शहरं
Join us  
Trending Stories
1
भय इथले संपत नाही! अमेरिका-इराण शस्त्रसंधी झाली तरी आखाती देश हाय अलर्टवर; तणाव कायम
2
HDFC Bank New Rates: एचडीएफसी बँकेच्या व्याजदरात बदल; लोनच्या EMI वर होणार परिणाम, पटापट चेक करा नवे दर
3
आजचे राशीभविष्य, ०८ एप्रिल २०२६: नोकरदारांना ऑफिसमध्ये अनुकूल वातावरण, आर्थिक लाभाची शक्यता
4
Iran युद्धात शस्त्रसंधीच्या घोषणेनं दिलासा; कच्च्या तेलाच्या किमतीत मोठी घसरण आणि अमेरिकन बाजारात बंपर तेजी
5
धक्कादायक वास्तव! हा बघा मुंबई विद्यापीठाच्या क्रीडा संकुलातील ‘जलतरण तलाव’
6
अखेर शस्त्रसंधी झाली तरी कशी? अमेरिकेला पाठवला १० कलमी प्रस्ताव; इराणने केली भूमिका स्पष्ट
7
ट्रम्प-इराण युद्धविरामात पाकिस्तानचा गेम? 'कॉपी-पेस्ट' मेसेजने पोलखोल, शाहबाज यांची स्क्रिप्ट कुणी लिहिली?
8
आठ वर्षांच्या चिमुरडीचा डम्परखाली चिरडून मृत्यू; संतप्त नागरिकांचा रास्ता रोको, चालकाला अटक
9
अमेरिका-इराणमध्ये २ आठवड्यांसाठी युद्धबंदी; डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून हल्ले थांबवण्याची घोषणा
10
पहिल्या पॉड टॅक्सीचे भूमिपूजन; मात्र कुर्ला ते वांद्रे रेल्वे स्थानक प्रवासासाठी २०३१ची प्रतीक्षा
11
‘टनेल बोरिंग’ मशिनवर 'ठाणेकर' उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे ठेवणार नजर- मुख्यमंत्री फडणवीस
12
बंगालमध्ये मतदारयादीत 'महा-सफाई'! आगामी विधानसभा निवडणुकीआधी वगळली ९१ लाख नावे
13
इशारा : युद्धामुळे महागाई, व्याजदर वाढणार; ‘जेपी मॉर्गन चेस’चे सीईओ जेमी डिमन यांचे भाकीत
14
भोंदूबाबा अशोक खरात संबंधीच्या ४,६५० अश्लील लिंक डिलीट; ६० दिवसांत दोषारोपपत्र
15
पुनर्वसनानंतर १२ हजार कोटींचा बोजा; नवी मुंबईच्या गळ्याला बसणार लोकसंख्येचा फास
16
२०१४ मधील पोलिस कोठडी मृत्यू प्रकरणी सात पोलिसांविरुद्ध खुनाचा आरोप कायम
17
१०% श्रीमंतांच्या ताब्यात ४४% जमीन; ग्रामीण भागात ४६% कुटुंबे भूमिहीन; जमीनदारांचे वर्चस्व
18
निष्पाप विघ्नेशला मुख्यमंत्री निधीतून मदत; देवेंद्र फडणवीस यांच्याकडून वसईतील घटनेची दखल
19
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
20
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
Daily Top 2Weekly Top 5

UN मध्ये पाकिस्तानला आरसा; पाहा, भारताच्या महिला सचिव स्नेहा दुबे यांची दबंग कारकीर्द

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 25, 2021 12:03 IST

पाकिस्तानला कठोर शब्दांत सुनावणाऱ्या भारताच्या प्रथम महिला सचिवांचे नाव आहे स्नेहा दुबे.

