...म्हणून बेअर ग्रिल्सला माझे हिंदीतील संभाषण समजले; मोदींनी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2019 18:01 IST2019-08-25T18:00:09+5:302019-08-25T18:01:49+5:30

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  डिस्कवरी चॅनलवर  बेअर ग्रिल्सच्या ‘मॅन वर्सेज वाईल्ड’ या कार्यक्रमात सहभाग घेतला होता.

... so bare greels understood my conversation in Hindi; Modi reveals | ...म्हणून बेअर ग्रिल्सला माझे हिंदीतील संभाषण समजले; मोदींनी केला खुलासा

...म्हणून बेअर ग्रिल्सला माझे हिंदीतील संभाषण समजले; मोदींनी केला खुलासा

नवी दिल्ली: पंतप्रधान नरेंद्र मोदींनी  डिस्कवरी चॅनलवर  बेअर ग्रिल्सच्या ‘मॅन वर्सेज वाईल्ड’ या कार्यक्रमात सहभाग घेतला होता. या कार्यक्रात नरेंद्र मोदी बेअर ग्रिल्ससोबत अनेकदा हिंदीत संभाषण केल्याने ग्रिल्सला हिंदी कसे समजत असणार असा प्रश्न अनेकांनी उपस्थित केला होता. त्याचा उलगडा नरेंद्र मोदींनी आज झालेल्या मत की बात या कार्यक्रमात स्पष्ट केले.

मोदींनी या कार्यक्रमात सांगितले की, मी ग्रिल्ससोबत अनेकदा हिंदीतून संवाद साधत असल्याने काही जणांना हे शॅाट्स एडिट करण्यात किंवा अनेकवेळा चित्रीत केल्याचे बोलले जात होते. परंतु असे काहीही झाले नसून आम्ही तंत्रज्ञानाचा वापर केला होता. बेअर ग्रिल्सच्या कानात एक वायरलेस उपकरण लावण्यात आले होते. त्यामध्ये मी हिंदीत बोलत असलेले शब्द इंग्रजीत भाषांतरित केले जात होते. त्यामुळे बेअर ग्रिल्सला मी काय बोलतो, हे कळत असल्याचा खुलासा यावेळी मोदींनी केला. 

‘मॅन वर्सेज वाईल्ड’ हा विशेष एपिसोड 12 ऑगस्टला प्रदर्शित करण्यात आला होता. तसेच हा कार्यक्रम देशातच नाही, तर जगभरात पाहिला गेला असल्याचे बेअर ग्रिल्सने स्वतः इंस्टाग्रामवर पोस्ट शेअर करत सांगितले होते.

Web Title: ... so bare greels understood my conversation in Hindi; Modi reveals

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.