...म्हणून २० पुरुषांना सर्जरी करून बनायचे आहे महिला, या शहरात लिंगपरिवर्तनाचा वाढतोय ट्रेंड

By ऑनलाइन लोकमत | Published: March 9, 2021 12:04 PM2021-03-09T12:04:21+5:302021-03-09T12:12:45+5:30

Growing trend of gender change : लिंग परिवर्तन (gender change ) करण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. येथे दुहेरी व्यक्तीमत्त्व असलेल्या २० व्यक्ती समोर आल्या असून, त्यांनी सर्जरी करून पुरुषापासून महिला बनण्याची तयारी केली आहे.

... so 20 men want to become women through surgery, the growing trend of gender change in Ahmedabad | ...म्हणून २० पुरुषांना सर्जरी करून बनायचे आहे महिला, या शहरात लिंगपरिवर्तनाचा वाढतोय ट्रेंड

...म्हणून २० पुरुषांना सर्जरी करून बनायचे आहे महिला, या शहरात लिंगपरिवर्तनाचा वाढतोय ट्रेंड

Next

अहमदाबाद - गुजरातमध्ये (Gujarat) सध्या लिंग परिवर्तन (gender change ) करण्याचा ट्रेंड वाढत चालला आहे. येथे दुहेरी व्यक्तीमत्त्व असलेल्या २० व्यक्ती समोर आल्या असून, त्यांनी सर्जरी करून पुरुषापासून महिला बनण्याची तयारी केली आहे. यातील अनेकजण सर्जरीच्या वेगवेगळ्या पातळीवर पोहोचले आहेत. दरम्यान लिंगपरिवर्तन करणारे अनेकजण आपली नवी ओळख लपवण्यासाठी आपल्या गाव-खेड्यांमध्ये आधीच्या प्रमाणेच राहत आहेत. तसेच आता समाजसुद्धा त्यांनी सहजपणे स्वीकारत आहे. (... so 20 men want to become women through surgery, the growing trend of gender change in Ahmedabad )

याबाबत दैनिक भास्करने प्रसारित केलेल्या एका रिपोर्टमध्ये प्लॅस्टिक सर्जन डॉ. हर्ष अमीन यांनी सांगितले की, २०२०-२१ मध्ये केवळ अहमदाबादमध्ये अशा सर्जरींचा आकडा हा एक हजारांवर पोहोचला आहे. वर्षभरात ५०-६० रुग्णांची तपासणी केली, ज्यामध्ये १४ पुरुषांची सर्जरी मी केली आहे. माझ्याप्रमाणे अहमदाबादमध्ये ८० हून अधिक प्लॅस्टिक सर्जन आहेत. 

दरम्यान, अहमदाबादमदील सीनियर प्लॅस्टिक सर्जन डॉ. श्रीकांत लागवणकर यांनी सांगितले की, कॉर्पोरेट हॉस्पिटलमध्ये या प्रकारच्या सर्जरीसाठी ८ लाख रुपयांपर्यंत खर्च होऊ शकतो. बहुतांश लोक ओळख उघड होण्यापासून वाचवण्यासाठी परदेशात जाऊन अशा प्रकारची सर्जरी करवून घेतात. मात्र आता ट्रेंड बदलत आहे. मागच्या १५ दिवसांमध्येच अहमदाबादमध्ये अशा प्रकारच्या ६ जणांची सर्जरी झाली आहे. 

अशाच प्रकारची केस डॉ. जेसनूर दायरा यांची आहे. त्या एक ट्रान्सवुमन आहेत. त्यांनी हल्लीच रशियामधील एका विद्यापीठामधून एमबीबीएसची पदवी घेतली होती. त्यांचा जन्म पुरुषाच्या रूपात झाला होता. मात्र त्या स्वत:ला महिला मानत असत. त्या हिशेबाने त्या राहू इच्छित होत्या. मात्र त्यांनी आपली ही इच्छा आपल्या कुटुंबीयांना सांगितली नव्हती. मात्र आता त्यांना या बाबीचा स्वीकार करण्यास कुठल्याही प्रकारचा संकोच वाटत नाही. आता त्या आपले लिंगपरिवर्तीतक करून घेण्यास इच्छुक आहेत. 

इतर आई-वडिलांप्रमाणेच जेसनूर दायरासुद्धा आपल्या मुलांचे पालन-पोषण करण्यास इच्छुक आहेत. त्या या वर्षाच्या अखेरीस आपले लिंगपरिवर्तन करून पूर्णपणे महिला बनण्यासाठी तयार आहेत. मात्र त्याआधी त्यांनी आपले सीमन फ्रीज केले आहे. त्यामुळे जैविक दृष्ट्या मूल त्यांचेच असेल कारण वडील म्हणून त्यांच्या सीमनमध्ये असलेल्या स्पर्ममधूनच जन्म घेईल. 

Web Title: ... so 20 men want to become women through surgery, the growing trend of gender change in Ahmedabad

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.