Smriti Irani Daughter Engagement : स्मृती इराणींच्या कन्येने केला साखरपुडा, पाहा कोण आहे त्यांचा होणारा जावई
By ऑनलाइन लोकमत | Updated: December 27, 2021 13:57 IST2021-12-26T08:48:22+5:302021-12-27T13:57:16+5:30
Smriti Irani Daughter Engagement : स्मृती इराणी यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांची कन्या शेनेल हिचा बॉयफ्रेंड Arjun Bhalla गुडघ्यावर बसून तिला साखरपुड्याची अंगठी घालताना दिसत आहेत. त्याशिवाय अन्य एका फोटोमध्ये शेनेल आणि अर्जुन रोमँटिक पोझमध्ये दिसत आहे.

Smriti Irani Daughter Engagement : स्मृती इराणींच्या कन्येने केला साखरपुडा, पाहा कोण आहे त्यांचा होणारा जावई
नवी दिल्ली - केंद्र सरकारमधील मंत्री आणि भाजपाच्या आघाडीच्या महिला नेत्या स्मृती इराणी ह्या त्यांच्या राजकीय कामाबरोबरच वैयक्तिक जीवनामुळेही चर्चेत असतात. स्मृती इराणी ह्यांनी झुबिन इराणी यांच्याशी विवाह केला असून. त्यांना दोन मुले आहेत. मुलाचे नाव जोर इराणी तर मुलीचे नाव हे जोईल इराणी आहे. दरम्यान, स्मती इराणींच्या पतीला पहिल्या पत्नीपासूनही एक मुलगी आहे तिचे नाव शेनेल आहे. आता स्मृती इराणी ह्यांनी त्यांच्या मुलीबाबत आनंदाची बातमी सोशल मीडियावर शेअर केली आहे. स्मृती इराणी यांनी त्यांची कन्या शेनेल हिचा साखरपुडा झाल्याची माहिती इन्स्टाग्रामवरून दिली आहे. तसेच स्मृती इराणी यांनी त्यांची कन्या आणि जावयाचा फोटो शेअर केला आहे.
स्मृती इराणी यांनी शेअर केलेल्या फोटोमध्ये त्यांची कन्या शेनेल हिचा बॉयफ्रेंड अर्जुन भल्ला गुडघ्यावर बसून तिला साखरपुड्याची अंगठी घालताना दिसत आहेत. त्याशिवाय अन्य एका फोटोमध्ये शेनेल आणि अर्जुन रोमँटिक पोझमध्ये दिसत आहे.स्मृती इराणी यांनी जोडप्याचा फोटो शेअर करताना लिहिले की, ही पोस्ट त्या व्यक्तीसाठी ज्याने आम्हा सर्वांचे मन जिंकले आहे. आमच्या कुटुंबात तुमचं स्वागत आहे. तुम्हाला सासरे म्हणून एका अवलिया व्यक्तीचा सामना करावा लागणार आहे. ही माझी तुम्हाला अधिकृत सूचना आहे. गॉड ब्लेस...
स्मृती इराणी यांनी हा फोटो शेअर केल्यानंतर त्यांना शुभेच्छा देण्यासाठी रांग लागली आहे. अभिनेत्री मौनी रॉय, एकता कपूर, दिव्या शेठ साह यांसारख्या सेलेब्रिटींनी शुभेच्छा दिल्या आहे. स्मृती इराणी ह्या २०१४ पासून केंद्रीय मंत्री म्हणून काम करत आहेत. त्यांनी २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत राहुल गांधींचा पराभव केला होता. सध्या मोदी सरकारमध्ये त्या महिला आणि बालकल्याणमंत्री आहेत.