शहरं
Join us  
Trending Stories
1
अमेरिकन सैन्याची माघार? जगातील सर्वात मोठी युद्धनौका USS जेराल्ड आर फोर्ड परतीच्या प्रवासाला लागली
2
Top Marathi News Live: विधान परिषद निवडणुकीत काँग्रेस काय करणार? आज सगळेच स्पष्ट होणार...
3
Crude Oil Price: कच्च्या तेलाच्या किमतींचा भडका! क्रूड प्रति बॅरल $१२० च्या पार, जागतिक अर्थव्यवस्थेवर मोठं संकट
4
पेट्रोल, डिझेल दरवाढीचा भडका?, इंधन दरवाढीचे संकट गडद; रसायने, खतांच्या किमतीतही मोठी वाढ
5
VIDEO: मुंबई इंडियन्सच्या मॅचसाठी विनोद कांबळी वानखेडे स्टेडियमवर, अवस्था पाहून चाहते हळहळले
6
Gold Silver Price Today: आज सोन्या-चांदीच्या किमतीत तेजी; पटापट चेक करा २४K, २२K आणि १८K सोन्याचा भाव
7
"मुलगाच राहिला नाही, तर महाल काय कामाचा?"; अभिनेत्याच्या आईने सोडला ८० कोटींचा बंगला, राहते झोपडीत
8
VIDEO: धडकी भरवणारा अपघात! टायर फुटला, नियंत्रण सुटले अन् १५० फूट खोल दरीत गेली कार
9
लाथाबुक्क्यांनी मारहाण अन् खुर्च्यांची फेकाफेक; लग्नात मटणावरून पाहुण्यांमध्ये मोठा राडा
10
Khandavi Recipe: कढईत पीठ न शिजवता करा परफेक्ट सुरळीची वडी; वेळ आणि मेहनत दोन्ही वाचवणारी रेसिपी
11
Infosys ची कमाल! विना कर्मचारी कपात AI आणण्याची तयारी; याशिवाय २० हजार फ्रेशर्सच्या नियुक्तीही होणार 
12
स्मार्ट पालक बना! मुलांशी भांडण्यापेक्षा फोनची सवय सोडवण्यासाठी 'ही' सेटिंग बदला, टेन्शन फ्री व्हा
13
Rohit Sharma : मोठ्या कष्टानं उभारलेल्या साम्राज्याची डोळ्यासमोर वाताहत! 'मुंबईचा राजा' गहिवरला
14
विधान परिषद निवडणूक: राष्ट्रवादी काँग्रेसकडून झिशान सिद्दिकी यांच्या नावावर शिक्कामोर्तब!
15
"मी खूप वाईट डान्सर होते...", प्रियंका चोप्राने सांगितला किस्सा; कतरिना कैफने अशी केलेली मदत
16
'की घेतले न हे व्रत अंधतेने...' , आमदारकीची संधी हुकल्यानंतर केशव उपाध्येंची खास पोस्ट, सतरंजी उचले म्हणाऱ्यांनाही सुनावले
17
Stock Market Crash: कच्च्या तेलाच्या किंमतीत तेजी, शेअर बाजार जोरदार आपटला; Sensex ९०० अंकांनी तर निफ्टी २४००० च्या खाली
18
Vastu Shastra: देवघरात 'या' ७ गोष्टी केल्यास कधीच भासणार नाही धन-धान्याची उणीव!
19
West Bengal Election : धक्का दिल्याने वृद्धाचा मृत्यू, जिवंत मतदाराला ठरवलं 'मृत'; TMC कार्यकर्त्याचं डोकं फोडलं, दात पाडले
20
श्रद्धेचा गैरफायदा घेत भोंदूंचा ‘काळा खेळ’; जादूटाेणा, करणीचा कहर​​​​​​​, टणटण बाबासह शिष्य जेरबंद
Daily Top 2Weekly Top 5

स्मार्ट सिटी, स्वच्छता अभियान, सुंदर सोलापूर योजनेत सहभागी व्हा सुशीला आबुटे : स्वच्छता मोहीम जनजागृती अभियान

By admin | Updated: August 26, 2015 23:32 IST

सोलापूर: सोलापूरकरांनो आपली मानसिकता बदला, सकारात्मक विचार करा आणि स्मार्ट सिटी , स्वच्छता अभियानात सहभागी व्हा, असे आवाहन महापौर प्रा. सुशीला आबुटे यांनी केले.

