म्हणजे दोन्ही देशांमध्ये काही व्यापारिक अटी आणि करारांबाबत अडथळे अद्याप कायम आहेत. भारत सरकार हे अडथळे दूर करण्यासाठी व्यापक चर्चा करत असून, दोन्ही देशांना मान्य होईल असा मार्ग शोधला जात आहे.'
“धर्म-भाषा काहीही असो, आपण सर्व हिंदू आहोत; ब्रिटिशांनी आपल्यात फूट पाडली”- मोहन भागवत
'रशियाकडून इंधन खरेदी केल्यामुळे अमेरिकेकडून आणखी एक टॅरिफ लागू झाला आहे. ज्यांचे रशियाशी अधिक गुंतागुंतीचे किंवा आव्हानात्मक संबंध आहेत, त्यांनीही अशाच प्रकारची खरेदी सुरू ठेवली आहे. या मुद्यांवर विवेकपूर्ण संवादाद्वारे तोडगा काढणे आवश्यक आहे आणि भारत त्या दिशेने काम करतोय. आजच्या अस्थिर जागतिक परिस्थितीत आंतरराष्ट्रीय सहकार्य आणि स्थिरता टिकवणे अत्यावश्यक आहे,' अशी प्रतिक्रिया जयशंकर यांनी दिली.
VIDEO | Delhi: On QUAD, External Affairs Minister Dr S Jaishankar at KEC 2025 says, "This year we had two meetings of QUAD foreign ministers, the first just after President Trump assumed power. QUAD is alive and well. In turbulent times, it’s important to assess challenges… pic.twitter.com/AX877FP8xw
— Press Trust of India (@PTI_News) October 5, 2025
QUAD विषयी काय म्हणाले?
डॉ. जयशंकर यांनी QUAD (भारत, अमेरिका, जपान आणि ऑस्ट्रेलिया) संदर्भात सांगितले की, 'QUAD सक्रिय आहे. या वर्षी QUAD देशांच्या परराष्ट्र मंत्र्यांच्या दोन बैठका झाल्या आहेत. आव्हानांना जबाबदारीने हाताळणे आवश्यक आहे. ना समस्या पूर्णपणे नाकारणे योग्य आहे, ना तिला अतिशयोक्तीने भीतीदायक समजणे योग्य आहे. जयशंकर यांनी आपल्या भाषणात असेही म्हटले की, भारत सकारात्मक कूटनीती, संवाद आणि सहकार्याद्वारे समस्यांचे निराकरण करण्यावर विश्वास ठेवतो. QUAD सारख्या मंचांद्वारे जागतिक स्थैर्य आणि सहकार्य वाढवणे ही भारताची प्राथमिकता आहे.' परराष्ट्रमंत्र्यांचे हे विधान QUAD विषयीची भारताची समतोल आणि व्यवहार्य भूमिका अधोरेखित करते.