शहरं
Join us  
Trending Stories
1
लाजीरवाण्या पराभवानंतर LSG चे मालक संतापले; कॅप्टन KL Rahul ला झापताना दिसले, Video
2
Fact Check: भारतात ३०० दहशतवादी घुसणार असल्याचे भाजपा अध्यक्ष जेपी नड्डा खरंच बोलले? जाणून घ्या सत्य
3
नागपूर मेडिकलच्या अधिष्ठात्यांसह ११ डॉक्टरांविरोधात गुन्हा, निष्काळजीपणाचा ठपका!
4
"मी विरोध केला नाही, 'त्या' पोझिशनमध्ये केवळ छताकडे बघत राहिले अन् डोनाल्ड ट्रम्प..."; पॉर्न स्टारचे खळबळजनक खुलासे
5
ना कोहली... ना रोहित...; ब्रायन लाराला वाटतं, हा युवा फलंदाज मोडू शकतो त्याचा 400 धावांचा रेकॉर्ड
6
Chandrayaan-3 नं इतिहास रचला; आता चंद्रासंदर्भात आली आणखी एक आनंदाची बातमी! जाणून घ्या, काय सापडलं?
7
सनरायझर्स हैदराबादने ९.४ षटकांत कुटल्या विजयी १६७ धावा, Mumbai Indians चे आव्हान संपुष्टात आणले
8
१६७ धावा, ९.४ षटकं, १६ चौकार, १४ षटकार! SRH चा चमत्कार, अभिषेक-ट्रॅव्हिस यांनी मोडला १६ वर्षांपूर्वीचा विक्रम
9
शरद पवारांकडे पक्ष विलिनीकरणाशिवाय पर्याय नाही; चंद्रशेखर बावनकुळे यांची खरमरीत टीका
10
माझे शब्दच हरवले आहेत, ही काल्पनिक फलंदाजी; बेक्कार हरल्यानंतर KL Rahul ला काहीच सूचेना
11
आमदाराच्या स्वीय्य सहाय्यकाच्या अपघाती मृत्यू प्रकरणी ट्रकचालकास अटक व सुटका
12
भारतीय अर्थव्यवस्था 8% दराने वाढणार; देशाच्या मुख्य आर्थिक सल्लागारांनी व्यक्त केला विश्वास
13
'इंडिया' आघाडी भ्रष्टाचारी; भाजपकडे नेता, नीती अन् विकासाचा कार्यक्रम तयार: अमित शाह
14
ट्रॅव्हिड हेडने कुटल्या १२ चेंडूंत ५८ धावा! अभिषेक शर्मासह ३६ चेंडूंत फलकावर चढवल्या १०७ धावा
15
महा-बीसीए, बीबीए, एमसीए, एमबीए CET प्रवेश परीक्षा २९ मे रोजी; सुधारित वेळापत्रक जाहीर
16
भारताच्या लोकसंख्येत हिंदू 6 टक्क्यांनी घटले, मुस्लीम समाजाचा टक्का वाढला; सरकारी पॅनलनं केला 65 वर्षांचा अभ्यास
17
Air India ने 80 उड्डाणे रद्द केल्याबद्दल मागितली प्रवाशांची माफी; तिकीटाचे पैसेही परत करणार...
18
काँग्रेसची धुळधाण हीच खरी देशभक्ती; एकनाथ शिंदेंची संगमनेरात जोरदार टीका
19
मी दक्षिण भारतातील असून भारतीय दिसते; अभिनेत्रीचं सॅम पित्रोदांना चोख प्रत्युत्तर
20
इंडिया पोस्ट पेमेंट्स बँकेत नोकरीची संधी, 'या' तारखेपूर्वी उमेदवार करू शकतात अर्ज

आयआयटी मुंबईसह सहा शिक्षण संस्था ‘प्रतिष्ठित’

By ऑनलाइन लोकमत | Published: July 10, 2018 5:27 AM

मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सोमवारी आयआयटी मुंबईसह तीन सरकारी आणि तीन खासगी संस्थांना ‘प्रतिष्ठित संस्थां’चा दर्जा दिला आहे.

नवी दिल्ली : मनुष्यबळ विकास मंत्रालयाने सोमवारी आयआयटी मुंबईसह तीन सरकारी आणि तीन खासगी संस्थांना ‘प्रतिष्ठित संस्थां’चा दर्जा दिला आहे. यामुळे या संस्थांना जागतिक स्तरावरील विद्यापीठाच्या स्वरूपात आणि स्वायत्त म्हणून सादर करण्यास मदत होणार आहे.मनुष्यबळ विकास मंत्रालय पुढील पाच वर्षात तिन्ही सरकारी संस्थांना १००० कोटी रुपयांचा निधी देणार आहे. खासगी संस्था सरकारी निधीसाठी पात्र असणार नाहीत. सरकारने ज्या संस्थांना प्रतिष्ठित संस्थांचा दर्जा दिला आहे त्यात आयआयटी दिल्ली, आयआयटी मुंबई, बंगळुरू येथील इंडियन इन्स्टिट्यूट आॅफ सायन्स, मणिपाल अ‍ॅकॅडमी आॅफ हायर एज्युकेशन, बिट्स पिलानी आणि खासगी क्षेत्रातील जिओ इन्स्टिट्यूट रिलायन्स फाउंडेशन या संस्थांचा समावेश आहे.मनुष्यबळ विकास मंत्रालय १० सरकारी आणि १० खासगी अशा २० प्रतिष्ठित संस्थांची निवड करणार आहे. हे पाऊल त्याचाच एक भाग आहे. या संस्थांना पूर्ण शैक्षणिक आणि प्रशासकीय स्वायत्तता राहील.स्वायत्ततेमुळे होणार फायदाया संस्थांना नवे अभ्यासक्रम, विदेशी विद्यार्थ्यांना प्रवेश, विदेशी शैक्षणिक संस्थांसोबत सहकार्य करण्याची स्वायत्तता मिळणार आहे. देशात आज ८०० विद्यापीठे आहेत. मात्र, यातील एकही संस्था जगातील पहिल्या १०० अथवा २०० मध्ये नाही.

टॅग्स :IIT Mumbaiआयआयटी मुंबईeducationशैक्षणिक