सोलापूर: सोलापूरकरांनो आपली मानसिकता बदला, सकारात्मक विचार करा आणि स्मार्ट सिटी , स्वच्छता अभियानात सहभागी व्हा, असे आवाहन महापौर प्रा. सुशीला आबुटे यांनी केले.
सोलापूर महानगरपालिका व प्लास्ट इंडिया फाउंडेशन, मुंबई संस्थेच्या संयुक्त विद्यमाने हुतात्मा स्मृती मंदिर येथे आयोजित करण्यात आलेल्या कार्यशाळेत महापौर प्रा. सुशीला आबुटे बोलत होत्या. यावेळी व्यासपीठावर मनपा आयुक्त विजयकुमार काळम-पाटील, प्लास्ट इंडियाच्या कल्पना अंधारे, सभागृह नेते संजय हेमगड्डी, नगरसेविका गीता मामड्याल, नगरसेवक चेतन नरोटे, सहायक आयुक्त अमिता दगडे-पाटील आदी मान्यवर उपस्थित होते. स्वच्छ भारत व स्वच्छ महाराष्ट्र अभियानांतर्गत जनजागृती करण्यासाठी प्लास्टिक वापर, पुनर्वापर नियंत्रण या विषयावर कार्यशाळा घेण्यात आली. यावेळी बोलताना महापौर प्रा. सुशीला आबुटे म्हणाल्या की, टापटिपपणा, नीटनेटकेपणा व सुटसुटीतपणा, स्वच्छता आरोग्य म्हणजेच स्मार्ट सिटी होय. जे आहे ते चांगले ठेवले पाहिजे, असे आबुटे म्हणाल्या.
यावेळी आयुक्त विजयकुमार काळम-पाटील म्हणाले की, स्मार्ट सिटी व स्वच्छ सोलापूरकरिता चार गटांद्वारे अभियान राबविण्यात येणार आहे. रस्त्यांवरील फेरीवाले गट, व्यापार्‍यांचा गट, नागरिकांचा गट, अन्य गट यांना आवाहन करण्यात आले आहे. फेरीवाल्यांनी आपला कचरा रस्त्यावर न टाकता आपल्याजवळ साठवून तो कचराकुंडीत टाकावा. व्यापार्‍यांनी आपले दुकान झाडल्यानंतर तो कचरा फुटपाथवर अथवा रस्त्यावर लोटून देऊ नये, डसबीनमध्ये ठेवावा, घंटागाडी आल्यानंतर घेऊन जाईल. 50 मायक्रॉनपेक्षा कमी जाडीचे प्लास्टिक अतिशय धोकादायक असून, वापरू नये. केंद्राच्या 10 स्मार्ट सिटी यादीत सोलापूरचा निश्चित समावेश असेल, असे आश्वासन यावेळी आयुक्तांनी दिले.
यावेळी गटनेते आनंद चंदनशिवे, नगरसेविका निर्मला जाधव, विजया वड्डेपल्ली, कुमुद अंकाराम, बाबा मिस्त्री, सहायक आयुक्त प्रदीप साठे, नगरसचिव ए.ए. पठाण, जितेंद्र जोशी, काशिनाथ भतगुणकी, राजू राठी, केतनभाई शहा, गीता पाटोळे, एन.जी.ओ. संस्था, प्रशालेचे मुख्याध्यापक, विद्यार्थी, व्यापारी मंडळ आदी उपस्थित होते. प्रास्ताविक दत्तात्रय चौगुले यांनी केले. (प्रतिनिधी)
चौकट..
पर्यावरणात पंचमहाभूतांची संकल्पना : अंधारे
पंचमहाभूतांची संकल्पना पर्यावरणात आहे. प्रदूषण दूर झाल्यावरच व स्वच्छ भारत झाल्यावरच हेल्दी इंडिया होईल. सध्या अपटेकवर जग उड्या मारत आहे. प्लास्टिक हे पेट्रोकेमिकलपासून बनते. ओला व सुका कचरा वेगळा करा त्यामुळे प्लास्टिकवर नियंत्रण मिळवता येईल. पूर्वी एक व्यक्ती एका वर्षात 800 ग्रॅम प्लास्टिक सरासरी वापरत होता तर 2013 च्या आकडेवारीनुसार एक व्यक्ती एका वर्षात 13 किलो प्लास्टिक वापरत असल्याचे दिसून आले आहे. नागरिकांनी प्लास्टिकचा वापर कमी करावा, असे आवाहन यावेळी प्लास्ट इंडियाच्या कल्पना अंधारे यांनी केले.