नवी दिल्ली: संयुक्त राष्ट्राच्या आमसभेत पाकिस्तानने पुन्हा एकदा काश्मीरचा विषय उरकून काढला. यानंतर भारताने राइट टू रिप्लाय करत पाकिस्तानवर चांगलेच ताशेरे ओढत आरसा दाखवला. पाकिस्तानला कठोर शब्दांत सुनावणाऱ्या भारताच्या पहिल्या महिला सचिवांचे नाव आहे स्नेहा दुबे. पाकिस्तानला जशास तसे उत्तर देणाऱ्या स्नेहा दुबे यांची कारकीर्द, प्रवास थक्क करणारा असल्याचे सांगितले जात आहे. (sneha dubey ifs profile first secretary unga reply kashmir and terrorist pakistan pm imran khan)

“ओसामाला शहीद म्हणणाऱ्यांनी लक्षात ठेवावे की जम्मू काश्मीर, लडाख...”; भारताने पाकला सुनावले

पाकिस्तानने आंतरराष्ट्रीय स्तरावर जम्मू-काश्मीरचा मुद्दा उरकून काढण्याची ही पहिली वेळ नाही. पाकिस्तान मुद्दामहून भारताची प्रतिमा आंतरराष्ट्रीय स्तरावर मलिन करण्यासाठी वारंवार काश्मीरचा मुद्दा उपस्थित करत असतो. वास्तविक पाकिस्तान दहशतवाद्यांना पाठिंबा देत आहे, हे उघड आहे. पाकिस्तानमध्ये दहशवादी उघडपणे फिरत असतात, याउलट तेथील अल्पसंख्यक समुदायावर अत्याचार होत आहे. पाकिस्तानातील परिस्थिती आणि फोलपणा जगासमोर येऊ नये, यासाठीच पाकिस्तान काश्मीरचा मुद्दा सातत्याने मांडत असतो, या शब्दांत स्नेहा दुबे यांनी पाकिस्तानला जागा दाखवून दिली आहे. 

TATA ग्रुपचा SuperApp साठी मेगा प्लान; रतन टाटांनी ७ लाख कर्मचारी कामाला लावले!

कोण आहेत स्नेहा दुबे?

स्नेहा दुबे या २०१२ बॅचच्या आयएफएस अधिकारी आहेत. सन २०१४ मध्ये त्यांना मॅड्रिड येथील भारतीय दूतावासात नियुक्ती करण्यात आली होती. आताच्या घडीला संयुक्त राष्ट्रांच्या महासभेत भारताच्या प्रथम सचिव आहेत. स्नेहा दुबे यांचे पदव्युत्तर शिक्षण जवाहरलाल नेहरू विद्यापीठातून झाले आहे. तेथे त्यांनी एमए आणि एमफील पदवी संपादन केली. यापूर्वी पुण्यातील फर्ग्युसन महाविद्यालयातून पदवी संपादन केली होती. याआधीचे स्नेहा दुबे यांचे शिक्षण गोव्यात झाले. स्नेहा दुबे यांच्या कुटुंबीयात कुणीही सिव्हिल सर्व्हिसेसमध्ये नाहीत. 

Birla च्या ‘या’ कंपनीचा IPO जाहीर; २७०० कोटींचा निधी उभारणार, पाहा डिटेल्स

दरम्यान, भारताने पाकिस्तानवर टीका करताना दहशतवाद्यांना आश्रय देणे, मदत करणे आणि त्यांना पाठिंबा देण्याचा पाकिस्तानच्या इतिहासात आणि धोरणांमध्ये दिसून येत असल्याचे म्हटले आहे. यावरच न थांबता पाकिस्तानने अनधिकृतरित्या ताबा मिळवलेला भूभागही भारताचाच असल्याचा दावा भारताने केला आहे. आजही आपण पाकिस्तानच्या पंतप्रधानांच्या तोंडून दहशतवादाच्या घटना योग्य असल्याचा सांगण्याचे प्रयत्न झालेले पाहिले. जगामध्ये दहशतवादाला अशाप्रकारे पाठीशी घालणे स्वीकार करण्याची गोष्ट नाही, या शब्दांत भारताच्या पहिल्या महिला सचिव स्नेहा दुबे यांनी पाकवर हल्लाबोल केला.  

टॅग्स :united nationsसंयुक्त राष्ट्र संघIndiaभारतPakistanपाकिस्तानImran Khanइम्रान खान