...म्हणून भारत-चीनसाठी महत्त्वपूर्ण आहे गलवान खोरे, जिथे आज सैनिकांमध्ये झाली झटापट

By ऑनलाइन लोकमत | Published: June 16, 2020 04:14 PM2020-06-16T16:14:42+5:302020-06-16T17:34:57+5:30

सुमारे ५० वर्षानंतर भारत आणि चीनमध्ये सीमेवर हिंसक संघर्ष झाल्याने दोन्ही देशांमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि जिथे हा संघर्ष झाला ते गलवान खोरे प्रकाशझोतात आले आहे.

... So the Galvan Valley important for India & China, where there was a clash between the troops today | ...म्हणून भारत-चीनसाठी महत्त्वपूर्ण आहे गलवान खोरे, जिथे आज सैनिकांमध्ये झाली झटापट

...म्हणून भारत-चीनसाठी महत्त्वपूर्ण आहे गलवान खोरे, जिथे आज सैनिकांमध्ये झाली झटापट

googlenewsNext
ठळक मुद्देगलवान नदीच्या आसपास वसलेल्या या प्रदेशामध्ये १९६२ नंतर प्रथमच तणाव निर्माण झाला चीन शिन्जियांग-तिबेट महामार्गापासून भारताला दूर ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे.युद्धकाळात उंचावर असेल्यांना युद्धक्षेत्रात आघाडी असते. त्यामुळे भारताला उंचावरील क्षेत्रात हुकूमत प्रस्तापित करता येऊ नये असा चीनचा प्रयत्न आहे

लडाख - गेल्या काही दिवसांपासून लडाखमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेवर सुरू असलेल्या तणावाचा विस्फोट होऊन भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये आज हिंसक झटापट झाली. यामध्ये भारताच्या एका अधिकाऱ्यासह अन्य दोन जवानांना वीरमरण आले. तर भारताने दिलेल्या प्रत्युत्तरात पाच चीनी ठार झाले आहेत. दरम्यान, सुमारे ५० वर्षानंतर भारत आणि चीनमध्ये सीमेवर हिंसक संघर्ष झाल्याने दोन्ही देशांमधील प्रत्यक्ष नियंत्रण रेषा आणि जिथे हा संघर्ष झाला ते गलवान खोरे प्रकाशझोतात आले आहे. या गलवान खोऱ्याचे स्वत:चे असे सामरिक महत्त्व आहे. त्यामुळे या भागावर नियंत्रण मिळवण्यासाठी चीनचा आटापिटा सुरू आहे.

 गलवान नदीच्या आसपास वसलेल्या या प्रदेशामध्ये १९६२ नंतर प्रथमच तणाव निर्माण झाला आहे. खरंतर या भागातील प्रत्यक्ष नियंत्रण रेषेची आखणी स्पष्टपणे झालेली आहे. तसेच ती दोन्ही पक्षांनी स्वीकारही केली होती. मात्र आज दोन्ही देशांचे सैन्या नियंत्रण रेषेजवळ समोरासमोर आलेले आहे.

१९६२ मध्ये चीनने भारतावर पूर्व आणि उत्तर भागातून आक्रमण केले होते. त्यात लडाखमधील भागावर हल्ला करण्याचे कारण म्हणजे चीनने शिन्जियांग प्रांत आणि तिबेटदरम्यान, एक रस्ता बांधला. जी२१९ या नावाने ओळखल्या जाणाऱ्या या रस्त्याचा सुमारे १७९ किमी भाग चीनने भारतापासून बळकावलेल्या अक्साई चीनमधून जातो. दरम्यान, हा रस्ता बांधल्यानंतर चीनने या भागावर दावा केला. तसेच १९६२ च्या युद्धात आक्रमण करून केलेल्या दाव्यापेक्षा अधिक भागावर कब्जा केला.  

चीन या शिन्जियांग-तिबेट महामार्गापासून भारताला दूर ठेवण्यासाठी प्रयत्नशील आहे. त्यामुळे या देशाने या क्षेत्रातील सर्व प्रमुख दऱ्या आणि क्रेस्टलाइन्सवर आपला कब्जा दिसेल असा दावा केला. आहे. युद्धकाळात उंचावर असेल्यांना युद्धक्षेत्रात आघाडी असते. त्यामुळे भारताला उंचावरील क्षेत्रात हुकूमत प्रस्तापित करता येऊ नये असा चीनचा प्रयत्न आहे.  

