...म्हणून त्याने फेसबुकवर गर्लफ्रेंडसोबत केला लाइव्ह सेक्स, पोलिसांनी घातल्या बेड्या 

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 17, 2017 16:00 IST2017-09-17T15:50:48+5:302017-09-17T16:00:03+5:30

पोलिसांनी गर्लफ्रेंडसोबत घालवलेल्या खासगी क्षणांना फेसबुकवर लाइव्ह अपलोड केल्याप्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत.

... so he did live sex with girlfriends on Facebook, the girls were locked in | ...म्हणून त्याने फेसबुकवर गर्लफ्रेंडसोबत केला लाइव्ह सेक्स, पोलिसांनी घातल्या बेड्या 

...म्हणून त्याने फेसबुकवर गर्लफ्रेंडसोबत केला लाइव्ह सेक्स, पोलिसांनी घातल्या बेड्या 

ठळक मुद्दे तामिळनाडूला पळून जाण्याच्या तयारीत असताना आरोपी लिनूला पोलिसांनी बेड्या घातल्या.  आरोपीने प्राथमिक चौकशीत फेसबुकवर जास्त लाइक मिळवण्यासाठी व्हिडीओ लाइव्ह केल्याचं सांगितलं पण कसून चौकशी केल्यावर त्याने...

 इडुकी/तिरुवनंतपुरम, दि. 17 - केरळच्या इडुकी जिल्हा पोलिसांनी गर्लफ्रेंडसोबत घालवलेल्या खासगी क्षणांना फेसबुकवर लाइव्ह अपलोड केल्याप्रकरणी बेड्या ठोकल्या आहेत. फेसबुकवर लाइक वाढवण्यासाठी असा प्रकार केल्याचं त्यानं प्राथमिक चौकशीत सांगितलं होतं. मात्र, कसून चौकशी केल्यानंतर आपल्या प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी खासगी क्षणांना फेसबुकवर लाइव्ह केल्याची कबुली दिली. अटक करण्यात आलेल्या आरोपीचं नाव लिनू (वय-23) असं आहे. तो राजाक्कड येथील एका हॉटेलमधला कर्मचारी आहे. 

लिनूच्या गर्लफ्रेंडने पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली आहे. तक्रारकर्ता महिला विवाहीता असून एका मुलाची आई आहे, पण ती आपल्या पतीपासून वेगळी राहते. दोघांची फेसबुकवरच मैत्री झाली होती. फेसबुकवरच ही मैत्री बहारत गेली आणि अनेकदा दोघांमध्ये शारीरिक संबंध प्रस्थापित झाले.  6 सप्टेंबर रोजी दोघं पुन्हा भेटले पण यावेळी लिनूने दोघांमधल्या खासगी क्षणांना फेसबुकवर लाइव्ह केलं. त्यानंतर हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झाला.

लग्नाचं आमिष दाखवून बलात्कार केल्याचा आरोप महिलेने केला आहे. तर महिलेच्या बहिणीने तो व्हिडीओ सोशल मीडियावरून काढून टाकण्यासाठी तक्रार केली आहे. तामिळनाडूला पळून जाण्याच्या तयारीत असताना आरोपी लिनूला पोलिसांनी बेड्या घातल्या.  

आरोपीने प्राथमिक चौकशीत फेसबुकवर जास्त लाइक मिळवण्यासाठी व्हिडीओ लाइव्ह केल्याचं सांगितलं पण कसून चौकशी केल्यावर त्याने आपण प्रेयसीला धडा शिकवण्यासाठी व्हिडीओ लाइव्ह केल्याचं सांगितलं. लग्नाच्या गोष्टीवरून दोघांमध्ये जोरदार भांडण झालं होतं आणि त्यामुळे तिचा बदला घेण्यासाठी व्हिडीओ लाइव्ह केला असं तो म्हणाला. पोलिसांनी आरोपीचा मोबाइल फोन ताब्यात घेतला आहे. 
 

 

Web Title: ... so he did live sex with girlfriends on Facebook, the girls were locked in