शहरं
Join us  
Trending Stories
1
वेगळ्या घोषणेची गरज नाही, भारत आधीपासूनच हिंदूराष्ट्र - सरसंघचालक मोहन भागवत
2
मुंबई सीएसएमटीवरून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा घसरला, सुदैवाने सर्व प्रवासी सुरक्षित!
3
यवतमाळ जिल्हा बँकेचे मुदतवाढ मिळालेले संचालक मंडळ अखेर बरखास्त; उपनिबंधकांकडे कारभार : संचालक मंडळाच्या मनसुब्यावर पाणी 
4
विदर्भातील सहा शहरांमध्ये ‘सन’ताप कायम, आणखी २४ तास उष्णतेची लाट; मात्र अर्धे जिल्हे अवकाळीच्या सावटात
5
DC vs RCB : हिशोब चुकता! दिल्ली कॅपिटल्सच्या घरच्या मैदानात रॉयल चॅलेंजर्सनं ३९ चेंडूत संपवली मॅच
6
Top Marathi News Live: मुंबई सीएसएमटीवरुन सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा डबा पुणे स्थानकात घसरला
7
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
8
महाराज आला रे! मोठ्या धक्क्यातून सावरण्यासाठी Mumbai Indians नं खेळली 'ही' चाल
9
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
10
DC vs RCB: ८ धावांत ६ विकेट्स! भुवी-हेजलवूडमध्ये विकेट घेण्याची स्पर्धा; दिल्लीकरांसाठी भयावह स्वप्न
11
भसाभस वाढतंय वीज बिल... एसी सोबत पंखा किती फायदेशीर? फक्त AC च्या 'या' आकड्याकडे लक्ष द्या; सरकारनं दिला खास 'मंत्र'
12
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
13
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
14
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
15
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
16
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
17
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
18
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
19
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
20
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
Daily Top 2Weekly Top 5

सिंगल कॉलम

By admin | Updated: February 11, 2015 23:47 IST

स्काय मैत्री ग्रुपचे आवाहन

स्काय मैत्री ग्रुपचे आवाहन
नागपूर : स्काय मैत्री ग्रुपतर्फे आकाशदर्शन, ग्रहगोलदर्शन, पक्षिनिरीक्षण आदी निसर्गावर आधारित उपक्रमांचे आयोजन संस्थेच्या संस्थापक मैत्री मार्कंडेयवार यांनी केले आहे. प्रामुख्याने मुलांची जिज्ञासा शमविण्यासाठी हा ग्रुप असला तरी सर्व वयाचे लोक यात सहभागी होऊ शकतात. यासाठी खगोलशास्त्रज्ञ प्रमोद जोशी यांचे सहकार्य लाभले असून दुर्बिणीद्वारे गुरू ग्रहाचा अभ्यास सध्या करण्यात येत आहे. या मोहिमेत सहभागी होऊ इच्छिणाऱ्यांनी १०३, बाजीप्रभूनगर, रामनगर येथे संपर्क साधावा, असे आवाहन मैत्री मार्कर्ंडेयवार यांनी केले आहे.
---------------
प्रवास व पर्यटन विभागातर्फे नेचर ट्रेन
नागपूर : शहरातील जैवविविधतेचे पर्यटनाच्या दृष्टीने महत्त्व ओळखून राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या पर्यटन विभागातर्फे गोरेवाडा येथे नेचर ट्रेनचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थ्यांना जैवविविधतेचे दर्शन व माहिती व्हावी हा या कार्यक्रमाचा उद्देश होता. याप्रसंगी निशिकांत जाधव यांनी विद्यार्थ्यांना मार्गदर्शन केले. यात विविध वनस्पतींचे महत्त्व समजावून सांगण्यात आले. पक्षी आणि त्यांचे स्थलांतर विषयावरही यावेळी मार्गदर्शन करण्यात आले.
--------
ट्युशन क्लास चालविणाऱ्यांना दणका
शिवसेना जिल्हाप्रमुख सतीश हरडे यांच्या मार्गदर्शनात आणि महाराष्ट्र शिव वाहतूक सेनेचे जिल्हाध्यक्ष आशिष मनपिया यांच्या नेतृत्वात कबीरनगर, मिरे लेआऊट येथे चालणारे पॉलिटेक्निक क्लासेस व स्नेहा ट्युशन क्लासेस यांचे फुटपाथ व रस्त्यावरील अवैध पार्किंग याविरोधात निदर्शने करण्यात आली. यासंदर्भात पोलिसांना निवेदन देऊन त्यांना वाहतुकीला होणारा अडथळा समजावून सांगण्यात आला. पोलिसांनी तत्काळ कारवाई करून हा भाग मोकळा केला. यात संजय तांबे, किशोर विरुळकर, मंगेश खडके, स्वप्नील मुळे यांनी सहभाग घेतला.