दरम्यान, गलवान खोऱ्यातील गलवान नदीच्या बाबतीत रिजलाईन नदीजवळून जाते. त्यामुळे श्योर रूटवरील दऱ्यांमध्ये चीनला आघाडी घेण्याची संधी मिळते. जर चीनने गलवान खोऱ्यातील संपूर्ण भागाला नियंत्रित केले नसते तर अक्साई चीनच्या पठारावर भारताला पोहोचता आले अशते. त्यामुळे चीनला धोका निर्माण झाला असता.  

दरम्यान, लडाखमधील उत्तर पूर्व भागात असलेला दौलत बेग ओल्डी हा भाग भारताच्या नियंत्रणात आहे. अक्साई चीन पठारावरील भारताच्या उपस्थितीचे प्रतिनिधित्व हा भाग करतो. या भागाला जोडणारा चांगला रस्ता नसल्याने येथे विमान किंवा हेलिकॉप्टरच्या मदतीने नियंत्रणात ठेवले जात आहे. मात्र या भागात रस्त्याची बांधणी करण्याचे काम सुरू आहे. मात्र हा रस्ता श्योक नदीच्या पश्चिम किनाऱ्यावर असल्याने हिमनग वितळल्यानंतर या रस्त्याचे नुकसान होते. श्योक नदीच्या किनाऱ्यावरून दौलत बेग ओल्डीकडे जाणारा  मार्ग हा मार्ग भारताच्या दृष्टीने महत्त्वपूर्ण आहे.

त्यामुळेच १९६२ मध्ये जेव्हा चीनने भारतावर आक्रमण केले होते. त्यावेळी २० ऑक्टोबर रोजी चीनने गलवान विभागातील भारतीय चौक्यांना लक्ष्य केले होते. येथील भारतीय जवानांनी तेव्हा येथे प्राण पणाला लावले होते. मात्र चीन्यांच्या संख्याबळासमोर त्यांचे प्रयत्न अपुरे पडले होते. 

इतर महत्त्वाच्या बातम्या

सीमेवरची ती चकमक ज्यात भारतीय लष्कराने चीनला दिला होता धोबीपछाड

त्या प्रस्तावाबाबत रशियाने घेतली भारताला प्रतिकूल भूमिका, चीनला दिले झुकते माप

जबरदस्त! LOCवर कुरापती काढणाऱ्या पाकिस्तानला भारतीय लष्कराचा दणका, १० चौक्या केल्या उद्ध्वस्त

ती संधी साधली आणि चीन अमेरिकेला आव्हान देणारी महासत्ता बनली

गाईच्या शरीरात सापडला कोरोनाला संपवण्याचा उपाय, या कंपनीने केले संशोधन

coronavirus: चौफेर टीकेनंतर चीनने श्वेतपत्रिका काढली, कोरोना कधी, कसा, कुठे पसरला सगळी माहिती दिली 

 त्यामुळेच १९६२ मध्ये जेव्हा चीनने भारतावर आक्रमण केले होते. त्यावेळी २० ऑक्टोबर रोजी चीनने गलवान विभागातील भारतीय चौक्यांना लक्ष्य केले होते. येथील भारतीय जवानांनी तेव्हा येथे प्राण पणाला लावले होते. मात्र चीन्यांच्या संख्याबळासमोर त्यांचे प्रयत्न अपुरे पडले होते.

 मिळत असलेल्या माहितीनुसार सद्यस्थितीत मे महिन्याच्या पहिल्या आठवड्यात भारत आणि चीनच्या सैनिकांमध्ये गलवान नदीच्या क्षेत्रात आमना-सामना झाला होता. त्यावेळी चीनी सैन्याने नदी ओलांडून एलएसी पार केली होती. तिथे त्यांची भारतीय सैनिकांसोबत झटापट झाली. त्यानंतर चीनी सैनिक आपल्या भागात परत गेले. सध्या एलएसीच्या दोन्ही बाजूने सैनिक तैनात असल्याचे दिसत आहे. मात्र चीनने एलएसीवरील भारताच्या कुठल्याही भागावर कब्जा केल्याचे समोर आलेले नाही. मात्र २०१६ च्या तुलनेत चीनने नियंत्रण रेषेपर्यंत बांधकाम केल्याचे समोर येत आहे

Web Title: ... So the Galvan Valley important for India & China, where there was a clash between the troops today

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.