'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2025 15:47 IST2025-05-09T15:46:25+5:302025-05-09T15:47:19+5:30
India-Pakistan Tension Teacher Viral Letter: मला मातृभूमीची सेवा करण्याची संधी द्यावी, असेही पत्रात लिहिले

'सर, मला फक्त एकदा परवानगी द्या, मी पाकिस्तानविरूद्ध..."; बिहारच्या शिक्षकाचे पत्र व्हायरल
India-Pakistan Tension Teacher Viral Letter: सध्या भारत आणि पाकिस्तानमध्ये तणावाची परिस्थिती आहे. भारतानेपाकिस्तानमधील दहशतवाद्यांच्या तळांवर हल्ला केल्यापासून पाकिस्तानात घबराट पसरली आहे. ते सतत भ्याड कृत्ये करत आहेत आणि ड्रोनने भारतावर हल्ला करत आहे. पण पाकिस्तानच्या नापाक करामती सफल होऊ दिल्या जात नाहीयेत. देशातील प्रत्येक नागरिक आपल्या सैन्यासोबत उभा आहे. लोकांना भारतीय सैन्याचा अभिमान आहे. या लढाईत लोकांना सैन्याला पाठिंबा द्यायचा आहे आणि बरेच लोक पुढे येत आहेत. याचदरम्यान, बिहारमधील एका शाळेतील शिक्षकाने शिक्षण विभागाला अर्ज लिहिला. पत्रात देशाबद्दलच्या भावना व्यक्त करताना शिक्षकाने लिहिले आहे की, मला पाकिस्तानविरूद्ध भारतीय सैन्याच्या कारवाईत सामील होण्याची आणि सेवा करण्याची परवानगी द्या. शिक्षिकाचे हे पत्र आता सोशल मीडियावरही व्हायरल होत आहे.
एनसीसी-एनएसएसचे प्रशिक्षण घेतले आहे...
पत्र लिहिणाऱ्या शिक्षकाचे नाव वैभव किशोर आहे. त्यांनी शिक्षण विभागाचे अतिरिक्त मुख्य सचिव डॉ. एस. सिद्धार्थ यांना एका अर्जाद्वारे कळवले आहे की, मी कैमूरच्या अधौरा येथे शिक्षक म्हणून काम करत आहेत. शैक्षणिक प्रशिक्षणासोबतच मी काही गोष्टींसाठी स्वतंत्रपणे प्रशिक्षण देखील घेतले आहे. त्यांनी त्यांच्या अर्जात असेही नमूद केले आहे की, त्यांना NCC-Cच्या प्रमाणपत्रात BEE ग्रेड मिळाला आहे. याशिवाय, त्यांनी दोन वर्षे रोव्हर/रेंजर्स प्रशिक्षण देखील घेतले आहे आणि NSS चे प्रशिक्षणही घेतले आहे.
मला सेवा करण्याची संधी द्या.
वैभव किशोर यांनी त्यांच्या अर्जात लिहिले आहे की, महोदय मी तुम्हाला विनंती करतो की वरील बाब लक्षात घेऊन मातृभूमीच्या रक्षणासाठी लष्करी कारवाईत मदत करण्याची मला परवानगी द्यावी. जेणेकरून मला मातृभूमीची सेवा करण्याची संधी मिळेल. जेव्हा हे पत्र सोशल मीडियावर व्हायरल झाले, तेव्हा लोकांनीही या शिक्षकाच्या सेवाभावाचे कौतुक करायला सुरुवात केली आहे.