सिद्धू मुसेवालाचे वडील अमित शहांसमोर ढसाढसा रडले, हत्येची सीबीआय चौकशीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 4, 2022 20:29 IST2022-06-04T20:28:00+5:302022-06-04T20:29:20+5:30
Moose Wala's Parents Meet Amit Shah : या भेटीत मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी आपल्या मुलाच्या निर्घृण हत्येची सीबीआय चौकशी करण्याची मागणी केली असल्याचे सांगण्यात येत आहे.

सिद्धू मुसेवालाचे वडील अमित शहांसमोर ढसाढसा रडले, हत्येची सीबीआय चौकशीची मागणी
Moose Wala's Parents Meet Amit Shah: दिवंगत गायक सिद्धू मुसेवालाच्या (Siddhu Moosewala) पालकांनी शनिवारी चंदीगड विमानतळावर केंद्रीय गृहमंत्री अमित शहा (Amit Shah) यांची भेट घेतली. भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) सूत्रांनी ही माहिती दिली. 29 मे रोजी सिद्धू मुसेवाला याची निर्घृण हत्या करण्यात आली होती.
सीबीआय चौकशीची विनंती
या भेटीत मुसेवालाचे वडील बलकौर सिंह यांनी आपल्या मुलाच्या निर्घृण हत्येची सीबीआय (CBI) चौकशी करण्याची मागणी केली असल्याचे सांगण्यात येत आहे. पंजाबमधील मानसा जिल्ह्यात २९ मे रोजी सिद्धू मुसेवाला यांच्या हत्येने संपूर्ण पंजाब हादरला होता. मुलाच्या हत्येने दु:खी झालेल्या मुसेवालाच्या वडिलांच्या डोळ्यात अश्रू वाहू लागले.
#WATCH | Punjabi singer Sidhu Moose Wala’s family met Union Home Minister Amit Shah in Chandigarh.
— ANI (@ANI) June 4, 2022
He was killed by unknown assailants in Mansa district on 29th May. pic.twitter.com/aSQqjWcEIs
दोन कारमधून आलेल्या हल्लेखोरांनी सिद्धू मुसेवाला याच्यावर गोळीबार केला. याप्रकरणी दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या घराजवळ अनेकांनी निदर्शनेही केली. काही लोक पंजाब सरकारच्या सुरक्षा व्यवस्थेवरही प्रश्न उपस्थित करत आहेत. पंजाब पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, या हत्येमागे गँगस्टर लॉरेन्स बिश्नोईचा हात आहे.
शहा यांचा चंदीगडला दौरा
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा शनिवारी चंदीगडमध्ये आले आणि त्यांनी भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) पंजाब युनिटच्या नेत्यांची बैठक घेतली. यानंतर ते हरियाणातील पंचकुला येथे 'खेलो इंडिया युथ गेम्स'चे उद्घाटन करतील.