Sidhu Moosewala : सिद्धू मुसेवालाच्या हत्येतील गँगस्टर टीनू मानसा पोलिसांच्या ताब्यातून फरार

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 2, 2022 13:36 IST2022-10-02T13:32:02+5:302022-10-02T13:36:07+5:30

सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील अटकेत असलेला गँगस्टर दीपक टीनू मानसा पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला आहे. टीनू याला चौकशीसाठी कपूरनाथ कारागृह येथून मानसा येथे आणण्यात आले होते.

Sidhu Moosewala murder case gangster Tinu Mansa absconded from police custody | Sidhu Moosewala : सिद्धू मुसेवालाच्या हत्येतील गँगस्टर टीनू मानसा पोलिसांच्या ताब्यातून फरार

Sidhu Moosewala : सिद्धू मुसेवालाच्या हत्येतील गँगस्टर टीनू मानसा पोलिसांच्या ताब्यातून फरार

चंदीगड: सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील अटकेत असलेला गँगस्टर दीपक टीनू मानसा पोलिसांच्या ताब्यातून फरार झाला आहे. टीनू याला चौकशीसाठी कपूरनाथ कारागृह येथून मानसा येथे आणण्यात आले होते. यावेळी त्याने पोलिसांना चकवा दिला असल्याचे सांगण्यात येत आहे. 

दीपक टीनू याने काल पोलिसांना शस्त्रांची माहिती दिली होती, त्यामुळे पोलीस त्याला खासगी वाहनातून घेऊन चौकशीसाठी जात होते. त्यादरम्यान तो पोलिसांच्या तावडीतून फरार झाल्याची माहिती सूत्रांनी दिली. पंजाबमध्ये पोलीस सतर्क झाले आहेत.

Sidhu Moosewala : सिद्धू मूसेवाला हत्याकांड प्रकरणातील आरोपीच्या पुणे पोलिसांनी आवळल्या मुसक्या

दीपक टीनू हा सिद्धू मुसेवाला हत्येतील मुख्य आरोपी असल्याचे बोलले जात आहे. मुसेवाला हत्येपूर्वी दोन दिवस दीपक टीनूचे लॉरेन्स बिश्नोई सोबत फोनवरुन संभाषण झाल्याची माहिती पोलीस चौकशीत मिळाली आहे. दीपक टीनू हा मोठा गँगस्टर आहे. त्याने आतापर्यंत पंजाब, युपी आणि हरियाणामध्ये अनेक गु्न्हे केले आहेत. तो फरार झाल्यानंतर पंजाब पोलिसांच्यावर प्रश्न उपस्थितीत होत आहेत.

याप्रकरणी पोलिसांनी प्रतिक्रिया दिलेली नाही. आरोपी दीपक कुमार उर्फ ​​टिनू याच्यावर हरियाणा, पंजाब, चंदीगड, राजस्थान, दिल्ली येथे खून, हत्येचा प्रयत्न यासह ३५ हून अधिक गुन्हे दाखल आहेत. 
 

Web Title: Sidhu Moosewala murder case gangster Tinu Mansa absconded from police custody