जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 26, 2025 06:34 IST2025-12-26T06:33:51+5:302025-12-26T06:34:06+5:30
सुधारित नियम सेनेतील सर्व दर्जांच्या (रँक) अधिकारी व जवानांना लागू आहेत. काही दिवसांपूर्वीच हे नियम अंमलात आणण्यात आले.

जवानांना करता येणार नाही इन्स्टावर पोस्ट, कमेंट! सोशल मीडिया वापरावर लष्कराने आणले निर्बंध
लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : भारतीय लष्कराने सोशल मीडिया वापराबाबतच्या मार्गदर्शक सूचनांमध्ये बदल केला असून, आता सेनेतील अधिकारी व जवान इन्स्टाग्रामवर खाते उघडू शकतील. मात्र, ते केवळ प्रेक्षक म्हणूनच वापरू शकतील.
या नियमांचा मुख्य उद्देश राष्ट्रीय सुरक्षा आणि गोपनीय माहितीचे संरक्षण करणे हा आहे. कोणत्याही पोस्टला लाईक करणेही नियमभंग ठरेल, असे स्पष्ट करण्यात आले आहे.
इन्स्टाग्रामवर खाते उघडता येईल I पोस्ट, व्हिडीओ, रील्स फक्त पाहता येतील
कोणतीही पोस्ट टाकणे I पोस्टवर कमेंट करणे I पोस्टला लाईक करणे I ‘कंटेंट’ शेअर करणे
हे सुधारित नियम सेनेतील सर्व दर्जांच्या (रँक) अधिकारी व जवानांना लागू आहेत. काही दिवसांपूर्वीच हे नियम अंमलात आणण्यात आले.
हा बदल का केला?
डिजिटल युगात सैनिकांना घडामोडींची जाणीव राहावी, देश-विदेशातील बातम्या, घडामोडी समजाव्यात, हा या बदलामागील हेतू आहे. मात्र, त्याचवेळी संवेदनशील किंवा गोपनीय माहिती चुकूनही बाहेर जाऊ नये, यासाठी कडक मर्यादा घालण्यात आल्या आहेत.
एक्ससाठीचे तेच नियम
यापूर्वीही सेनेतील जवानांना एक्स (X) वर खाते वापरण्याची मुभा होती, पण तिथेही पोस्ट, री-पोस्ट, कमेंट करण्यास बंदी असून, फक्त पाहण्याचीच परवानगी आहे. इन्स्टाग्रामलाही हेच नियम लागू करण्यात आले आहेत.